Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

april, 2016

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार १०४ टक्के पाउस होणार असुन या करिता येणाऱ्या खरीप हंगामात कोणते वाण वापरावे या संबधीचे नियोजन करून खतांची खरेदी करावी. • उन्हाळी हंगामामधील शेताची नागरणी झाली असल्यास पुन्हा एकदा पाच दाती किंवा नऊ दाती कल्टीवेटरच्या सहाय्याने दुसरी नागरणी करून घ्यावी. • घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास त्याला एक उन द्यावे व त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी जेणेकरून आपल्याला उगवण क्षमता कमी असल्यास बाजारातून नवीन प्रमाणित बियाणे विकत घेता येतील. • बियाण्यांची उगवण क्षमता तपासताना तापमान श्याक्यतो ३५ डिग्री से. पेक्षा जास्त नसावे. या करिता बियाणे घरामध्ये किंवा वरांड्यामध्ये सावलीत उगवण शक्ती तपासण्याकरिता ठेवावे. • बियाण्यांची उगवण शक्ती तपासताना प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना घेऊन ते उगवनिकरिता पेपर पद्धतीने किंवा रेती पद्धतीने तपासून घ्यावे. • पेपर पद्धतीने उगवण क्षमता तपासायची असल्यास उगवण क्षमता तपासणारा पेपर ओला करून त्यामध्ये १०० बियाणे ठेऊन तो प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळून ठेवावा व ४ ते ५ दिवस त्यावर थोडे पाणी टाकून तो ओला राहील याची काळजी घ्यावी. • रेती पद्धतीमध्ये एका प्लास्टिक ट्रे मध्ये रेती घेऊन त्यामध्ये १०० बिया टाकाव्यात व त्याला पाणी द्यावे. त्या ट्रेला खालून निचरा होण्यासाठी एक छिद्र करावे ४ ते ५ दिवसानंतर चांगली उगवण झालेल्या रोपांची संख्या मोजावी. • १०० बियांपैकी चांगले जोमदार उगवलेले बियाचे रोपटे मोजून घ्यावेत जर ७० रोपटे उगवले असतील तर त्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आहे असे समजावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• शक्यतो जास्तीत जास्त ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, पिकांना पाणी देताना मुळ्यांच्या जारवाच्या क्षेत्रात दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. उन्हाळी पिके व फळबागांना शक्यरतो सायंकाळी पाणी द्यावे. • कांदा पिक सध्या काढणी अवस्थेत असेल तर पिकाची काढणी सुरु करावी. कांदा काढणी झाल्यावर दुसऱ्या ओळीतील काढणी केलेल्या कांदा पातीने पहिल्या ओळीतील काढलेला कांदा झाकावा. • नवीन लागवड केलेल्या फळपिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांचा मोहर, डाळिंबाची फुले तसेच इतर फळ पिकांची फुले काढून टाकावीत, बागेची स्वच्छता करावी व बाग तणमुक्त ठेवावी. • हळद नवीन लागवडीसाठी गट्टू बेणे ५० ते ६० ग्राम व त्यावरील वजनाचे निवडून हवेशीर साठवून ठेवावे. • साठवलेल्या शेततळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी बाष्परोधकांचा वापर करावा. शेतातील उभ्या पिकातसुद्धा गरजेनुसार बाष्परोधकाची फवारणी करावी. पिकांमधून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी फळबागांमध्ये ८ टक्के केओलिन (१० लिटर पाण्यामध्ये ८०० ग्रॅम केओलिन) फवारणी करावी. • पिकांना जास्त पाणी देण्याऐवजी पिकांच्या संवेदनशील अवस्थांना पाणी द्यावे. फळपिकांमध्ये जास्तीत जास्त आच्छादन तंत्राचा वापर करावा. प्लॅस्टिक आच्छादन शक्य नसल्यास वाळलेला काडीकचरा, गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इ वापर करावा • केळी बागेत केळी पाने व अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीन भुसा इ.चा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे. बागेत चारही बाजूंनी सजीव कुंपण करावे. • नविन फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदावे. खड्डे उन्हात चांगले तापू द्यावे. • कागदी लिंबूमध्ये हस्त बहराच्या फळांची तोडणी करावी. फळांची प्रतवारी करून विक्री करावी. • निशिगंधाची लागवड करावी. लागवडीपूर्वी कंद जि.ए.-३ या संजीवकाच्या १२५ पीपीएम तीव्रतेच्या द्रावणामध्ये २४ तास बुडवून लावावे. लागवड २० बाय २० सेमी अंतरावर करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
शेळ्यांतील उष्माघात लक्षणे व उपाय : • उष्माघातामुळे शेळ्या, करडे दगावू शकतात. म्हणून उष्माघात लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर उपचार करणे हितकारक ठरते. • शेळ्यांवर जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास, शेळ्या जास्त प्रमाणात श्वासोच्छवास करतात. जास्त लाळ गाळतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा जाणवतो. खाद्य कमी खाणे, अशी लक्षणे असतील तर उष्माघाताची शक्यता असते. • शेळ्यांना थंड ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे व गरज भासल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे किंवा शेळ्यांना पाण्यात उभे करावे. तसेच पाण्याचा फवारा व शक्य असल्यास पंखे लावून गोठ्यातील वातावरण थंड करावे. • शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी. तज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत. खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके द्यावीत. लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते. कोंबड्यातील उष्माघात लक्षणे व उपाय : • तापमानवाढीच्या काळात कोंबड्यांच्या सततच्या उघडझाप करण्याने श्वेसनाचा वेग वाढतो, तसेच हृदयाच्या स्पंदनांमध्ये वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो व यामुळे कोंबड्यांना उष्माघात होतो. • कोंबड्यांना जर उष्णतेचा त्रास जाणवत असेल तर त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्यामध्ये मंद व सुस्तपणा दिसून येतो. • काही कोंबड्या या पाणी पिण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या असतात. तसेच काही कोंबड्या या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या असतात. • कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास जाणवत असेल तर त्या जास्त पाणी पितात व खाद्य कमी प्रमाणात खातात. शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी व थंडपणा आणण्यासाठी त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात व कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करून धापा टाकतात • कोंबड्या श्वास घेण्यास धडपडू लागतात व त्यांना दम लागतो. त्यांचे पाय लटपटतात आणि ठराविक काळासाठी त्या चक्कर येऊन खाली पडतात. • कोंबड्यांच्या वजनात अचानकपणे घट होते. त्यांची त्वचा रखरखीत होते व रंगांमध्ये फरक दिसून येतो. तसेच अंडी देण्याच्या व अंडी उबविण्याच्या क्षमतेतसुद्धा कमीपणा आलेला दिसून येतो. • अंड्यांचा आकार हा लहान होतो व त्यांच्या अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येते. • उष्माघातावर मात करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोंबड्यांच्या आहारातील ऊर्जेचे प्रमाण कमी करावे. • कोंबड्यांच्या आहारातील त्यांचा समतोल राखावा. • उष्माघाताच्या त्रासापासून कोंबड्यांना वाचविण्यासाठी, सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा खाद्य खाण्यास द्यावे. खाद्यांमध्ये अचानकपणे बदल करू नये. • कोंबड्यांना खात्रीशीर, स्वच्छ, थंड व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी. • शेडमधील पिण्याच्या पाण्याची भांडी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढवावी. • पिण्याच्या पाण्यामध्ये ग्लुकोज व साखर मीठ चे मिश्रण टाकावे जेणेकरून कोंबड्यांमधील उष्णतेचा त्रास कमी होईल संकरित जनावरांचे व्यावस्थापन • संकरित जनावरे उन्हाळ्यातील अतिउष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत, या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधावे. उन्हाळ्यातील तापमान जनावरांना न मानवणारे असल्याने प्राथमिक स्तरावर दुधाळ जनावरांची काळजी घेताना जनावरांच्या गोठ्यात गोणपाट टाकून त्यावर पाणी शिंपडावे, दुधाळ जनावरांना दिवसातून दोन ते तीनवेळा थंड पाणी पाजावे, जीवनसत्व, कॅलरीज क्षार यांचा समावेश असलेले खाद्य द्यावे. त्यामुळे तापमान संतुलीत राखण्यास मदत होईल व स संकरित गाई उन्हाळ्यातही उत्पादनक्षम राहतील. शक्य असल्यास कुलर ची व्यवस्था करावी. म्हशींचे व्यावस्थापन • म्हशींना पाण्यात डुंबणे ही त्यांची नैसर्गिक आवड आहे व डुंबण्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. उन्हाळ्यात म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे ज्यामुळे शरीराचे तापमान थंड राखण्यास मदत होईल. • दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीतच ठेवावीत. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी गोणपाट किवा पोते ओले करून लावावेत. बैलांचे व्यवस्थापन – • बैल उन्हात बांधू नयेत. • बांधण्याच्या जागी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असू नये. जागा हवेशीर असावी. हवा खेळती ठेवावी. • घराचे छप्पर पांढऱ्या रंगाचे असावे, त्यामुळे प्रखर उष्णतेच्या किरणांचे परावर्तीकरण होऊन गोठा थंड राहण्यात मदत होईल. • गोठ्यात जनावरांची गर्दी असू नये. • संपूर्ण दिवस व रात्र थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. • जनावरांना थकवा जाणवल्यास गुळाचे पाणी पाजावे.  
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• वाढत्या तापमानामुळे उन्हाळी भुईमुग व मुग पिकास सायंकाळी पाणी द्यावे. • उन्हाळी मुग व भुईमुग पिकांची (वाढलेल्या उष्णतामानामुळे) परिपक्व होण्याच्या वेळेवर फरक पडू शकतो, त्यामुळे या पिकांच्या परीपक्वतेवर लक्ष ठेवावे. • खोल नागरणी करून घ्यावी. • मान्सूनच्या पावसाचा अंदाज आल्यामुळे खरीप व रबी पिकांचे नियोजन करून घ्यावे. • बाजारात हवे असलेले खते व बियाणे उपलब्ध असल्यास खरेदी करून ठेवावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• दुष्काळी परिस्थितीत फळझाडांची तग धरून राहण्याची शक्ती किवा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानावर एक ते दिड टक्के पोटयाशीअम नायट्रेट ची फवारणी करावी. • संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू इत्यादी लिम्बुवर्गीय फळझाडाना दुहेरी आले पद्धतीने पाणी द्यावे. • उन्हाळ्यातील पाण्याचे उत्सर्जन कमी होण्यासाठी ५% केओलीन ची पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. • ठिबक सिंचनाचा तसेच सूक्ष्म तुषार सिंचनाचा वापर करावा. • पाण्याची उपलब्धता कमी असल्यास प्रवाही पद्धतीने पाणी देण्यासाठी वाफ्याची चौकोनी बांधणी करून घ्यावी. चौकोनातून करणाच्या पद्धतीचा आडवा वरंबा टाकून वाफ्याचे दोन समभाग करावेत. प्रत्येक वेळी अर्ध्या वाफ्यास पोच पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची बचत करता येते. बागेला शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे. • उन्हाळ्यामध्ये संत्रा तसेच मोसंबी आंबिया बहराची फळगळ कमी करण्यासाठी एनएए,१० पिपिएम (१० मिलीग्राम प्रती लिटर पाणी) तीव्रतेची फलधारणा नंतर १५ ते २० दिवसानंतर फवारणी करावी. किवा १.५ ग्राम जि.ए आणि १०० ग्राम कॅर्बेन्दाझीम आणि एक किलो युरिया यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी. १५ दिवसानंतर परत एकदा फवारणी करावी. • उन्हाळ्यात पाण्याची खूप कमतरता असल्यास झाडे जगविण्यासाठी झाडावरील फळांची संख्या कमी करावी तसेच अनावश्यक फांद्याची छाटणी करावी. • बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे. • कांदा पिकाची काढणी झाल्यानंतर व चांगले सुकविल्यानंतर कांदा चाळीमध्ये साठवणूक करावी. • हळद पिकाची काढणी करावी. नवीन लागवडीसाठी जेठे गड्डे वेगळे करावे. उर्वरित अंगठे गड्डे, करंगळी गड्डे उकड्ण्यासाठी ठेवावे. • टरबूज पिकामध्ये फळे परिपक्वतेच्या काळात पाणी देणे कमी करावे म्हणजे फळांना तडे जाऊन फळे फुटणार नाही. • नवीन लावलेल्या फळझाडांच्या आळ्यात पाचट, गवताचे काड, लाकडाचा भुसा आणि पाला-पाचोळा या पदार्थाचे आच्छादन करावे. आच्छादन करतांना सेंद्रिय घटक बारीक केल्यास फायदा होतो. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सेंद्रिय घटकामध्ये शिफारसीत प्रमाणात कीडनाशक पावडर मिसळावी. काळ्या पोलिथिनचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. • संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू फळझाडांना जमिनीपासून ३ फुट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. • संत्रा, मोसंबी फळझाडांना मृग बहराचा ताण देण्यासाठी हलक्या जमिनीत ३० ते ३५ दिवस, मध्यम जमिनीत ४० ते ५० दिवस तसेच भारी जमिनीस ६० ते ७० दिवसाचा ताण द्यावा.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• गाय :- ज्या वेळेस शरीराचे तापमान 101 फॅ. ते 103 फॅ.च्या दरम्यान असते, त्यास सौम्य ताप असू शकतो. जनावरास सौम्य ताप असेल तर कासेचा दाह, श्वडसनसंस्थेचा दाह, मूत्रमार्गाचा दाह, कॉक्सीदडिया, पोटदुखी, गर्भाशयाचा दाह असे संभाव्य आजार असू शकतात. अशा वेळी जनावरांचे बारकाईने निरीक्षण करावे. लक्षणांवरून तुम्ही आजार ओळखू शकता. उन्हाळ्यात वरील लक्षणे दिसल्यास जनावरांना थंड ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच थंड पाणी पिण्यास द्यावे व पशुवैदका मार्फत उपचार करून घ्यावा. • म्हैस :- चांगले आरोग्य असणा-या जनावराची नाकपुडी ओलसर असते. जिभेने नाक साफ करण्याची प्रक्रिया चालू असते. रवंथ करताना तोंडात घास असतो. रवंथ करताना पांढरा फेस येतो. चांगले आरोग्य असणारी जनावरे किमान आठ तास रवंथ करतात. शेण, मूत्र टाकताना मोकळेपणा असतो, अवघडलेपणा नसतो. जनावर उभे राहताना, उठताना, बसताना मोकळेपणा असतो. उभे असताना चारी पायांवर सारखे वजन देतात. शेणाला घास वास नसतो, शेणाची बांधणी घट्ट खीर, लापशीसारखी असते. शेण खाली पडल्यावर उडते हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. चांगले आरोग्य असणा-या जनावराचे मूत्र स्वच्छ, पारदर्शक असते. मूत्राला अमोनियासारखा वास असतो. चांगले आरोग्य असणा-या जनावराचे शरीराचे तापमान ९८.५ फॅ. ते १०२ फॅ. असते, तर संकरित जनावरांचे तापमान ९९.५ फॅ. ते १०२ फॅ. असते. चांगल्या प्रकृतीच्या जनावरांची नाडी प्रतिमिनिट ४० ते ४५ असते. या सर्व बाबींचे निरीक्षण बारकाईने केले, तरच आजारी असलेली जनावरे ओळखता येतात. वरील पैकी कुठलेही लक्षणात बदल दिसत असल्यास त्वरित पशुवैदाकाशी संपर्क करावा. • शेळी :- शेळ्यांच्या कोठीपोटीचा आकार लहान असल्याने त्यांना दिवसातून ३-४ वेळा खाद्य द्यावे. शेळ्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचे हिरवे ओले किंवा सुके गवत उदा. ल्यूसर्न,बरसीम, चवळी इत्यादी आवडते. शेळ्यांना त्यांच्या आंबोणात (खुराकात) मीठ असलेले खनिज मिश्रण २ टक्के या प्रमाणात वापरावे. • प्रथिनयुक्त द्विदल गवत उपलब्ध नसल्यास आयोडीनयुक्त मीठ व डाय - केल्शीयम फॉस्फेट समभाव घेऊन यांचे मिश्रण द्यावे. शेळीच्या जीवनात पोषणाच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या अवस्था (काळ) असतात. त्या काळात शेळ्यांची अन्नघटकांची गरज वाढते अश्या वेळी योग्य आहार द्यावा . • प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाण, तीळ, सरकी सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ. ) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. • उन्हापासून बचावासाठी सावली व थंड पाण्याची व्यवस्था करावी खाद्य निर्मिती :- ‘अझोला’चा वापर • ‘अझोला’चे दहा बाय दहा आकाराचे एक बेड तयार करण्यासाठी कमीत कमी तीन हजार रुपयांचा खर्च येतो. ‘अझोला’मध्ये विविध खाद्य घटक प्रथिने, अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आदी आवश्यणक घटक मिळतात. ‘अझोला’मध्ये असणारे उच्च प्रथिने व कमी लिग्निन असल्याने जनावरेही चारा सहज पचवू शकतात. • जनावरांना हा चारा थेट किंवा खुराकात मिसळून देता येतो. कमी जागा, कमी पाणी व कमी वेळेत स्थिर व सातत्याने चारा उत्पादन घेता येते. अझोलामध्ये २७ टक्के प्रथिने, कॅल्शिअम व फॉस्फरस असल्याने जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते. दूध वाढीबरोबरच दुधाची फॅट वाढून शेतकऱ्यांचा चांगला आर्थिक फायदा होतो. • हायड्रोफोनिक तंत्रज्ञान • दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यासाठी कमी पाणी व कमी कालावधीत हायड्रोफोनिक पद्धतीने हिरवा चारानिर्मिती करता येते. मातीची आवश्य कता लागत नाही. चांगल्या प्रतीचा व उच्च दर्जाचा, जास्त प्रथिने असलेला चारा तयार करता येत असल्यामुळे पशुखाद्याची बचत होते. दूध व फॅटच्या प्रमाणात वाढ होते. मनुष्यबळाची व वेळेची बचत होते. ही चारानिर्मितीची पद्धतीही सोपी आहे. कीड व रोगाचा परिणाम होत नाही. खत वापरण्याची गरज नाही. • कुक्कुट -उत्तम आरोग्य असण्यासाठी कोंबड्यांना दोन घटकांचा समावेश असलेले अन्न पदार्थ द्यावेत. तसेच खाद्य संपुर्णत: संतुलित व चांगले द्यावे. उर्जा पुरविणारे – उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरावीत तर प्रथिनांसाठी वापरावे. प्रथिने पुरविणारे – शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड यांच्या माध्यमातून प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा वापरावे. पाण्याची व्यवस्था कोंबडी पालन करताना स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. कोंबड्यांना पाणी उपलब्ध करून देतानाही काळजी घ्यावी. पाण्याची भांडी रोज स्वच्छ करून ताज्या पाण्याने भरावीत याबरोबरच, पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी १४-१२ -१२ इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा. उन्हापासून बचावासाठी सावली व थंड पाण्याची व्यवस्था करावी
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• सध्या उपलब्ध असलेली पाणी क्षमता लक्षात घेऊनच पिकाची निवड करावी. पिकांना जास्त पाणी देण्याऐवजी पिकांच्या संवेदनशील अवस्थांना पाणी द्यावे. फळपिकांमध्ये जास्तीत जास्त आच्छादन तंत्राचा वापर करावा. प्लॅस्टिक आच्छादन शक्य् नसल्यास वाळलेला काडीकचरा, गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इ. शेतकऱ्यांचा वापर करावा. • शक्यतो जास्तीत जास्त ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, पिकांना पाणी देताना मुळ्यांच्या जारवाच्या क्षेत्रात दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. उन्हाळी पिके व फळबागांना शक्यवतो सायंकाळी पाणी द्यावे. • जमिनी भेगाळल्या की, त्यात खोलवर असलेले पाणीही वाफ होऊन उडून जाते आणि पिकांना दिलेले पाणी भेगात शिरून खोलवर जाऊन बसते. असे पाणी पिकांच्या उपयोगी पडत नाही. भेगा पडलेल्या जमिनीवर कोळपणी, निंदणी करून मशागत केली आणि जमीन झाकण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर केला, तर भेगा बुजल्या जाऊन सिंचनाची कार्यक्षमता वाढते आणि पाण्याची बचत होते. • साठवलेल्या शेततळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी बाष्परोधकांचा वापर करावा. शेतातील उभ्या पिकातसुद्धा गरजेनुसार बाष्परोधकाची फवारणी करावी. पिकांमधून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी फळबागांमध्ये ८ टक्के केओलिन (१० लिटर पाण्यामध्ये ८०० ग्रॅम केओलिन) फवारणी करावी. • नवीन लागवड केलेल्या फळपिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांचा मोहर, डाळिंबाची फुले तसेच इतर फळ पिकांची फुले काढून टाकावीत, बागेची स्वच्छता करावी व बाग तणमुक्त ठेवावी. • नवीन फळझाडांच्या लागवड केलेल्या कलमांचे जोडाखालून आलेली फूट काढून टाकावी. कलमांना काठीने आधार द्यावा. • केळी पिकातील मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार कोयत्याने नियमित काढावीत. केळीची रोगग्रस्त पाने काढून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. झाडे पडू नयेत म्हणून बांबूच्या काठ्या किंवा पॉलिप्रॉपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने झाडांना आधार द्यावा. • बागेत केळी पाने व अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीन भुसा इ.चा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे. बागेत चारही बाजूंनी सजीव कुंपण करावे. • कांदा पिक सध्या काढणी अवस्थेत असेल तर पिकाची काढणी सुरु करावी. कांदा काढणी झाल्यावर दुसऱ्या ओळीतील काढणी केलेल्या कांदा पातीने पहिल्या ओळीतील काढलेला कांदा झाकावा. • हळद नवीन लागवडीसाठी गट्टू बेणे ५० ते ६० ग्राम व त्यावरील वजनाचे निवडून हवेशीर साठवून ठेवावे.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• वांगी आणि टोमॅटो पिकात झेंडू लावल्यास शेंडा आणि फळ पोखरणारया अळीचा आणि सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. • वांगी पिकावरील पांढरया माशीच्या व्यवस्थापनाकरीता एकरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावेत. • वेलवर्गीय भाजीपाला पिकावरील फळमाषीच्या व्यवस्थापनाकरीता फळमाशी सापळे (फ्लाय टी/मक्षिकारी) एकरी 4 ते 5 या प्रमाणात लावावेत. • भुईमूग पिकांवरील फुलकिडे, तुडतुडे आणि पाने पोखरणारया अळीच्या व्यवस्थापनाकरीता लॅम्डा सायहॅलोथ्रिन 5 इ.सी. 5 मिली किंवा क्विनोलफॉस 25 इ.सी. 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • शेत मोकळे झाले असल्यास जमिनीची खोल नांगरणी करावी आणि जमिन उन्हात तापू द्यावी. जमीन उन्हात तापल्याने सुप्तावस्थेतील किडींचा नाश होतो. त्यामुळे पुढील हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. मषागतीची कामे दिवसाच करावीत जेणेकरुन किटकभक्षी पक्षी जमिनीतील किडी आणि त्याचे अवषेष वेचून खातील.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन • गाय - उन्हाळ्यात गायींना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो, त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते. त्यासाठी गायींना थंड ठिकाणी ठेवावे, हिरवा चारा व भरपूर पाणी द्यावे. • म्हैस - म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होत. त्यासाठी म्हशींना थंड ठिकाणी ठेवावे, हिरवा चारा व भरपूर पाणी द्यावे. • वळू - उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. • खाद्य - जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 33 टक्के वाया जातो, कुट्टी करून दिल्यास केवळ दोन टक्के वाया जातो. कुट्टी केलेला चारा टोपल्यात किंवा लाकडाच्या गव्हाणीत टाकून खाऊ घालावा. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात. • शेळ्या - उन्हाळ्यात शेळ्यांची जास्त हाताळणी करणे टाळावी. शरीराच्या जास्त हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढून त्याचा विपरीत परिणाम शेळ्यांच्या आरोग्यावर व एकूणच उत्पन्नावर होतो. • शेळ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक टाळावी. आवश्यकता असेल तरच शेळ्यांची उन्हाळ्यात वाहतूक करावी, अन्यथा टाळावी. • उन्हाळ्यात शेळ्या कमी खाद्य खातात म्हणून त्यांच्या खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. खाद्यात प्रथिनांचे प्रमाण १६-१८ टक्के ठेवावे. हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, यीस्ट (किण्व) द्यावे. खाद्याची पाचकता व इतर घटकांचा समतोल राखावा. • जीवनसत्त्व ‘सी’ व ‘अ’ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मरतुकीस आळा बसतो. शेळ्यांच्या खाद्यात व्हिनेगार, लिनसीड मिल व गव्हाचा चोथा, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तसेच तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी. • करडू - करडांचे गोठे दमट हवेमुळे ओलसर राहतात व त्यामुळे जंतूंची वाढ झपाट्याने होऊन रोगराई वाढण्याची संभावना असते व त्यातून करडांची मरतूक जास्त प्रमाणात होते. त्यासाठी करडांच्या गोठ्यात हवा खेळती ठेवावी. करडांना खाद्य देण्याच्या व दूध पाजण्याच्या वेळा नियमित पाळाव्यात. • कोंबड्या - उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शेडचे तापमान 37 अंश से. च्या वर जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. • उन्हाच्या गरम झळा येऊ नयेत म्हणून उन्हाच्या दिशेने पडदे अथवा पोती लावावीत व त्यावर पाणी शिंपडत राहावे. पडदे लावताना पोल्ट्री शेडचे, कोंबडीघराचे वायुवीजन व्यवस्थित राहील याची दक्षता घ्यावी, • कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यामध्ये उष्मांक कमी प्रमाणात व प्रथिने जास्त प्रमाणात असावीत, त्यामुळे आहारक्षमता वाढते, तसेच आहारातील जीवनसत्त्वे, क्षार व अमिनो आम्ले यांच्या प्रमाणात वाढ करावी, विशेषतः "क' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवणे आवश्येक असते. खाद्याच्या भांड्यात अधूनमधून हात फिरवावा म्हणजे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते, तसेच खाद्य ओलसर करून द्यावे. • सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत अधिक असते. या कालावधीत भूक मंदावते त्यामुळे कोंबड्यांना थंडीच्या वेळी उदाः पहाटे व संध्याकाळी अधिक प्रमाणात खाद्य देण्याची व्यवस्था करावी.अधिक माहिती साठी डॉ. गोपाल मंजुळकर ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क करावा
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी तीळ पिकास फुलोरा अवस्थेत स्प्रिंकलरने पाणी देण्याचे टाळावे. • उन्हाळी मुग पिकावर फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया फवारावा. • उन्हाळी सूर्यफुलास नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी लगेच पाण्यासोबत द्यावा. • उन्हाळी भुईमुगाची फुलोरा ते आऱ्या लागणे ह्या महत्वाच्या अवस्था असून या दरम्यान पाण्याची कमतरता पडू देऊ नये. • माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेताना १ फुट थरातील घ्यावा व तो लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवावा. • पाणी परीक्षण करतेवेळी नवीन केलेल्या विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा नमुना घेताना मोटार पंप १० मिनिट सुरु ठेऊन नंतर पाण्याचा नमुना घ्यावा व प्रयोगशाळेत पाठवावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• कांदा पिकाची काढणी सुरु करावी, काढणी झाल्यावर दुसरया ओळीतील काढलेल्या कांद्याची पात पहिल्या ओळीतील कांद्यावर झाकण म्हणून टाकावी. • हळद बेने व्यवस्थित साठवावे. साठवानुकीपुर्वी गट्टू बेने क्विनोल्फोस ३ मिली अधिक कार्बेन्डाझीम १ ग्राम १ लिटर पाण्यात घेऊन फवारावे व हवेशीर साठवावे. • हस्त बहार लिंबू फळांची काढणी करावी फळांची प्रतवारी करून बाजारात पाठवावी. • संत्रा मृग बहराच्या फळांची काळजी घ्यावी व नियमित ओलीत करावे. • आंबिया बहाराच्या संत्रा फळबागांना नियमित ओलीत करावे. • फळझाडांच्या खोडांचे उन्हापासून संरक्षणासाठी १:१:१० तीव्रतेचे बोर्डो मलम लावावे. • फळझाडांच्या आळ्यात काडीकचरा, पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. ठिबक सिंचन/मटका सिंचनाने ओलीत करावे.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
कोंबड्यांची उन्हाळ्यातील काळजी • नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत. त्यानंतर धुतलेल्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. • गाळलेल्या पाण्याचा पक्ष्यांना पुरवठा करावा. • पक्ष्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार वाढवून द्यावी. 0.5 चौ. फूट प्रतिपक्षी जागेपासून ते एक चौ.फूट प्रतिपक्षी जागा द्यावी. • पक्षी प्रमाणापेक्षा जास्त ठेवून गर्दी वाढवू नये. कमी जागेमुळे पक्ष्यांची वाढ खुंटते. • पक्ष्यांची गादी वेळोवेळी ओली झाल्यास त्वरित ती बाहेर काढून त्या ठिकाणी कोरडे तूस टाकावे. • वेळोवेळी गादी खाली वर करून घ्यावी, त्यामुळे पक्षीघरातील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. • पक्षीघरातील गादीमध्ये ओलावा असल्यास पाच ते सात किलो पांढरा चुना दर 100 चौ. फूट जागेवरील गादीत मिसळून घ्यावा. त्यामुळे गादी कोरडी राहण्यास व गादीतील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. • खाद्याची भांडी पूर्णपणे भरू नयेत. भांड्यामध्ये दोन-तृतीयांश एवढे खाद्य भरावे. त्यामुळे वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण राहते. • दिवसातून तीन ते चार वेळा खाद्य विभागून पक्ष्यांना द्यावे. त्यामुळे पक्ष्यांमधील खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते. • उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना खाद्य थंड वातावरणामध्ये द्यावे. भर उन्हामध्ये पक्ष्यांना खाद्य देऊ नये. • खाद्य साठवून ठेवताना ओलसर व दमट जागी साठवून ठेवू नये. त्यामुळे खाद्यामध्ये बुरशी फैलावण्याची दाट शक्यता असते. • अधूनमधून खाद्याची भांडी बुरशीसाठी तपासून घ्यावीत. भांड्यांमध्ये बुरशी आढळून आल्यास ती स्वच्छ धुवावीत व उन्हामध्ये पूर्णपणे वाळवून मगच वापरावीत. • पिल्लांची अथवा पक्ष्यांची मरतूक झाली असल्यास त्यांना लागलीच बाजूला करून रोग निदानासाठी जवळील प्रयोगशाळेमध्ये दाखल करावे. • शेडमध्ये आजारी पक्षी आढळून आल्यास लागलीच बाजूला ठेवून त्वरित उपचार करावेत. • पक्षीघरातील मृत पक्षी लवकरात लवकर बाहेर काढावे व उघड्यावर कधीही टाकू नयेत. त्यांची जाळून विल्हेवाट लावावी, अन्यथा रोग पसरण्याची शक्यता असते. • पक्ष्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा. • पक्ष्यांना लसीकरण अथवा हाताळणी केल्यावर त्यांच्यावरील ताण कमी करणारी औषधे पाण्यामधून द्यावीत उदा. लिवर टोनिक किवा ताण कमी करणारी औषधे. • अधूनमधून शेडमधील पक्षी हलवावेत. त्यामुळे पक्षी नव्या उमेदीने खाद्य खातात. त्यांच्या विक्रीच्या वजनात वाढ होण्यास मदत होते. • वेळोवेळी शेडला लावलेले पडदे वर करावेत, त्यामुळे पक्षिघरातील हवा खेळती राहण्यास मदत होते. • अधिक माहिती साठी डॉ. गोपाल मंजुळकर ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क करावा
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुईमुगाची फुलोरा ते आऱ्या लागणे ह्या महत्वाच्या अवस्था असून या दरम्यान पाण्याची कमतरता पडू देऊ नये. • गहू व हरभरा पिकांची साठवणूक करताना ओलावा १४ टक्यापर्यंत कमी असणे आवश्यक आहे. • मातीची उलथापालथ होण्याकरिता उन्हाळी नागरटी लवकरात लवकर करून घ्यावी. जेणेकरून किडींचे कोश नष्ट होतील व जमिनीची सुधारणा होण्यास मदत होईल. • माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेताना १ फुट थरातील घ्यावा व तो लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवावा. • माती परीक्षानाप्रमाणेच पाणी परीक्षण सुद्धा करणे गरजेचे आहे. नवीन केलेल्या विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा नमुना घेताना मोटार पंप १० मिनिट सुरु ठेऊन नंतर पाण्याचा नमुना घ्यावा व प्रयोगशाळेत पाठवावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• लसूण पिकाची काढणी करावी. पिकामध्ये ७५% माना पडल्यापासून १ आठवड्यापर्यंत लसणाची काढणी करावी आणि तीन दिवस पात पूर्णपणे वाळेपर्यंत शेतात सुकवणी करून नंतर ७ दिवस सावलीत सुकवावी. पतीसहित जुड्या बांधून किवा पात कापून ३ सेमी मान ठेवून निवडक गड्ड्यांची जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते. • हळद पिकाची काढणी करावी. नवीन लागवडीसाठी जेठे गड्डे वेगळे करावे. उर्वरित अंगठे गड्डे, करंगळी गड्डे उकड्ण्यासाठी ठेवावे. • टरबूज पिकामध्ये फळे परिपक्वतेच्या काळात पाणी देणे कमी करावे म्हणजे फळांना तडे जाऊन फळे फुटणार नाही. • नवीन लावलेल्या फळझाडांच्या आळ्यात पाचट, गवताचे काड, लाकडाचा भुसा आणि पाला-पाचोळा या पदार्थाचे आच्छादन करावे. आच्छादन करतांना सेंद्रिय घटक बारीक केल्यास फायदा होतो. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सेंद्रिय घटकामध्ये शिफारसीत प्रमाणात कीडनाशक पावडर मिसळावी. काळ्या पोलिथिनचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. • उन्हाळ्यातील पाण्याचे उत्सर्जन कमी होण्यासाठी ५% केओलीन ची पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. • ठिबक सिंचनाचा तसेच सूक्ष्म तुषार सिंचनाचा वापर करावा. • पाण्याची उपलब्धता कमी असल्यास प्रवाही पद्धतीने पाणी देण्यासाठी वाफ्याची चौकोनी बांधणी करून घ्यावी. चौकोनातून करणाच्या पद्धतीचा आडवा वरंबा टाकून वाफ्याचे दोन समभाग करावेत. प्रत्येक वेळी अर्ध्या वाफ्यास पोच पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची बचत करता येते. बागेला शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे. • दुष्काळी परिस्थितीत फळझाडांची तग धरून राहण्याची शक्ती किवा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानावर एक ते दिड टक्के पोटयाशीअम नायट्रेट ची फवारणी करावी. • संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू इत्यादी लिम्बुवर्गीय फळझाडाना दुहेरी आले पद्धतीने पाणी द्यावे. • उन्हाळ्यामध्ये संत्रा तसेच मोसंबी आंबिया बहराची फळगळ कमी करण्यासाठी एनएए,१० पिपिएम (१० मिलीग्राम प्रती लिटर पाणी) तीव्रतेची फलधारणा नंतर १५ ते २० दिवसानंतर फवारणी करावी. किवा १.५ ग्राम जि.ए आणि १०० ग्राम कॅर्बेन्दाझीम आणि एक किलो युरिया यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी. १५ दिवसानंतर परत एकदा फवारणी करावी. • उन्हाळ्यात पाण्याची खूप कमतरता असल्यास झाडे जगविण्यासाठी झाडावरील फळांची संख्या कमी करावी तसेच अनावश्यक फांद्याची छाटणी करावी. • बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे. • संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू फळझाडांना जमिनीपासून ३ फुट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. • संत्रा, मोसंबी फळझाडांना मृग बहराचा ताण देण्यासाठी हलक्या जमिनीत ३० ते ३५ दिवस, मध्यम जमिनीत ४० ते ५० दिवस तसेच भारी जमिनीस ६० ते ७० दिवसाचा ताण द्यावा.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
सद्यस्थितीत जनावरांचे व्यवस्थापन • संकरित जनावरांना २७ तर देशी जनावरांना ३७ डिग्री पेक्षा जास्त तापमान घातक असते. • सध्या तापमान ४० डिग्री पेक्षा जास्त किंवा आसपास आहे. त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. • उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा किंवा थोडाही हिरवा चारा न देता केवळ वाळल्या गवतावर किंवा कडब्यावर जनावरांचे संगोपन केले जाते. • उन्हाळ्यात चाऱ्याच्या शोधात, तसेच जनावरांना चारण्यासाठी खूप दूरवर उन्हात चालवत नेले जाते. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच माळरानावरील, डोंगरावरील वाळले गवत जनावरांनी खरडून खाल्लेले असते. • त्यामुळे भर उन्हाळ्यात बाहेर खूप अंतर फिरूनही त्यांना पुरेसा चारा मिळत नाही. जनावरांना चारा नसताना खूप दूर अंतर चालवल्यामुळे जनावरांची पोषणमूल्यांची गरज तर पूर्ण होत नाहीच, याउलट शरीरातील पोषणमूल्यांचा फिरून फिरून ऱ्हास होतो. • त्यामुळे जनावरे वरचेवर अशक्त होत जातात. दूधउत्पादनात घट होत राहते. • गाभण जनावरांत गर्भपात होतो किंवा वासरे अशक्त जन्मतात. • हे सर्व टाळण्यासाठी जनावरांना उन्हाळ्यात पाणी व चारा उपलब्ध असेल त्या ठिकाणीच चरायला घेऊन जावे. • तसेच चराऊ कुरणाच्या उपलब्धतेनुसार जनावरांना पुरेसा खुराक पशुखाद्य द्यावे. • अधिक माहिती साठी डॉ. गोपाल मंजुळकर ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क करावा