Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

November 2015

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• तुरीवर शेंगा भरत असताना २ टक्के (२०० ग्राम) डी. ए. पी. फवारावे. • गहू पिकाचे चांगले उत्पन्न होण्याकरिता लवकरात लवकर पेरणी करावी, लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७, ए.के.डब्लू. – ३७२२, पूर्णा, शरद, डब्लू. एस. एम. – १४७२ यापैकी एक वाण निवडावे. • मोहरी लागवडीसाठी पुसा बोल्ड हा जाड दाण्याचा वाण वापरावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• कांदा बीजोत्पादनासाठी कांद्याची लागवड पूर्ण करावी. • रोप वाटीकेत उन्हाळी कांदा लागवडीसाठी बियाणे पेरणी आटोपावी. • कागदी लिंबू फळ झाडांना नियमित ओलीत करावे. हस्त बहार धरला असेल तर फळे चांगली पोसण्यासाठी झिंक सल्फेट ५० ग्राम, फेरस सल्फेट ५० ग्राम, चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • बटाटा लागवड पूर्ण करावी. लागवडीसाठी कुफरी ज्योती वाणाचा वापर करावा. लागवडीपूर्वी बेण्यास डोळे फुटू द्यावे व नंतर कार्बेन्डाझीम १० ग्राम १० लिटर द्रावणात बुडवून प्रक्रिया करावी. • टोमाटोचे रोपे लागवड करताना सरी वरंब्याच्या वाफ्यामध्ये ६० बाय ६० से. मी. किंवा ७५ बाय ६० से. मी. अथवा ९० बाय ३० से. मी. अंतरावर लावावे. • वाटणाची लागवड आटोपावी हेक्टरी २५ ते ३५ किलो बियाणे वापरावे. बियाणे सपाट वाफ्यात बी टोकून ४५ बाय १० से. मी. अंतरावर लावावे. • मुळा, गजर, पालेभाज्यांची लागवड करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• कोळी किडीचा प्रादुर्भाव या (नोव्हें) महिन्यामध्ये संत्रा मृग बहाराच्या फळांवर दिसतो. कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात जे हळूहळू काळया रंगाचे होतात. कोळी किडीच्या व्यवस्थापनाकरीता डायकोफॉल 1.5 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवशकता भासल्यास वरीलपैकी दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. • झाडाच्या बुंध्यावर दोन फुटापर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरीता 1 किलो मोरचूद 5 लिटर पाण्यात आणि 1 किलो चूना 5 लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुस-या दिवशी सकाळी मिश्रण करुन पेस्ट तयार करावी. • तुरीवरील शेंगा पोखरणा-या हिरव्या अळीच्या (हेलिकोवर्पा) व्यवस्थापनाकरीता पीक फुलकळी अवस्थेत असतांना एकरी 4 कामगंध सापळे लावावेत. कीटकभक्षी पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात प्रति एकरी 15 ते 20 पक्षीथांबे उभारावेत. • वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या पानावर नागअळीच्या प्रादुर्भावामुळे चंदेरी रंगाच्या नागमोडी रेषा दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाकडी होतात व वाळतात. या किडीच्या व्यवस्थापनाकरीता कीडग्रस्त पाने गोळा करुन किडीसह त्यांचा नाश करावा. पिकावर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव आढळल्यास डायक्लोरोव्हॉस 7 मिली किंवा ट्रायझोफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
हिवाळ्यातील जानावारांचे व्यवस्थापन – • थंड वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी जनावरांना अधिक ऊर्जेची गरज असते व ती भागवण्यासाठी अधिक ऊर्जा असलेला चारा तसेच पौष्टिक पशुखाद्य जनावरांना खाऊ घालावे त्यासाठी जनावरांच्या पशुखाद्यात अर्धा ते एक किलो प्रति जनावर पशुखाद्य जनावरांना खाऊ घालावे. • रोजच्या शारीरिक क्रिया व्यवस्थितरीत्या होण्यासाठी योग्य प्रमाणात ताजे, स्वच्छ पाणी द्यावे. दुधाळ गाई-म्हशींना जास्त पाण्याची गरज असते. जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. याकरिता साठविलेल्या पाण्यापेक्षा विहीर, कूपनलिकेच्या माध्यमातून उपसलेल्या पाण्याचा वापर करावा. हे पाणी तुलनेने कमी थंड असते. • थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यास विशेष अपाय होत नाही; मात्र गोठ्यातील जागा कोरडी ठेवावी. गोठ्यात शेण-मूत्र साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जर गोठ्यात सिमेंटचा कोबा असेल तर त्यावर भुश्शाचा थर टाकावा. कारण हा कोबा जास्त थंड असतो. • हवेतील गारव्यामुळे जनावरांना सर्दी- पडसे होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर जनावरांना फुफ्फुसदाह होऊ शकतो. यासाठी गोठ्यात पोते किंवा इतर आच्छादनाचा वापर करावा. थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठ्यामध्ये विद्युत दिवे लावावेत. • नवजात वासरांचे थंडीपासून संरक्षण करावे. बऱ्याच वेळा थंडी सहन न झाल्यामुळे वासरे, वगारी मृत्युमुखी पडतात. वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हात अवश्य ठेवावे. यापासून त्यांना उबदारपणा मिळतो, शिवाय "ड' जीवनसत्त्वदेखील मिळते. उबदारपणासाठी अशक्त वासरांना पोत्याचे पांघरून द्यावे. • हिवाळ्यात सुरवातीला हिरवा चारा भरपूर उपलब्ध असतो आणि पुढे दिवसेंदिवस हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत जाते, त्यामुळे उपलब्ध अतिरिक्त हिरव्या चाऱ्याची मुरघास बनवून साठवणूक करावी. एका जनावराला दररोज १५ किलो मुरघास याप्रमाणे किती दिवसांसाठी चारा साठवायचा त्यानुसार मुरघास बनविण्याचे नियोजन करावे. • मुरघास बनविण्यासाठी फुलोऱ्यात आलेला मका चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी व त्याची दाब देऊन हवाबंद स्थितीत साठवण करावी. गव्हाच्या काडावर, सोयाबीन व हरभऱ्याच्या भुश्श्यावर युरिया व गुळाची प्रक्रिया करून या नित्कृष्ठ चाऱ्याची सकसता वाढवावी. त्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी २ किलो युरिया, १ किलो गूळ, १ किलो मीठ व ३० लिटर पाणी वापरून प्रक्रिया करून २१ दिवस हवाबंद करून नंतर हा चारा वापरावा. • जनावरे विशेषतः म्हशी हिवाळ्यातच माजावर येतात व त्यांचे गाभण राहण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जनावरांच्या प्रजननाकडे विशेष लक्ष द्यावे. माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी व आवश्यक तो उपचार करून घ्यावा. जनावरांना क्षार खनिजे व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल व जनावर गाभण राहण्यास मदत होईल. माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचे पहाटे व संध्याकाळी निरीक्षण करावे.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• हरभरा पेरणी करिता जाकी – ९२१८ व दिग्विजय यापैकी एक वाण निवडावे, पेरणीच्या वेळेस बियाण्यास २५ ग्राम रायझोबियम + २५ ग्राम पी.एस. बी. प्रती किलो बियाण्यास लावून पेरावे. • कपाशीचे बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी १०० ग्राम १३:००:४५ (पोटॅशीअम नायट्रेट) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. • कोरडवाहू कपाशीचे पाने लाल पडत असल्यास १०० ग्राम मँग्नेशिअम सल्फेट + १०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे. • तूरीला शेंगा लागण्याच्या अवस्थेत २०० ग्राम डीएपी १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. • तुरीला पाणी देत असताना कळी अवस्थेत व फुलोरा २० % असतानाच द्यावे. शक्यतो पूर्णपणे फुलोर (६० % पेक्षा जास्त) असल्यास पाणी देणे टाळावे. त्यानंतर पाणी द्यावयाचे असल्यास शेंगा लागण्याच्या वेळेस द्यावे • गहू पिकाचे चांगले उत्पन्न होण्याकरिता लवकरात लवकर पेरणी करावी, लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७, ए.के.डब्लू. – ३७२२, पूर्णा, शरद, डब्लू. एस. एम. – १४७२ यापैकी एक वाण निवडावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• बटाटा लागवडीसाठी जमीन तयार करावी, लागवड १५ बाय २० से. मी. अंतरावर करावी. लागवडीचे वेळी ७० कि. ग्रा. युरिया, १५० कि ग्रा.सुपर फॉस्फेबट व ४० कि.ग्रा. पोटॅश प्रती एकरी द्यावा. • कांदा बिजोत्पादन करिता सरी वरंब्यावर ४५ से. मी. बाय ३० से.मी. अंतरावर कांदा लागवड करावी. लागवडीपूर्वी कांद्याचा वरचा १/३ भाग कापून कार्बेन्डाझीमच्या द्रावणामध्ये बुडऊन लागवड करावी. • रोप वाटिकेत गादी वाफ्यावर कांद्याचे एकरी ४ किलो बियाणे पेरावे. • मृग बहराची फळे असलेल्या संत्रा झाडांना बांबूचा आधार द्यावा. आळ्यात गवताचे जाड आच्छारदन करावे व नियमित ओलीत करावे. • आंबिया बहराच्या संत्रा फळांची तोडणी करावी व प्रतवारी करूनच विक्री करावी. • कागदी लिंबूची हस्त बहाराची फळे चांगली पोसण्यासाठी झिंक सल्फेट ५० ग्राम , फेरस सल्फेट ५० ग्राम, मॅग्नीगज सल्फेट ५० ग्राम + चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• गोनोसेफॅलम भुंग्याच्या (काळी म्हैस) प्रादुर्भावामुळे हरभ-याचे नुकसान होऊ नये याकरीता पेरणीचे वेळी एकरी 4 किलो फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. • तुरीवर ढगाळ वातावरणात शेंगा पोखरणा-या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव होतो. सर्वेक्षणाअंती शेंगा पोखरणा-या अळयांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 7 मिली किवा फ्ल्यूबेंडीअमाईड 39.35 टक्के प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • टोमॅटोवरील फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनाकरीता इंडोक्झाकार्ब 14.5 एस.सी. 10 मिली किंवा क्लोरअॅंट्रानिलीप्रोल (रॅनाक्झिपायर) 18.5 एस.सी. 3 मिली किंवा नोव्हॅल्यूरॉन 10 ईसी 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणी दरम्यान निंबोळी अर्काची गरजेनुसार व तज्ञांच्या सल्ल्याने अधूनमधून फवारणी करावी. • भेंडी पिकावर रस शोषण करणा-या किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड 4 मिली किंवा थायामेथोक्झाम 4 ग्रॅम किंवा डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कांदा पेरणीपूर्वी थायरम 2 ग्रॅम + कार्बेंडाझिम 1 ग्रॅम किंवा 4 ते 6 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडी प्रति किलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रीया करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• मुक्त संचार पद्धतीने दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन – • मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावरांचा संचार मुक्त राहतो. मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. जनावरे मोकळी असल्याने गरजेनुसार चारा खातात, पाणी पितात. मजूर कमी लागतात. गोठा बांधणीचा खर्च कमी आहे. या पद्धतीमुळे जनावरांना कासदाह, गोचिडांचा त्रास, खुरांच्या जखमा होत नाहीत. दुग्धोत्पादनात 10 टक्यांवन नी वाढ दिसून येते. • या पद्धतीमुळे आर्थिक गुंतवणुकीची क्षमता कमी व जनावरांची संख्या मर्यादित ठेवता येते व शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. • व्यायाम मिळाल्याने जनावरे नियमित माजावर येतात. गाभण राहतात. त्यांचे आरोग्य चांगले राहाते. • घरातील महिलांना गोठा व्यवस्थापन सुलभ होते. • ठाणबंद पद्धतीत काही वेळा जनावरांवर ताण आल्याने ती एकमेकांना शिंगे मारतात, धार काढणाऱ्याला लाथा मारतात. मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावर शांतपणे फिरत राहते किंवा रवंथ करीत राहते, त्यामुळे त्याच्यावर ताण येत नाही. • पूर्वी बांधलेल्या गोठ्याचा पुरेपूर उपयोग करुन फक्त जनावरांना मोकळे फिरण्यासाठी जागा उपलब्ध करावी लागते. १० जनावरांसाठी ३०० स्के. फुट जागा असावी. • वैरणीसाठी लागणारी गव्हाण व पिण्याच्या पाण्याची टाकी मुक्त संचार गोठ्यात असते. • पाण्याच्या टाकीत नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह बसविला तर हौदात पाणी सतत उपलब्ध राहते व म्हशी गरजेनुसार पाणी पितात. दूध काढण्याच्या वेळा (सकाळी व सायंकाळी) वगळता म्हशी गोठ्यात मोकळ्या फिरत असतात. • पहाटे पाच वाजता गोठ्यातील कामकाज सुरू करावे. • म्हशींना धुवून, गोठा साफ करावा. • त्यानंतर दूधदोहन करताना म्हशींना खुराक द्यावा. • प्रति लिटर दुधामागे अर्धा किलो खुराक द्यावा. • खुराकामध्ये शेंगदाण्याची पेंड, सरकीची पेंड, मका, ज्वारी, हरभरा, तूर कुटार व गव्हांडा द्यावा. • दूध काढल्यानंतर म्हशी परत मुक्त गोठ्यात सोडाव्यात. एका म्हशीला दिवसभरासाठी सुमारे 30 किलो हिरवा चारा, सहा किलो वाळलेला चारा कुट्टी करून गव्हाणीत द्यावा. त्यामुळे चारा वाया जात नाही, म्हशी गरजेनुसार चारा खातात. म्हशींना मुक्त संचार गोठ्यात फिरण्यासाठी, पाणी पिणे, वैरण खाण्यासाठी आणि रवंथ करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. त्यामुळे म्हशी शांत राहून जास्तीत जास्त रवंथ करतात. • दिवसभर गोठ्याकडे कुणालाही जाऊ देऊ नये त्यामुळे म्हशींना आराम व्यवस्थित मिळतो. • सायंकाळी सहानंतर पुन्हा म्हशी गोठ्यात घेऊन दूध काढावे. • दूध काढताना गोठ्यात बासरीवादन, शहनाईवादन लावतात. त्यामुळे म्हशी शांत राहतात, दूध काढताना त्रास देत नाहीत. • जेवढ्या म्हशी शांतपणे रवंथ करतील, तेवढे दुधाचे उत्पादन चांगले मिळते. • मुक्त संचार पद्धतीमध्ये जनावरांचा माज लगेच दिसून येतो, कृत्रिम रेतन योग्य वेळी करता येते, त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण वाढते. • बऱ्याच गर्भधारणेच्या अडचणी या पद्धती मुळे कमी होतात. विताना अडचण होणाऱ्या गाईंमध्येही सुधारणा झालेली दिसेल. फक्त पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने म्हशींना लसीकरण आणि रेतन योग्य वेळी करून घ्यावे. • या पद्धतीमुळे जनावरांच्या दुधात दहा टक्यांा नी वाढ दिसून आली आहे. दुधाच्या फॅटमध्ये तीन ते चार पॉइंटने वाढ होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे जनावरे ताणरहित राहिल्याने दुधाच्या गुणवत्तेत वाढ दिसते. • जनावरांच्या आजारांचे प्रमाण कमी होते त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर कमी करता येतो, त्यामुळे दुधामध्येही औषधांच्या घटकांचे प्रमाण कमी होते. • मानवी आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा फायदा आहे. जनावरे गोठ्यात मुक्तापणे उन्हात फिरल्याने त्यांना "ड' जीवनसत्त्व मिळते. ती शांतपणे चारा खातात. बराच वेळ रवंथ करत राहिल्याने लाळ चांगल्याप्रकारे चाऱ्यात मिसळली जाते, त्यामुळे पोषक घटकांचे शरीरात चांगल्याप्रकारे शोषण होते. पाणीही जास्त पिले गेल्याने पचन सुधारते. • मुक्त गोठय़ाच्या व्यवस्थापनात कमी मनुष्यबळाचा वापर ■ पशुवैद्यकीय उपचार व कृत्रिम रेतनासाठी सोईस्कर ■ दुभत्या जनावरांचे आरोग्य चांगले राहते. ■ शुद्ध, ताज्या, निर्भेळ दुधाची उपलब्धता ■ पर्यावरण संतुलनास मदत ■ मुक्त गोठा बांधकाम खर्चही कमी ■ जातिवंत दुधाळ वासरांची निर्मिती
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• कपाशीचे बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी १०० ग्राम १३:००:४५ (पोटॅशीअम नायट्रेट) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. • कोरडवाहू कपाशीचे पाने लाल पडत असल्यास १०० ग्राम मँग्नेशिअम सल्फेट + १०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे. • तूरीला शेंगा लागण्याच्या अवस्थेत २०० ग्राम डीएपी १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. • तुरीला पाणी देत असताना कळी अवस्थेत व फुलोरा २० % असतानाच द्यावे. शक्यतो पूर्णपणे फुलोर (६० % पेक्षा जास्त) असल्यास पाणी देणे टाळावे. त्यानंतर पाणी द्यावयाचे असल्यास शेंगा लागण्याच्या वेळेस द्यावे • हरभरा पेरणी करिता जाकी – ९२१८ व दिग्विजय यापैकी एक वाण निवडावे, पेरणीच्या वेळेस बियाण्यास २५ ग्राम रायझोबियम + २५ ग्राम पी.एस. बी. प्रती किलो बियाण्यास लावून पेरावे. • गहू पिकाचे चांगले उत्पन्न होण्याकरिता १५ नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी, लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७, ए.के.डब्लू. – ३७२२, पूर्णा, शरद, डब्लू. एस. एम. – १४७२ यापैकी एक वाण निवडावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• बटाटा लागवडीसाठी जमीन तयार करावी, लागवड १५ बाय २० से. मी. अंतरावर करावी. लागवडीचे वेळी ७० कि. ग्रा. युरिया, १५० कि ग्रा.सुपर फॉस्फेबट व ४० कि.ग्रा. पोटॅश प्रती एकरी द्यावा. • कांदा बिजोत्पादन करिता सरी वरंब्यावर ४५ से. मी. बाय ३० से.मी. अंतरावर कांदा लागवड करावी. लागवडीपूर्वी कांद्याचा वरचा १/३ भाग कापून कार्बेन्डाझीमच्या द्रावणामध्ये बुडऊन लागवड करावी. • जुलै मध्ये लागवड केलेल्या केळी झाडांना युरिया ११० ग्राम, फोरेट १० ग्राम प्रती झाड देऊन ओलीत करावे. • रोप वाटिकेत गादी वाफ्यावर कांद्याचे एकरी ४ किलो बियाणे पेरावे. • मृग बहराची फळे असलेल्या संत्रा झाडांना बांबूचा आधार द्यावा. आळ्यात गवताचे जाड आच्छारदन करावे व नियमित ओलीत करावे. • आंबिया बहराच्या संत्रा फळांची तोडणी करावी व प्रतवारी करूनच विक्री करावी. • कागदी लिंबूची हस्त बहाराची फळे चांगली पोसण्यासाठी झिंक सल्फेट ५० ग्राम , फेरस सल्फेट ५० ग्राम, मॅग्नीगज सल्फेट ५० ग्राम + चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
------------------------------
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
गाई- म्हशींतील माज ओळखण्याच्या आधुनिक शास्त्रोक्त पद्धती • गाई- म्हशींच्या प्रजनन काळाविषयी माहिती देणारा गोलाकार तक्ता :- जनावरांच्या प्रजननाविषयी सर्व नोंदी असल्यास पुढील माजाच्या तारखा, विण्याच्या तारखा या तक्त्याच्या आधारे बिनचूक बघता येतात. • कळपात नसबंदी केलेला वळू सोडणे :- गाई - म्हशींच्या कळपांमध्ये नियमित माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू सोडण्यात येतो. (खच्ची न केलेला) • जनावरांच्या पायाची गती मोजण्यासाठी पायाला बसविण्याचे उपकरण :- माजावर आलेली जनावरे माजाच्या कालावधीत माजावर नसतानाच्या कालावधीपेक्षा दुप्पट चालतात. या यंत्रावर दर्शविलेल्या आकड्यांवरून कळपातील माजावर आलेली जनावरे ओळखता येतात. • जनावरांचा माज ओळखण्यासाठी श्वानांचा वापर :- काही देशांमध्ये कळपातील जनवारांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलेले श्वान, कुत्रे दररोज विशिष्ट वेळी कळपात सोडण्यात येते. हे श्वान जनावरांचा पार्श्वभाग हुंगते आणि माजावर आलेली जनावरे शोधून काढते. • जनावरातील "माजाचे संनियंत्रण' :- कळपातील अनेक जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी माजावर आणण्यासाठी सर्व गाई- म्हशींना "प्रोस्टॉग्लॅडिन' घटक असलेले इंजेक्शान देण्यात येते. माजावर आल्यानंतर एकाच वेळी सर्व जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करून घेता येते. • रक्तातील- दुधातील "प्रोजेस्टेरॉन'चे प्रमाण :- जनावरांच्या रक्तातील- दुधातील "प्रोजेस्टेरॉन' या संप्रेरकाच्या प्रमाणावरून जनावर माजावर आहे किंवा नाही याचे निदान करता येते. माजावर असलेल्या जनावरांच्या दुधातील- रक्तातील प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण अत्यल्प असते. सध्या मार्केट मध्ये या प्रकारच्या प्रोजेस्टेरॉन स्ट्रीप उपलब्ध झाल्या आहेत. • सिद्ध वळूच्या साह्याने नैसर्गिक पैदास :- ज्या वेळी पशुपालकांना गाई- म्हशींमधील माज ओळखणे शक्य होत नाही, अशा वेळी कळपामध्ये उत्कृष्ट प्रजनन क्षमता असलेला सिद्ध वळू सोडल्यास माजावर आलेली जनावरे ओळखून नैसर्गिक पैदासीद्वारे गर्भधारणा घडवून आणता येते.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
कपाशीचे पाने लाल पडत असल्यास १०० ग्रॅम मग्नेशिअम सल्फेट + १०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोनदा फवारावे. कपाशीचे बोंडे पूर्णपणे उमलण्यासाठी १०० ग्राम १३:००:४५ पोटॅशीअम नायट्रेट) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तूर कळी अवस्थेत असताना २०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून फवारावा. तुरीला पाणी देत असताना कळी अवस्थेत व फुलोरा २० % असतानाच द्यावे. शक्यतो पूर्णपणे फुलोर (६० % पेक्षा जास्त) असल्यास पाणी देणे टाळावे. हरभरा पेरत असताना त्याला २५ ग्राम रायझोबियम + २५ ग्राम पी.एस. बी. प्रती किलो बियाण्यास लावून पेरावे. हरभरा पेरणी करिता जाकी – ९२१८ व दिग्विजय यापैकी एक वाण निवडावे. गहू लागवडी करिता ए.के.डब्लू. – ४६२७, ए.के.डब्लू. – ३७२२, पूर्णा, शरद, डब्लू. एस. एम. – १४७२ यापैकी एक वाण निवडावे. गहू पिकाचे चांगले उत्पन्न होण्याकरिता १५ नोव्हेंबर पर्यंत पेरणी करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
आंबिया बहराच्या संत्रा फळांची तोडणी करावी व प्रतवारी करूनच विक्री करावी. मृग बहराची फळे असलेल्या संत्रा झाडांना बांबूचा आधार द्यावा. आळ्यात गवताचे जाड आच्छारदन करावे व नियमित ओलीत करावे. कागदी लिंबूची हस्त बहाराची फळे चांगली पोसण्यासाठी झिंक सल्फेट ५० ग्राम , फेरस सल्फेट ५० ग्राम, मॅग्नीगज सल्फेट ५० ग्राम + चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जुलै मध्ये लागवड केलेल्या केळी झाडांना युरिया ११० ग्राम, फोरेट १० ग्राम प्रती झाड देऊन ओलीत करावे. रोप वाटिकेत गादी वाफ्यावर कांद्याचे एकरी ४ किलो बियाणे पेरावे. कांदा बिजोत्पादन करिता सरी वरंब्यावर ४५ से. मी. बाय ३० से.मी. अंतरावर कांदा लागवड करावी. लागवडीपूर्वी कांद्याचा वरचा १/३ भाग कापून कार्बेन्डाझीमच्या द्रावणामध्ये बुडऊन लागवड करावी. बटाटा लागवडीसाठी जमीन तयार करावी, लागवड १५ बाय २० से. मी. अंतरावर करावी. लागवडीचे वेळी ७० कि. ग्रा. युरिया, १५० कि ग्रा.सुपर फॉस्फेबट व ४० कि.ग्रा. पोटॅश प्रती एकरी द्यावा.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
तुर पिकास फुलकळी येवू लागताच प्रतिबंधक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच शेंगा पोखरणा-या हिरव्या अळीच्या (हेलिकोवर्पा) व्यवस्थापनाकरीता पीक फुलकळी अवस्थेत असतांना एकरी 4 कामगंध सापळे लावावेत. गोनोसेफॅलम भुंग्याच्या (काळी म्हैस) प्रादुर्भावामुळे हरभ-याचे नुकसान होऊ नये याकरीता पेरणीचे वेळी एकरी 4 किलो फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. वेलवर्गीय भाजीपाला पिकावर ढगाळ हवामानामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. व्यवस्थापनासाठी मॅटॅलॅक्झिल 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार फवारणी करावी टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढ-या माशी मार्फत तसेच टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस या रोगाचा प्रसार फुलकिडीमार्फत होतो. टोमॅटोवरील रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरीता इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 5 मिली किंवा थायोमेथोक्झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
स्वच्छ दुग्धोत्पादन करताना घ्यावयाची काळजी :- जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यकतो वेगळी असावी. दूध काढताना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. दुभते जनावर वेगळे करून त्याचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा करावा व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्याने, टॉवेलने पुसून स्वच्छ करावे, यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर तरतरित होते. जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशिअम परमॅंगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड धुवावेत आणि लगेच स्वच्छ फडक्यांने, टॉवेलने पुसावेत. त्यानंतर दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी, एक छोटासा कप व दूध गाळण्याचे स्वच्छ पांढरे कापड जागेवर आणून ठेवावे. कोमट पाण्याने कास धुतल्यानंतर गाय, म्हैस पान्हा सोडण्यास मदत करते. दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणात धुऊन स्वच्छ करावेत व दूध काढण्यास सुरवात करावी. सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा स्वतंत्र कपात काढाव्यात व नंतरच दुधाच्या भांड्यात दूध काढावे. कपात काढलेले दूध ( 20 ते 25 मि.लि.) फेकून द्यावे. कारण यात जंतूंचे प्रमाण जास्त असते. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीने सुमारे 7 ते 8 मिनिटांत पूर्ण करावी. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी वापरावीत. दूध काढताना जनावरांस शक्यितो वाळलेली वैरण, घास खायला घालू नये, फक्त आंबोण द्यावे. स्वच्छ दूध कोरड्या, स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावे