Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

DECEMBER 2015

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• गहू पिक काही ठिकाणी पिवळे पडत असल्यास त्या ठिकाणी युरिया देऊन पाणी द्यावे. • गहू पिकात पेरणीपासून ३० ते ४० दिवसानंतर मेट सल्फुराँन मिथाईल किंवा २, ४ – डी या पैकी एका तणनाशकाची फवारणी घ्यावी. • हरभ-याला पाणी देत असताना त्याच्या कळी अवस्थेत द्यावे, ५० टक्के फुलोरा अवस्थेत हरभरा पिकाला पाणी देऊ नये. • वातावरणात धुवारी पडल्यानंतर हरभ-यावर 1 टक्का 19:19:19 फवारावे. • तुरीवर शेंगा भरत असताना २ टक्के (२०० ग्राम) डी. ए. पी. फवारावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• कांदेबाग लागवडीच्या केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाली असेल तर ठीबकद्वारे द्यावयाची विद्राव्य खते १९;१९:१९, २५ किलो व युरिया २५ किलो प्रती एकर या प्रमाणात ४६ ते ७० दिवसा दरम्यान टप्प्या-टप्प्याने द्यावी. • कांदेबाग लागवडीबरोबर वारारोधक वनस्पतीची (शेवरी) दोन ओळीत दाट लागवड करावी. • बटाटा पिकास लागवडीनंतर दुसरा खताचा हफ्ता द्यावा. खते देतांना युरिया- ७० किलो + कॅल्शिअम नायट्रेट २५ किलो + मग्नेशियम सल्फेट १५ किलो /एकरी द्यावे. • कांदा रोपांची रोपवाटिकेत काळजी घ्यावी. रोपांवर १९:१९:१९, ४० ग्राम + कार्बेन्डाझीम १० ग्राम + डायमिथोइट १५ मिली + स्टीकर १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कागदी लिंबाच्या हस्त बहाराची फळे असलेल्या झाडावर झिंक सल्फेट ५० ग्राम + फेरस सल्फेट ५० ग्राम + कळीचा चुना ४० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कागदी लिंबाच्या पानावर खैरया रोगाचे तांबूस/तपकिरी रंगाचे ठिपके आढळल्यास streptocyclin १ ग्राम + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मेथी, पालक भाज्यांची टप्प्या-टप्प्याने लागवड करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
शेळ्यांचा फुफ्फुसदाह (न्युमोनिया) – • पावसाळा व हिवाळ्यात हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. कारणे – • जीवाणू, विषाणू व बुरशी यांचा प्रादुर्भाव, वातावरणात अचानकपणे होणारा बदल आणि शेळ्यांना जास्त थंडी असलेल्या जागेवर बांधणे इत्यादी कारणांमुळे शेळ्यांना फुफ्फुसदाह होतो. लक्षणे – • शेळ्यांना भरपूर ताप येतो, त्या चारा खाणे बंद करतात. शेळ्या ठसकतात, त्यांच्या नाकातून चिकट पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो. शेळ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. उपचार - • पशुतज्ञाच्या सल्ल्याने शेळ्यांना प्रतिजैवक इंजेक्शनो द्यावे. • आजारी शेळ्यांना ताप येतो त्यामुळे तापनाशक आणि वेदनाशामक इंजेक्शन द्यावीत. • आजाराच्या प्रतिबंधासाठी शेळ्यांचा वातावरणातील बदलापासून बचाव करावा. शेळ्यांना थंडीपासून संरक्षित करावे. • योग्य व्यवस्थापन असेल तर या आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करता येते. प्रथमोपचार – • एका बादलीत गरम पाणी घेऊन त्यात निलगिरीचे तेल किवा विक्स मिसळून त्याचा वाफारा शेळ्यांना द्यावा. शेळ्यांना कापूर 1 ग्रॅम व ज्येष्ठमध 4 ग्रॅम यांचे गुळामध्ये मिश्रण दिल्याने लवकर आराम पडतो.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• हरभ-याला पाणी देत असताना त्याकच्या कळी अवस्थे त द्यावे, ५० टक्के फुलोरा अवस्थेत हरभरा पिकाला पाणी देऊ नये. • वातावरणात धुवारी पडल्यानंतर हरभ-यावर 1 टक्का 19:19:19 फवारावे. • तुरीवर शेंगा भरत असताना २ टक्के (२०० ग्राम) डी. ए. पी. फवारावे. • गहू पिकाच्या उशीरा लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७ हे वाण वापरावे व बियाणे 50 किलो प्रति एकरी वापरावे • गहू पिकात पेरणीपासून ३० ते ४० दिवसानंतर मेट सल्फुराँन मिथाईल किंवा २, ४ – डी या पैकी एका तणनाशकाची फवारणी घ्यावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग बहराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. झाडाचे आळ्यात पाला-पाचोळ्याचे ४ इंच जाड आच्छादन करावे. • कागदी लिंबाच्या हस्त बहाराची फळे असलेल्या झाडावर झिंक सल्फेट ५० ग्राम + फेरस सल्फेट ५० ग्राम + कळीचा चुना ४० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कागदी लिंबाच्या पानावर खैरया रोगाचे तांबूस/तपकिरी रंगाचे ठिपके आढळल्यास streptocyclin १ ग्राम + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कांदा रोपांना नर्सरी मध्ये नियमित ओलीत करावे. रोपांचे कीड व रोगापासून संरक्षण करावे. • पालक, मेथी पालेभाज्यांची लागवड करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
------------------------------------------
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• जनावरांच्या गोठ्यात आणि कोबड्यांच्या शेडमध्ये येणाऱ्या थंड वाऱ्याला अटकाव करण्यासाठी सर्व बाजूने बारदाना लावावा किंवा इतर प्रतिबंधक उपाययोजना करावी. • एका महिन्यापर्यंतच्या वासरांची विशेष काळजी घ्यावी. लहान वासरे व गाभण गाईंच्या बसण्याच्या ठिकाणी भुश्यालच्या आच्छादनाचा वापर करावा. गाभण जनावरांची वेगळी व्यवस्था अधिक उबदार ठिकाणी करावी. जेणेकरून त्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल. • नवजात वासरांचे थंडीपासून संरक्षण करावे. लहान वासरे, वगारी, रेडे हिवाळ्यात थंडी सहन न करू शकल्यामुळे मृत्युमुखी पडतात त्यासाठी वासरांना व करडांना झाकून किवा पांघरून घ्यावे. • थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्रभर गोठ्यातच ठेवावीत. • जनावरांच्या वापरासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. • थंडीचा जोर अधिक असल्यास उष्णतानिर्मितीसाठी शेकोटी, विद्युत बल्बचा वापर करावा. • विणा-या गायी किवा म्हशींना उबदार ठिकाणी ठेवावे अन्यथा विलेल्या जनावरांचा जार पडण्यास विलंब होतो, अश्या जनावरांना कॅल्शियमची कमतरता होऊन चायापचायाचे आजार होऊ शकतात • कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचीही या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता कोंबड्याच्या खाद्यात अधिक ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून पक्षांची वाढ व्यवस्थित होईल व मरतुक टाळता येईल. • पिलांना जास्त उब द्यावी त्यासाठी आठवड्याला खालीलप्रमाणे पिलांच्या शरीराचे तापमान राहील याची व्यवस्था करावी.
    पहिल्या आठवडा - 95 अंश फॅरनहाइट,
    दुसरा आठवडा - - 90 अंश फॅरनहाइट,
    तिसरा आठवडा - 85 अंश फॅरनहाइट.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• गव्हाच्या पेरणी नंतर २1 दिवसांनी मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत ५० किलो युरिया प्रती एकरी द्यावा. • वातावरणात धुवारी पडल्यावनंतर हरभ-यावर 1 टक्का 19:19:19 फवारावे. • तुरीवर शेंगा भरत असताना २ टक्के (२०० ग्राम) डी. ए. पी. फवारावे. • गहू पिकाच्या उशीरा लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७ हे वाण वापरावे व बियाणे 50 किलो प्रति एकरी वापरावे • गव्हाची पेरणी करताना ८० किलो १०:२६:२६ + २५ किलो युरिया एकरी द्यावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• कागदी लिंबाच्या हस्त बहाराची फळे असलेल्या झाडावर झिंक सल्फेट ५० ग्राम + फेरस सल्फेट ५० ग्राम + कळीचा चुना ४० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मृग बहराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. झाडाचे आळ्यात पाला-पाचोळ्याचे ४ इंच जाड आच्छादन करावे. • कागदी लिंबाच्या पानावर खैरया रोगाचे तांबूस/तपकिरी रंगाचे ठिपके आढळल्यास streptocyclin १ ग्राम + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • पालक, मेथी पालेभाज्यांची लागवड करावी. • कांदा रोपांना नर्सरी मध्ये नियमित ओलीत करावे. रोपांचे कीड व रोगापासून संरक्षण करावे.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
-------------------------------------
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• या आठवड्यामधे थोडी थंडी वाढली असून जनावरांना थंडीपासून जपणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, व लहान पिल्लांची मरतुक थांबाविण्यासाठी विशेषतः लहान वासरे व करडे यांचे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये गाई, म्हशींच्या शरीरपोषणासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. हिवाळ्यात जनावरांना आपले शरीर उबदार ठेवणे गरजेचे असते, यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. म्हणूनच जनावरांना नेहमीच्या खुराकापेक्षा पाच ते दहा टक्के जास्तीचा खुराक द्यावा. याशिवाय खनिज क्षारांचा पुरवठा करावा. • रोजच्या शारीरिक क्रिया व्यवस्थितरीत्या होण्यासाठी योग्य प्रमाणात ताजे, स्वच्छ पाणी द्यावे. दुधाळ गाई-म्हशींना जास्त पाण्याची गरज असते. जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. याकरिता साठविलेल्या पाण्यापेक्षा विहीर, कूपनलिकेच्या माध्यमातून उपसलेल्या पाण्याचा वापर करावा. हे पाणी तुलनेने कमी थंड असते. • थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यास विशेष अपाय होत नाही; मात्र गोठ्यातील जागा कोरडी ठेवावी. गोठ्यात शेण-मूत्र साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जर गोठ्यात सिमेंटचा कोबा असेल तर त्यावर भुश्शाचा थर टाकावा. कारण हा कोबा जास्त थंड असतो. • हवेतील गारव्यामुळे जनावरांना सर्दी- पडसे होतात, वेळीच उपचार केले नाहीत तर जनावरांना फुफ्फुसदाह होऊ शकतो. यासाठी गोठ्यात पोते किंवा इतर आच्छादनाचा वापर करावा. थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठ्यामध्ये विद्युत दिवे लावावेत. • नवजात वासरांचे थंडीपासून संरक्षण करावे. बऱ्याच वेळा थंडी सहन न झाल्यामुळे वासरे, वगारी मृत्युमुखी पडतात. वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हात अवश्य् ठेवावे. यापासून त्यांना उबदारपणा मिळतो, शिवाय "ड' जीवनसत्त्वदेखील मिळते. उबदारपणासाठी अशक्त वासरांना पोत्याने लपेटावे.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• तुरीवर शेंगा भरत असताना २ टक्के (२०० ग्राम) डी. ए. पी. फवारावे. • गहू पिकाचे चांगले उत्पन्न होण्याकरिता लवकरात लवकर पेरणी करावी, लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७, ए.के.डब्लू. – ३७२२, पूर्णा, शरद, डब्लू. एस. एम. – १४७२ यापैकी एक वाण निवडावे, व गव्हाची लागवड/पेरणी लवकर आटोपावी • मोहरी लागवडीसाठी पुसा बोल्ड हा जाड दाण्याचा वाण वापरावा. • गव्हाची पेरणी करताना ८० किलो १०:२६:२६ + २५ किलो युरिया एकरी द्यावा. • गव्हाच्या पेरणी नंतर २० दिवसांनी मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत ५० किलो युरिया प्रती एकरी द्यावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• कांदा बीजोत्पादनासाठी कांद्याची लागवड पूर्ण करावी. • रोप वाटीकेत उन्हाळी कांदा लागवडीसाठी बियाणे पेरणी आटोपावी. • कागदी लिंबू फळ झाडांना नियमित ओलीत करावे. हस्त बहार धरला असेल तर फळे चांगली पोसण्यासाठी झिंक सल्फेट ५० ग्राम, फेरस सल्फेट ५० ग्राम, चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • बटाटा लागवड पूर्ण करावी. लागवडीसाठी कुफरी ज्योती वाणाचा वापर करावा. लागवडीपूर्वी बेण्यास डोळे फुटू द्यावे व नंतर कार्बेन्डाझीम १० ग्राम १० लिटर द्रावणात बुडवून प्रक्रिया करावी. • टोमाटोचे रोपे लागवड करताना सरी वरंब्याच्या वाफ्यामध्ये ६० बाय ६० से. मी. किंवा ७५ बाय ६० से. मी. अथवा ९० बाय ३० से. मी. अंतरावर लावावे. • वाटणाची लागवड आटोपावी हेक्टरी २५ ते ३५ किलो बियाणे वापरावे. बियाणे सपाट वाफ्यात बी टोकून ४५ बाय १० से. मी. अंतरावर लावावे. • मुळा, गजर, पालेभाज्यांची लागवड करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• वेलवर्गीय पिकामधील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी डिनोकॅप 10 मिली किंवा ट्रायडेमॉर्फ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी • कांद्यावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनाकरीता 30 ग्रॅम डायथेन एम 45 किंवा 10 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी • लिंबूवर्गीय फळझाडांवरील अंबीया बहाराचे फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर लगेचच झाडावर कार्बेंडाझिम एक ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • लिंबू किंवा संत्र्यावरील सायला किंवा पाने खाणा-या किडीच्या व्यवस्थापनाकरीता इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली किंवा डायमेथोएट 1.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवशकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. दरवेळी कीटकनाशक बदलून वापरावे. • हरभरा पिकामध्ये हेलिकोवर्पाच्या व्यवस्थापनाकरीता एकरी 4 ते 5 कामगंध सापळे उभारावेत
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
शेळ्यांची हिवाळ्यातील घ्यावयाची काळजी :- • सध्याच्या हवामानात शेळ्यांचे थंडीपासून तसेच आर्द्रतायुक्त हवेपासून बचाव करण्यासाठी शेळ्यांच्या गोठ्यात ऊबदार वातावरण राहावे म्हणून साधारण 2 ते 3 फूट उंचीपर्यंत 1000 ते 1500 वॅटचे बल्ब लावावेत. थंड गोठ्यात शेकोटी लावून तापमान वाढविता येते. बोचऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यासोबती रिकाम्या बारदानाचे कुंपण करावे. • शेळ्या बसण्याची जागा मलमूत्रामुळे ओली होते. ही ओल फुफ्फुसदाह, कमरेचा अर्धांगवायू तर छोट्या करडांमध्ये गारठल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी शेळ्यांना बसण्यासाठी गोठ्यात मचाण तयार करावे. रात्रीच्यावेळी गोठ्यात वाळलेले गवत किंवा रिकामे बारदाना अंथरावे जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा शेळ्यांना त्रास होणार नाही. • ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी भुरभुरावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जीवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. गोठ्याची जागा कोरडी ठेवण्यास मदत होते. • ऊन पडल्यानंतर शेळ्या गोठ्याच्या बाहेर काढाव्यात म्हणजे गोठे सुकण्यास मदत होते. शेळ्यांचा कळप मोठा असेल आणि शेळ्यांमध्ये हगवणीची समस्या असेल तर गोठे साफ करताना जंतुनाशकाचा वापर करावा. शेळ्यांचे आहार व्यवस्थापन :- • आपल्याकडे बहुसंख्य शेळ्या या चराऊ पद्धतीने पाळल्या जातात, त्यामुळे शेळ्यांना चरावयासाठी नेताना काळजी घ्यावी. प्रामुख्याने सकाळच्या वेळी हवेत धुक्यापचे प्रमाण जास्त असते, गवतावरही दव पडलेले असते. याचा विपरीत परिणाम शेळ्यांवर होतो. • शेळ्यांना श्वचसनाचे आजार उदा. सर्दी, खोकला, घशाचा दाह, फुफ्फुसदाह होतो. गवतावरील दवामुळे ओठावर व नाकावर मावा येणे व त्याचे रूपांतर जखमांमध्ये होणे या समस्या दिसतात. हे लक्षात घेऊन चांगले ऊन पडल्यावरच शेळ्यांना चरावयास न्यावे. • जर हवामान आर्द्रतायुक्त व थंड असेल तर शेळ्यांना गोठ्यामध्ये चारापाणी करावे. चारा उपलब्ध नसल्यास कडुलिंब, बाभूळ, शेवरी, शेवगा, पिंपळ, उंबर यासारख्या झाडांच्या पाल्याचा वापर करावा. शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा हिरवा चारा देताना पाल्याचे प्रमाण 60 ते 70 टक्यांास पेक्षा जास्त असू नये, याची दक्षता घ्यावी म्हणजे पोटफुगी, अतिसार असे आजार होणार नाही. • येत्या काळात चाराटंचाई लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारासाठी लिंब, बाभूळ, सुबाभूळ, दशरथ, लसूण घास, सौंदळ, यांचा पाला, तसेच शेंगा वाळवून साठवून ठेवाव्यात. स्वच्छ पाणी द्या, लसीकरण करा - • थंड हवामान या प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना प्रामुख्याने श्व.सन संस्थेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यात सर्दी, खोकला कायम दिसून येतो. अशा वेळी शेळ्यांचा नाकावरून टर्पेंटाईनचा बोळा फिरवणे उपयुक्त ठरते. मात्र तरीदेखील सर्दी आटोक्यासत न आल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करण्यात यावा. • थंड हवामानात शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व कोमट पाण्याचा पुरवठा करावा. त्यात पोटॅशियम परमॅंग्नेटचा योग्य प्रमाणात वापर करावा. जेणेकरून पाण्याद्वारा होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल. सध्या पीपीआर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्यासाठी लसीकरण करावे.