Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

October 2015

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
सोयाबीन हे बियाण्यासाठी ठेवावयाचे असल्यास मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० फेरे प्रती मिनिट एवढा ठेवावा. सोयाबीन साठवायचे असल्यास त्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त नसावे. कपाशीचे बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी एक टक्का पोटँशीअम नायट्रेट (१०० ग्राम १३:०:४५ १० लिटर पाण्यात) फवारावे. कपाशीचे लाल्यापासून संरक्षण करण्यासाठी १०० ग्राम मँग्नेशियम सल्फेट + १०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रबी हंगामात हरभऱ्याची पेरणी करत असताना बियाण्यास ३ ग्राम कार्बेन्डॅझिम प्रती किलो बियाण्यास लावणे आवश्यक आहे. हरभरा पिकाच्या जाकी ९२१८ व दिग्विजय या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती लावाव्यात. प्रती एकरी ५० किलो. डी.ए.पी. व २० किलो पोट्याश द्यावे. सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर तूर पिकावर २ टक्के (२०० ग्राम १० लिटर पाणी ) युरियाची फवारणी करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
लिबूवर्गीय फळे:- मृग बहाराची फळे असलेल्यान संत्रा झाडांना बांबुंचा आधार द्यावा. कागदी लिंबू हस्तळ बहार घेण्यााकरीता 1 महीन्या चा ताण संपवावा. यावेळी 40 किलो शेणखत अधिक 5 किलो निंबोळी ढेप अधिक 2 किलो 15:15:15 खत प्रत्येकक झाडाला (6 वर्ष पुढील वयाची) द्यावेत. लिंबूवर्गीय फळ झाडांना जमिनीपासून १ मीटर उंचीपर्यंत १:१:१० तिव्रतेचे बोर्डोमिश्रण लावावे. कांदा:- कांदा पिकाला एकरी 55 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, 10 किलो गंधक गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत मिसळून घ्यावीत. कांदा लागवड करताना दोन ओळीमध्ये 12 सें.मी. व दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी ठिबक चालवून बेड चांगला ओला करून घ्यावा. रोपे कार्बेन्डाझीम 3 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात बुडवून लावावीत. लागवडीपूर्वी जमिनीवर बासालीन किंवा गोल तणनाशक 15 मिली 10 लिटर पाण्यालत घेवून फवारावे. लसूण:- लसूण लागवड पूर्ण करावी. लागवडीचे वेळी ४५ किलो युरिया, १२५ किलो सुपर फॉस्फेट व ३५ किलो पालाश द्यावा. हळद :- हळद पिकामध्ये नियमित ओलीत करावे. कंदांना मातीची चांगली भर दयावी. कंद उघडे पडणार नाहीत याची काळजी घ्याहवी. कोथिंबिर, लसुण, मुळा, मेथी, पालक, बटाटा,गवार इत्या्दी पिकांची लागवड करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
वांग्यावरील शेंडे आणि फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनाकरीता कीडग्रस्त शेंडे अळीसह तोडून नष्ट करावेत. एकरी 5 ते 6 कामगंध सापळे (वोटा टी ट्रॅप) लावावेत. केळी बागेचे सातत्याने निरिक्षण करावे. बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच 10 ग्रॅम कार्बेंडाझिम आणि त्यानंतर 15 दिवसांनी 10 मिली प्रॉपिओकोनॅझोल प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. गोनोसेफॅलम भुंग्याच्या (काळी म्हैस) प्रादुर्भावामुळे हरभ-याचे नुकसान होऊ नये याकरीता पेरणीचे वेळी एकरी 4 किलो फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. तुरीवरील शेंगा पोखरणा-या हिरव्या अळीच्या (हेलिकोवर्पा) व्यवस्थापनाकरीता पीक फुलकळी अवस्थेत असतांना एकरी 4 कामगंध सापळे लावावेत. तुर पिकास फुलकळी येवू लागताच प्रतिबंधक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांसाठी लसूणघास एक पौष्टिक चारा लसूणघास हे उत्तम चारा पीक आहे. याची लागवड केल्यास फायद्याचे ठरेल. लसूणघास हे द्विदल प्रकारातील चारापीक आहे. लुसलुशीत, हिरवेगार व पौष्टिक असते. इतर चारापिकांपेक्षा लसूणघासात जास्त प्रथिने आढळतात. या चारापिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करतात. शक्य तो जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू 7 ते 8 इतका असावा. पूर्वमशागत म्हणजे जमीन भुसभुशीत व तण विरहित असावी. या पिकाची लागवड रब्बी हंगामात करतात, कारण पिकाच्या चांगल्या उगवणीसाठी थंड हवामान अनुकूल आहे. लसूण घासाची पेरणी वेळेत केल्यास उगवण चांगली होते. शक्यातो पेरणीसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला असतो. लसूण घासाच्या बियाण्यात अमरवेलाचे बियाणे असू नये याची दक्षता घ्यावी. जर असेलच तर पेरणीपूर्वी बी चाळून घेतल्यास घासापेक्षा बारीक असलेले अमरवेलाचे बी तसेच तणाचे बी चाळणीतून निघून जाते. पेरणीसाठी हेक्टरी 25 ते 30 कि. बियाणे वापरावे. दोन ओळीत 25 ते 30 से.मी. अंतर ठेवावे. लागवडीसाठी सुधारित वाण आरएल 88 याची लागवड करावी. लसूण घास बहुवर्षीय पीक असल्याने वाफे रुंद व उंच ठेवावेत, तसेच वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंचही ठेवू नयेत, कारण पावसाळ्यात वाक्यात जास्त पाणी साचून त्यास मर हा रोग लागतो व घास विरळ होत जातो. वाफे बांधण्यापूर्वी जमिनीत हेक्टरी 40 गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत चांगले मिसळून द्यावे, तसेच लसूण घास स्फुरद व पालाश या खतांना चांगला प्रतिसाद देतो पेरणीपूर्वी हेक्टरी 20 कि. ग्रॅ. नत्र, 150 कि.ग्रॅ. स्फुरद आणि 40 कि.ग्रॅ. पालाश या प्रमाणात द्यावे, याशिवाय पिकाची जोमदार वाढ टिकवण्यासाठी दर 4 महिन्यांनी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नत्र + 50 कि.ग्रॅ. स्फुरद अथवा 100 कि. डी.ए.पी. याप्रमाणे वरखताच्या मात्रा द्याव्यात. अशा प्रकारे हेक्टरी 100 ते 120 टन हिरवा पौष्टिक चारा जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

सोयाबीनची काढणी करताना सोयाबीन जमिनीपासून कापावे. सोयाबीन हे बियाण्यासाठी ठेवावयाचे असल्यास मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० फेरे प्रती मिनिट एवढा ठेवावा. सोयाबीन साठवायचे असल्यास त्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त नसावे. कपाशीचे बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी एक टक्का पोटँशीअम नायट्रेट (१०० ग्राम १३:०:४५ १० लिटर पाण्यात) फवारावे. कपाशीचे लाल्यापासून संरक्षण करण्यासाठी १०० ग्राम मँग्नेशियम सल्फेट + १०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रबी हंगामात जवस पिकाची कोरडवाहू पेरणी ऑक्टोबरच्या दुसरया आठवड्यात व बागायती पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करावी. रबी हंगामात हरभऱ्याची पेरणी करत असताना बियाण्यास ३ ग्राम कार्बेन्डॅझिम प्रती किलो बियाण्यास लावणे आवश्यक आहे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
लिबूवर्गीय फळे:- मृग बहाराची फळे असलेल्या- संत्रा झाडांना बाबुंचा आधार द्यावा. आंबिया बहाराची संत्रा फळांची गळ कमी होण्याझकरीता एनएए 1 ग्रॅम अधिक कार्बेन्डाोझिम 100 ग्रॅम युरिया 1 किलो 100 लिटर पाण्याबत मिसळुन फवारणी करावी. कागदी लिंबू हस्तम बहार घेण्याोकरीता 1 महीन्यााचा ताण 15 ऑक्टोमबरला संपवावा. यावेळी 40 किलो शेणखत अधिक 5 किलो निंबोळी ढेप अधिक 2 किलो 15:15:15 खत प्रत्येीक झाडाला (6 वर्ष पुढील वयाची) द्यावेत. कांदा:- हिवाळी कांदा पिकाची iq पुनर्लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेंन्डीपझमच्या) द्रावणात बुडवावी. कांदा पिकाला एकरी 55 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, 10 किलो गंधक गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत मिसळून घ्यावीत. कांदा लागवड करताना दोन ओळीमध्ये 12 सें.मी. व दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी ठिबक चालवून बेड चांगला ओला करून घ्यावा. रोपे कार्बेन्डाझीम 3 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात बुडवून लावावीत. लागवडीपूर्वी जमिनीवर बासालीन किंवा गोल तणनाशक 15 मिली 10 लिटर पाण्याात घेवून फवारावे. लसूण:- लसूण लागवडीची तयारी करावी. लागवडीसाठी गोदावरी, श्वेता या वाणांचा अवलंब करावा. लागवडीसाठी सपाट वाफे अथवा रुंद वरंबे तयार करावे. हेक्टीरी 500 किलो लसून पाकळया लागवडीसाठी लागतात. हळद :- हळद पिकामध्येर नियमित ओलीत करावे. कंदांना मातीची चांगली भर दयावी. कंद उघडे पडणार नाहित याची काळजी घ्याहवी. कोथिंबिर, लसुण, मुळा, मेथी, पालक, बटाटा,गवार, वाटाणा इत्याळदी पिकांची लागवड करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
फुलकोबी आणि पानकोबी या पिकामध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी ठिपक्याचा पतंग म्हणजेच डायमंड बॅक मॉथ या पाने खाणा-या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. कोबी रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर मोहरी पेरावी. किडीच्या अळयांचा प्रथम मोहरी पिकावर प्रादुर्भाव होतो त्याचे किडनाशकाद्वारे सहजपणे व्यवस्थापन करता येते. कांदा लागवडीकरीता रोप तयार करावयाचे असल्यास रोपवाटीकेची जागा दरवर्षी बदलावी. कांदा रोपवाटीकेच्या जमिनीस एक महिना अगोदर पाणी देऊन 150 - 200 गेजच्या पारदर्शक पॉलिथिनने झाकावे. त्यामुळे जमिनीतील रोगकारक बुरशी नष्ट झाल्यामुळे मर रोगापासून रोपांचे संरक्षण होते. कांदा रोपवाटीकेच्या वरील थरातील मातीमध्ये 5 ग्रॅम थायरम प्रति वर्ग मीटर या प्रमाणात मिसळावे. रोपावाटीकेमध्ये पेरणीनंतर 20 आणि 30 दिवसांनी कॅप्टन या बुरशीनाशकाचे 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावणाचे ड्रेंचींग करावे
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
लहान जनावरांमधील फुफ्फुसदाह (निमोनिया) हा जिवाणू, विषाणू, बुरशी व अस्वच्छता इत्यादी विविध कारणांमुळे होणारा आजार असून, सर्वच प्राणिवर्ग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, वराह इत्यादींना होतो. हा रोग ज्या प्रदेशात जास्त पाऊस, कोंदट दमट हवामान असते अशा प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतो. निकृष्ट गोठा व्यवस्थापन, (उदा. गोठ्यात घाण असणे, पिण्याचे स्वच्छ पाणी नसणे इ.) शेळ्यांची व जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, सकस आहाराची कमतरता, अशक्तपणा तसेच वातावरणात कडाक्यातची थंडी किवा जास्त आर्द्रता व शेळ्यांना जंताचा प्रादुर्भाव असेल तर फार लवकर होते. लक्षणे- जनावरांना थंडी वाजून ताप येतो, श्वायसोच्छ्वासाचा वेग वाढतो. श्वारस घेताना घरघर आवाज येतो, जनावरांना खोकला येतो. सुरवातीच्या अवस्थेत नाकपुड्यांतून पाण्यासारखा स्राव येतो, त्यानंतरच्या अवस्थेत (जुनाट निमोनिया) पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो. डोळ्यांतून पाणी वाहते, डोळे निस्तेज व मलूल बनतात. बऱ्याच शेळ्यांना, करडांना हगवण लागते. शेळ्यांत आणि करडांत लक्षणीय मर दिसते औषधोपचार - शिफारशीत प्रतिजैविकांचा वापर तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सतत पाच ते सात दिवस केल्यास जनावरे पूर्णपणे ठणठणीत बरी होतात. घरघुती उपचार - अडुळसा – ३० ग्राम, तुळस – २० ग्राम, कंटकरी – १० ग्राम, काळे मिरे – १० ग्राम, सुंठ / अद्रक – १० ग्राम, कासणी – २० ग्राम. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम व मोठ्या जनावरास ५० ग्राम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात. कापुर -४ ग्राम, पुदिना – ५ ग्राम, निलगिरी तेल – २० मिली, विंटरग्रीनतेल – २० मिली. एका भांड्यात १ लिटर गरम पाणी घेऊन त्यात वरील तेल ५-१० मिली टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी. प्रतिबंधात्मक उपाय - जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे, ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी टाकावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जीवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. गोठ्याची जागा कोरडी ठेवण्यास मदत होते. शेळ्या व जनावरे गोठ्याच्या बाहेर काढावेत म्हणजे गोठे सुकण्यास मदत होते.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
लिबूवर्गीय फळे:- फळे पिवळी पडणे, देठ सुकणे यासाठी व अधिक प्रमाणात फळगळ होत असल्यास, ताबडतोब कार्बन्डाझिम किंवा थायोफिनेट मिथाईल किंवा बेनोमील 100 ग्रॅम अधिक 2,4 डी हे 1.5 ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट 1.5 किलो प्रति 100 लिटर या प्रमाणे झाड ओलेचिंब होईल अशी फवारणी करावी. मृग बहाराची फळे असलेल्याझ संत्रा झाडांना बाबुंचा आधार द्यावा. आंबिया बहाराची संत्रा फळांची गळ कमी होण्यााकरीता एनएए 1 ग्रॅम अधिक कार्बेन्डा झिम 100 ग्रॅम युरिया 1 किलो 100 लिटर पाण्यारत मिसळुन फवारणी करावी. कागदी लिंबू हस्तम बहार घेण्या करीता 1 महीन्यासचा ताण 15 ऑक्टो‍बरला संपवावा. यावेळी 40 किलो शेणखत अधिक 5 किलो निंबोळी ढेप अधिक 2 किलो 15:15:15 खत प्रत्येाक झाडाला (6 वर्ष पुढील वयाची) द्यावेत. कांदा:- कांदा पिकाला एकरी 55 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, 10 किलो गंधक गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत मिसळून घ्यावीत. कांदा लागवड करताना दोन ओळीमध्ये 12 सें.मी. व दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी ठिबक चालवून बेड चांगला ओला करून घ्यावा. रोपे कार्बेन्डाझीम 3 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात बुडवून लावावीत. लसूण:- लसूण लागवडीची तयारी करावी. लागवडीसाठी गोदावरी, श्वेता या वाणांचा अवलंब करावा. लागवडीसाठी सपाट वाफे अथवा रुंद वरंबे तयार करावे. कोथिंबिर, लसुण, मुळा, मेथी, पालक, बटाटा,गवार, वाटाणा इत्यावदी पिकांची लागवड करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरातील तोंड खुरी पाय खुरी सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. परंतु वातावरणातील बदलामुळे अकोला जिल्ह्यात बऱ्याच खेड्यांमध्ये या रोगाची जनावरांना लागण झाली आहे. या रोगात मरतुकीचे प्रमाण जरी कमी असले, तरी जनावर आजारी पडून औषधोपचारात भरपूर खर्च होतो लाळ्या खुरकूत हा रोग खूर विभागलेल्या प्राण्यांना होतो. जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरांस 104 अंश ते 106 अंश फॅरेनहाईटपर्यंत ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्य ता असते. जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पुढील पायांमध्ये खुरातील बेचकीमध्ये फोड येतात व जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असतात. आजाराची लक्षणे जनावराला सपाटून ताप येतो. जनावर खात व पीत नाही. जनावर काळवंडते, मलूल पडते. जनावरांच्या तोंडात, जिभेवर, हिरड्यावर फोड दिसतात. तोंडातून एकसारखी लाळ आणि फेस येतो. तोंडाच्या फोडाचा पापूंद्रा जाऊन लालभडक गरे (जखमा) पडतात. जनावरांच्या पायाच्या बेचक्यात फोड येऊन फूटतात. जनावर लंगडते. जनावर धापा टाकते. दक्षता व उपाय ज्या जनावराला या रोगाची लागण झाली आहे त्या जनावराला वेगळे बांधावे. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये. लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यगतो होत नाही. या रोगाची लस वर्षातून दोन वेळा जनावरांना द्यावी. पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये व दुसरी मात्रा मार्चमध्ये द्यावी. या लसी मोठ्या जनावरांना तसेच दीड ते दोन महिने वयापुढच्या वासरांनाही देणे आवश्याक आहे. जनावरांचे तोंड पोटॅशियमच्या पाण्याने स्वच्छ धुवावे. जिभेला व तोंडातील जखमांना ग्लिसरीन लावावे. दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी. गोड्या तेलात कोथींबीर बुडऊन जनावरांना चारावी. मऊ व पालेदार वैरण खाऊ घालाव्यात. जनावरांना राकट स्वरूपाची वैरण खाऊ घालू नये. त्यामुळे जनावरांच्या तोंडात जखमा होण्याची शक्यता असते. जनावरे सांभाळणारे मजूर किंवा पशुपालक यांच्यामार्फत या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून साथीच्या काळात त्यांनी निरोगी जनावरांच्या जास्त संपर्कात येणे टाळावे. तसे शक्य् नसल्यास स्वतःच्या शरीर व कपड्यांची स्वच्छता खास करून साथीच्या काळात करावी म्हणजे रोगप्रसार होणार नाही. आजारी जनावराला धुळीमधून फिरवु नये, कोणत्याही प्रकारचा आसुरी उपचार करू नये. रोग झालेल्या गाई, म्हशींना व शेळ्या-मेंढ्यांना त्यांच्या पिलास पिऊ देणे टाळावे. त्याऐवजी दुसऱ्या निरोगी जनावराचे दूध वासरांना व करडांना पाजावे. जनावरे बांधण्याच्या गोठ्याभोवती चुन्याची पावडर टाकावी. जनावराला ताकद येण्यासाठी गहू किंवा बाजरीच्या पिठाची पेज करून पाजावी.