Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

February, 2016

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी मुगाची लागवड या पंधरवड्यात करून घ्यावी. बुरशीनाशक व जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया अवश्य करून घ्यावी. • जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या. संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. • भुईमुगाची उगवण झाल्यानंतर इमाझीथायपर १० % एस एल तसेच क़्युज़ालोकाप इथाइल (टरग सुपर) या तणनाशाकाची तणांचा प्रकार ओळखून शिफारशीनुसार फवारणी करावी. • हरभरा पिकाची काढणी केल्यानंतर तो साठवून ठेवायचा असल्यास त्याला चांगले ऊन द्यावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग बहराची संत्र्याची फळे तोडणीपूर्वी १० ते १५ दिवस आधी पाणी देणे बंद करावे. नंतर पक्वतेनुसार तोडणी करून व प्रतवारी करून विक्री करावी. • शिफारशीनुसार भेंडी, चवळी, गवार, काकडी, दुधी भोपळा, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर यांची लागवड पूर्ण झाली नसेल तर लवकर आटोपावी. • चार आठवडे वयाची गेलार्डीया रोपांची शेतात योग्य अंतरावर ६० बाय ४५ सेमी अंतरावर लागवड करावी. • उन्हाळी मिरची, वांगी व टोमाटोच्या ४ ते ६ आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी. • कांदा लागवड करून ४० ते ४५ दिवस पूर्ण झाले असतील तर युरिया ४२ किलो प्रती एकरी द्यावे. पिकास ५ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. वाढीच्या अवस्थेत कॅल्शियम नायट्रेट ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जस्त, लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरजेनुसार फवारणी करावी. • संत्र्याचा आंबिया बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार सुरु असलेला ताण तोडावा. नंतर झाडाच्या वयानुसार खते द्यावीत. १० वर्ष व पुढील वयाचे झाडास कम्पोस्ट खत ५० किलो + नत्र ६०० ग्राम + स्फुरद ४०० ग्राम + पालाश ४०० ग्राम + निंबोळी ढेप ७ किलो प्रती झाड द्यावा. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. • लसूण पिकास ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लसणाचे पिक १३० ते १५० दिवसात काढणीस येते. गड्डाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे वाळतात, मानेत लहानशी गाठ तयार होते त्यास लसणी फुटणे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी.लसूण लहान खुरप्याने अथवा कुदळीने खोडून काढावा. काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. • बटाटा पिक काढणीपुर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी. काढणी कुदळ, नांगर किवा पोटाटो डिगरने करावी. काढणी करताना बटाट्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• पशुपालकांनी सकाळी तसेच संध्याकाळी दोन तास गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण करावे. नियमित निरीक्षणातून आपल्या गोठ्यातील गायी, म्हशी, वगारी, कालवडी, वासरे आरोग्यसंपन्न आहेत का हे ओळखता येईल. प्रत्येक गोठ्याची स्वच्छता असावी. गोठ्यात थर्मामीटर पाहिजे, थर्मामीटरच्या साह्याने जनावरांच्या शरीराचे तापमान मोजता आले पाहिजे, नाडी परीक्षा करता आली पाहिजे. जनावरांच्या चांगल्या आरोग्याची लक्षणे:- • गायी, म्हशी, कालवडी, वगारी, वासरे ‘सावध’ असली पाहिजेत. ‘हुशार’ असली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही केलेल्या कृतीस ती साथ देतात. उदा. जनावरांना नाव घेऊन बोलविले असता आपल्याकडे पाहणे, वैरण टाकत असताना वैरण खाण्यासाठी धडपड करणे ही सावध असण्याची लक्षणे आहेत. • चांगले आरोग्य असणा-या जनावराची नाकपुडी ओलसर असते. जिभेने नाक साफ करण्याची प्रक्रिया चालू असते. रवंथ करताना तोंडात घास असतो. रवंथ करताना पांढरा फेस येतो. चांगले आरोग्य असणारी जनावरे किमान आठ तास रवंथ करतात. शेण, मूत्र टाकताना मोकळेपणा असतो, अवघडलेपणा नसतो. • जनावर उभे राहताना, उठताना, बसताना मोकळेपणा असतो. उभे असताना चारी पायांवर सारखे वजन देतात. शेणाला घास वास नसतो, शेणाची बांधणी घट्ट खीर, लापशीसारखी असते. शेण खाली पडल्यावर उडते हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. • चांगले आरोग्य असणा-या जनावराचे मूत्र स्वच्छ, पारदर्शक असते. मूत्राला अमोनियासारखा वास असतो. चांगले आरोग्य असणा-या जनावराचे शरीराचे तापमान ९८.५ फॅ. ते १०२ फॅ. असते, तर संकरित जनावरांचे तापमान ९९.५ फॅ. ते १०२ फॅ. असते. • चांगल्या प्रकृतीच्या जनावरांची नाडी प्रतिमिनिट ४० ते ४५ असते. या सर्व बाबींचे निरीक्षण बारकाईने केले, तरच आजारी असलेली जनावरे ओळखता येतात. • पशुविज्ञान शाखेतर्फे कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे दि. २६/०२/२०१६ रोजी शेळी पालन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी इच्छुक शेळी पालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी डॉ. गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) मो. ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी मुगाची लागवड या पंधरवड्यात करून घ्यावी. बुरशीनाशक व जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया अवश्य करून घ्यावी. • जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या. संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. • भुईमुगाची उगवण झाल्यानंतर इमाझीथायपर १० % एस एल तसेच क़्युज़ालोकाप इथाइल (टरग सुपर) या तणनाशाकाची तणांचा प्रकार ओळखून शिफारशीनुसार फवारणी करावी. • हरभरा पिकाची काढणी केल्यानंतर तो साठवून ठेवायचा असल्यास त्याला चांगले ऊन द्यावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग बहराची संत्र्याची फळे तोडणीपूर्वी १० ते १५ दिवस आधी पाणी देणे बंद करावे. नंतर पक्वतेनुसार तोडणी करून व प्रतवारी करून विक्री करावी. • शिफारशीनुसार भेंडी, चवळी, गवार, काकडी, दुधी भोपळा, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर यांची लागवड पूर्ण झाली नसेल तर लवकर आटोपावी. • चार आठवडे वयाची गेलार्डीया रोपांची शेतात योग्य अंतरावर ६० बाय ४५ सेमी अंतरावर लागवड करावी. • उन्हाळी मिरची, वांगी व टोमाटोच्या ४ ते ६ आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी. • कांदा लागवड करून ४० ते ४५ दिवस पूर्ण झाले असतील तर युरिया ४२ किलो प्रती एकरी द्यावे. पिकास ५ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. वाढीच्या अवस्थेत कॅल्शियम नायट्रेट ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जस्त, लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरजेनुसार फवारणी करावी. • संत्र्याचा आंबिया बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार सुरु असलेला ताण तोडावा. नंतर झाडाच्या वयानुसार खते द्यावीत. १० वर्ष व पुढील वयाचे झाडास कम्पोस्ट खत ५० किलो + नत्र ६०० ग्राम + स्फुरद ४०० ग्राम + पालाश ४०० ग्राम + निंबोळी ढेप ७ किलो प्रती झाड द्यावा. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. • लसूण पिकास ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लसणाचे पिक १३० ते १५० दिवसात काढणीस येते. गड्डाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे वाळतात, मानेत लहानशी गाठ तयार होते त्यास लसणी फुटणे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी.लसूण लहान खुरप्याने अथवा कुदळीने खोडून काढावा. काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. • बटाटा पिक काढणीपुर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी. काढणी कुदळ, नांगर किवा पोटाटो डिगरने करावी. काढणी करताना बटाट्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• पशुपालकांनी सकाळी तसेच संध्याकाळी दोन तास गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण करावे. नियमित निरीक्षणातून आपल्या गोठ्यातील गायी, म्हशी, वगारी, कालवडी, वासरे आरोग्यसंपन्न आहेत का हे ओळखता येईल. प्रत्येक गोठ्याची स्वच्छता असावी. गोठ्यात थर्मामीटर पाहिजे, थर्मामीटरच्या साह्याने जनावरांच्या शरीराचे तापमान मोजता आले पाहिजे, नाडी परीक्षा करता आली पाहिजे. जनावरांच्या चांगल्या आरोग्याची लक्षणे:- • गायी, म्हशी, कालवडी, वगारी, वासरे ‘सावध’ असली पाहिजेत. ‘हुशार’ असली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही केलेल्या कृतीस ती साथ देतात. उदा. जनावरांना नाव घेऊन बोलविले असता आपल्याकडे पाहणे, वैरण टाकत असताना वैरण खाण्यासाठी धडपड करणे ही सावध असण्याची लक्षणे आहेत. • चांगले आरोग्य असणा-या जनावराची नाकपुडी ओलसर असते. जिभेने नाक साफ करण्याची प्रक्रिया चालू असते. रवंथ करताना तोंडात घास असतो. रवंथ करताना पांढरा फेस येतो. चांगले आरोग्य असणारी जनावरे किमान आठ तास रवंथ करतात. शेण, मूत्र टाकताना मोकळेपणा असतो, अवघडलेपणा नसतो. • जनावर उभे राहताना, उठताना, बसताना मोकळेपणा असतो. उभे असताना चारी पायांवर सारखे वजन देतात. शेणाला घास वास नसतो, शेणाची बांधणी घट्ट खीर, लापशीसारखी असते. शेण खाली पडल्यावर उडते हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. • चांगले आरोग्य असणा-या जनावराचे मूत्र स्वच्छ, पारदर्शक असते. मूत्राला अमोनियासारखा वास असतो. चांगले आरोग्य असणा-या जनावराचे शरीराचे तापमान ९८.५ फॅ. ते १०२ फॅ. असते, तर संकरित जनावरांचे तापमान ९९.५ फॅ. ते १०२ फॅ. असते. • चांगल्या प्रकृतीच्या जनावरांची नाडी प्रतिमिनिट ४० ते ४५ असते. या सर्व बाबींचे निरीक्षण बारकाईने केले, तरच आजारी असलेली जनावरे ओळखता येतात. शेतकरी व इतरांना बटेर पालन करावयाचे असल्यास कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे बटेर व अंडी उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता (डॉ. गोपाल मंजूळकर, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान - 9822231923) संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• गहू पिकास चिकाच्या अवस्थेत पाण्याची पाळी द्यावी. • उन्हाळी भुईमुगाच्या उत्पादनात पाण्याचा ताण देणे महत्वाचे आहे. • हरभरा पिकाची काढणी झाल्यास मातीचा नमुना घेऊन तपासणी करून घ्यावी. • उन्हाळी तीळ व मुग पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• टरबूज परिपक्व होत असतांना पाणी देणे कमी करावे म्हणजे फळ फुटणे बंद होईल. बोरानच्या कमतरतेमुळे सुद्धा फळांना तडे जातात यासाठी बोरान १० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • टमाटे, वांगे, मिरची पिकला फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. मिरचीवर फुलोरा अवस्थेत प्लानोफिक्स ५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • पाले भाज्यांची टप्प्या-टप्प्याने लागवड सुरु ठेवावी. • नवीन फळझाडांना आळ्यामध्ये पाला-पाचोळ्याचे आच्छादन करावे. ठिबक सिंचन अथवा मटका सिंचन पद्धतीने ओळीत करावे. • पपया पिकाची लागवड करावी. लागवडीसाठी रेड लेडी-७८६ वाण लावावे. लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड + डीएपि ५० ग्राम खड्ड्यात टाकावे. • आंबिया आणि मृग बहार संत्रा फळझाडांना नियमित ओलीत करावे. • हळद पिक काढणीपूर्वी एक महिना पाणी देणे बंद करावे. वाळलेला पाला कापून घ्यावा. • आंबा मोहोराचे मावा आणि भुरी रोगापासून संरक्षण करावे. या करिता आंतरप्रवाही किटकनाशक व पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची फवारणी करावी. फुलगळ होऊ नये या साठी प्लानोफिक्स ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • केळी घडांवर केळ फुल कापल्यानंतर पोटाशियाम डाय-हायड्रोजन फोस्फेट ५० ग्राम + युरिया १०० ग्राम + स्टीकर १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हीच फवारणी २० दिवसानंतर परत करावी. या मुळे केळी घडांच्या वजनात वाढ होते. • उन्हाळी मिरचीची लागवड करावी. लागवडीसाठी जयंती, फुले ज्योती वाणाची लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे डायमिथोइट ३० टक्के १० मिली + अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के ३ ग्राम + मेंकोझेब २.५ ग्राम एक लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावे. • कांदा पिक वाढीच्या अवस्थेत आहे. एक महिना लागवड करून झाला असेल तर युरिया ४२ किलो प्रती एकरी टाकावा. पिकाचे फुलकिडे आणि करपा रोगापासून संरक्षण करावे.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
शेळ्यांचा देवी रोग लक्षणे व उपाय • देवी या रोगामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असते; पण त्यामुळे शेळ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या रोगाकडे दुर्लक्ष न करता वेळीच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्याने शेळ्यांचे आरोग्य चांगले राहून दूध, मांस उत्पादनात वाढ होईल. • देवी हा रोग गोट पॉक्स या विषाणूंमुळे होतो. म्हणून याला शेळ्यांतील गोट पॉक्से किंवा देवी म्हणतात. • या रोगाचा प्रसार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बाधित शेळ्यांच्या श्वाासातून किंवा नाकाच्या स्रावातून होतो. • चावणाऱ्या माश्यांगमार्फतसुद्धा या रोगाचा प्रसार होऊ शकतो. • या रोगात सुरवातीला शेळ्यांना भरपूर ताप येतो. • शेळ्या सुस्त, मलूल होतात, शरीराच्या विविध भागांवर फोड येऊन त्याच्या खपल्या पडतात. • हे विषाणू बरेच आठवडे राहतात. • लहान करडे, मोठ्या शेळ्या आणि दूध देणाऱ्या शेळ्या जास्त प्रमाणात बाधित होतात. • लहान पिलांत जवळपास 50 टक्के मरतूक होते • गाभण शेळ्यांत गर्भपात तर दूध देणाऱ्या शेळ्यांस स्तनदाह होऊ शकतो. • आजारी शेळ्यांच्या शरीरावर लालसर पुरळ येतात. • नंतर त्याचे फोडात रूपांतर होऊन यामध्ये पू भरून खपल्या धरतात. • शरीरावर केस असलेल्या ठिकाणी पुरळ येतात आणि ते स्पष्टपणे दिसतात. • हे फोड प्रामुख्याने नाकपुड्या, तोंड, ओठ, कान, सड आ णि शेपटीखाली येतात. • नाकातून स्राव येतो. • कासेवर पुरळ आल्यास स्तनदाह, तसेच दूध पिणाऱ्या पिल्लांना संसर्ग होऊ शकतो. नियंत्रणाचे उपाय – • हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट उपचार नाही. • फोड आलेल्या ठिकाणी जंतुनाशक मलम लावावा. • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत. • तीन महिने व त्यावरील शेळ्यांना दरवर्षी नियमित डिसेंबर ते जानेवारी महिन्यात लसीकरण करावे. शेतकरी व इतरांना बटेर पालन करावयाचे असल्यास कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे बटेर व अंडी उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता (डॉ. गोपाल मंजूळकर, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान - 9822231923) संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुइमुगात तिसरे पाणी झाल्यानंतर म्हणजेच ताशी लागल्यावर त्याला फुल येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. • ताण तोडत असतांना प्रती एकरी २०० किलो जिप्सम टाकावे व पाणी द्यावे. • उन्हाळी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारीच्या आसपास करावी. पेरणी करिता पुसा वैशाखी हे वाण वापरावे. • हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठी जातीनिहाय वेगवेगळे करून साठवावे. • गहू पिकाची उशिरा पेरणी केलेली असल्यास फुलोरा अवस्थेत मायक्रोला ३० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• भाजीपाला लागवड करण्यापूर्वी बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा कार्बेन्डाझिम तीन ते चार ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. • काकडी लागवड जानेवारी- फेब्रुवारीमध्ये करावी. यासाठी हिमांगी, फुले शुभांगी या वाणाची निवड करावी. • आंबा मोहोराचे तुडतुडे फुलकिडे कोळी व भुरी रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १५ मिली + डीनोकॅप १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून मोहोरावर फवारणी करावी. • काकडी, कारली, ढेमसे, मिरची वांगे, टमाटे, टरबूज, खरबूज, कांदा आणि पालेभाज्याची लागवड करावी. • मागील वर्षी फळझाडे लागवड केलेल्या आळया मध्ये पालापाचोळाचे आच्छादन टाकावे. • कांदा पिकाचे फुलकिडे आणि करपा रोगापासून संरक्षण करावे. • हळद पिकाची काढणी अगोदर १५-२० दिवसापूर्वी पाणी देणे बंद करावे. • गेलार्डीया फुलझाडांची लागवड पूर्ण करावी. लागवडीच्या वेळी सुपर फोस्फेट १२५ किलो, म्युरेट ऑफ पोटेश ३३ किलो आणि युरिया ४३ किलो प्रती एकरी द्यावा. • संत्रा मोसंबी मृग बहार बागेत उन्हाळ्यातील फळगळ कमी करण्याकरिता बागेत आच्छादन करावे.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांसाठी हिरव्या चारा – • हिरवा चारा चवदार आणि पचण्यास सुलभ असतो. • जनावराच्या प्रजननासाठी व आरोग्यासाठी आवश्यक असणारे क्षार व ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाणही हिरव्या वैरणीमध्ये अधिक असते. • त्यामुळे जनावर योग्य वेळी माजावर येण्यास व दोन वेतांतील अंतर कमी होण्यास मदत होते. • परंतु संपूर्ण वर्षभर, विशेषतः उन्हाळ्यामधे हिरवा चारा मिळणे कठीण असते, तर पावसाळ्यानंतर गरजेपेक्षा अधिक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होतो. • उन्हाळ्यापूर्वी जादा प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या हिरव्या चाऱ्याची साठवणूक वाळवलेल्या चाऱ्याच्या अथवा मुरघासाच्या स्वरूपांत करावी. या साठवणुकीमध्ये हिरव्या चाऱ्यामधील पौष्टिकतेचे गुणधर्म टिकवून ठेवता येतात. जनावरांसाठी सुकवलेला चारा – • लसूण घास, ज्वारी, मका, ओट अशा चाऱ्याच्या पिकांपासून उत्तम प्रकारचा सुका चारा बनवता येतो. • पिकांमधे अन्नद्रव्याचे प्रमाण उच्चतम असताना म्हणजेच जेव्हा ५० टक्के पीक फुलोऱ्यात आले असेल तेव्हा हिरव्या वैरणीची कापणी करावी. • चाऱ्याच्या ५ ते १० किलोच्या पेंढ्या बांधून सूर्यप्रकाशामध्ये सुकण्यासाठी एकमेकांच्या आधाराने फुलाकडील बाजू वर ठेवाव्यात. • पेंढ्या संपूर्णपणे सुकण्यासाठी त्यांची जागेवर फिरवाफिरवी करावी. • चांगल्या प्रकारे सुकवलेल्या पेंढ्याची साठवणूक कोरड्या जागी करावी. • साठवण्यापूर्वी सुकवलेल्या चाऱ्याची कुट्टीदेखील करता येते. • शेतकरी व इतरांना बटेर पालन करावयाचे असल्यास कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे बटेर उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता (डॉ. गोपाल मंजूळकर, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान - 9822231923) संपर्क साधावा.