Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

March, 2016

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी मुग व भुईमुगास वाढत्या तापमानानुसार पाण्याचे नियोजन करावे. • उन्हाळी नागरटी लवकरात लवकर करून घ्यावी, जेणेकरून किडींचे कोष नष्ट होतील व जमिनीची सुधारणा होण्यास मदत होईल. • माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची हि योग्य वेळ आहे. यासाठी नमुना घेऊन तो लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवावा. • नवीन केलेली विहीर किंवा बोअरवेलचे पाणी तपासणे सुद्धा महत्वाचे आहे.मोटार पंप १० मिनिट सुरु ठेऊन नंतर पाण्याचा नमुना घ्यावा व तो लवकरात लवकर प्रयोगशाळेत पाठवावा. • हरभरा व गहू पिकांची काढणी केल्यानंतर त्यांना चांगले ऊन देऊनच त्यांची साठवणूक करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
फळझाडे:- • नवीन लावलेल्या फळझाडांच्या आळ्यात पाचट, गवताचे काड, लाकडाचा भुसा आणि पाला-पाचोळा या पदार्थाचे आच्छादन करावे. आच्छादन करतांना सेंद्रिय घटक बारीक केल्यास फायदा होतो. वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सेंद्रिय घटकामध्ये शिफारसीत प्रमाणात कीडनाशक पावडर मिसळावी. काळ्या पोलिथिनचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. • उन्हाळ्यातील पाण्याचे उत्सर्जन कमी होण्यासाठी ५% केओलीन ची पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. • ठिबक सिंचनाचा तसेच सूक्ष्म तुषार सिंचनाचा वापर करावा. • पाण्याची उपलब्धता कमी असल्यास प्रवाही पद्धतीने पाणी देण्यासाठी वाफ्याची चौकोनी बांधणी करून घ्यावी. चौकोनातून करणाच्या पद्धतीचा आडवा वरंबा टाकून वाफ्याचे दोन समभाग करावेत. प्रत्येक वेळी अर्ध्या वाफ्यास पोच पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची बचत करता येते. बागेला शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे. • दुष्काळी परिस्थितीत फळझाडांची तग धरून राहण्याची शक्ती किवा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानावर एक ते दिड टक्के पोटयाशीअम नायट्रेट ची फवारणी करावी. • संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू इत्यादी लिम्बुवर्गीय फळझाडाना दुहेरी आले पद्धतीने पाणी द्यावे. • उन्हाळ्यामध्ये संत्रा तसेच मोसंबी आंबिया बहराची फळगळ कमी करण्यासाठी एनएए,१० पिपिएम (१० मिलीग्राम प्रती लिटर पाणी) तीव्रतेची फलधारणा नंतर १५ ते २० दिवसानंतर फवारणी करावी. किवा १.५ ग्राम जि.ए आणि १०० ग्राम कॅर्बेन्दाझीम आणि एक किलो युरिया यांचे १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी. १५ दिवसानंतर परत एकदा फवारणी करावी. • उन्हाळ्यात पाण्याची खूप कमतरता असल्यास झाडे जगविण्यासाठी झाडावरील फळांची संख्या कमी करावी तसेच अनावश्यक फांद्याची छाटणी करावी. • बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे. • संत्रा, मोसंबी तसेच कागदी लिंबू फळझाडांना जमिनीपासून ३ फुट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. • संत्रा, मोसंबी फळझाडांना मृग बहराचा ताण देण्यासाठी हलक्या जमिनीत ३० ते ३५ दिवस, मध्यम जमिनीत ४० ते ५० दिवस तसेच भारी जमिनीस ६० ते ७० दिवसाचा ताण द्यावा.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• भुईमुगाच्या पानांवरील ठिपके आणि तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनाकरीता प्रापिकोनेझोल 25 इ.सी. 10 मिली किंवा डायफेनकोनेझोल 25 इ.सी. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • उन्हाळी भुईमुगावर पहिली फवारणी 5 टक्के निंबोळी अर्काची करावी. किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचल्यास (15 ते 20 तुडतूडे प्रति झाड किंवा 5 फुलकिडे प्रति शेंडा रासायनिक नियंत्रणाकरीता लॅम्डा सायहॅलोथ्रिन 5 इ.सी. 5 मिली किंवा क्विनोलफॉस 25 इ.सी. 14 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • अंबीया बहार संत्रा-मोसंबीच्या नवतीवर मावा किंवा सिला किडीचा प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता अॅसीफेट 10 ग्राम किंवा डायमेथोएट 15 मिली किंवा क्विनोलफॉस 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवष्यकता असल्यास 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. • वेलवर्गीय भाजीपाला पिकाची पाने नागअळीच्या प्रादुर्भावामुळे चंदेरी रंगाच्या नागमोडी रेषा दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाकडी होतात व वाळतात. या किडीच्या व्यवस्थापनाकरीता कीडग्रस्त पाने गोळा करुन किडीसह त्यांचा नाष करावा. पिकावर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव आढळल्यास डायक्लोरोव्हस 7 मिली किंवा ट्रायझोफास 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
दुधामधील स्निग्धांश वाढविण्यासाठी जनावरांचे व्यवस्थापन • दुधामध्ये पाणी, स्निग्धांश (फॅट), प्रथिने, शर्करा, खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे हे वेगवेगळे घटक असतात. या घटकांचे प्रमाण जनावरांनुसार वेगवेगळे असते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाचा स्वाद हासुद्धा बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी व त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी दुधातील स्निग्धांशास अनन्यसाधारण महत्त्व आहे. • आपल्याकडे संकरित गाई असल्यास त्यांच्या पुढील पिढ्या जर्सी किवा देशी जातीच्या रेतमात्रा वापरून तयार कराव्यात. म्हणजे दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाण देखील वाढेल. जर्सी संकरित गाईंच्या दुधात स्निग्धांशांचे प्रमाण जास्त असल्याने दर दहा गाईंत तीन यानुसार संगोपनास गाई ठेवल्यास एकत्रित दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सामान्य प्रमाणात ठेवता येईल. • कृत्रिम रेतन पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे. म्हशींच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सात टक्यांच्या वर असल्याने अधिक स्निग्धांशासाठी म्हशी पाळाव्यात. • जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा, तसेच उसाच्या वाढ्यांचा वापर टाळावा. उसाचे वाढे, भाताचा पेंढा, गव्हाचे काड असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश कमी होते. या चाऱ्याचे पोषणमूल्य मळी, खनिज मिश्रण आणि मीठ वापरून वाढविता येते, त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. • गाई- म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मका भरडा, तूर, हरभरा, मूग चुनी, भात- गव्हाचा कोंडा इ. योग्य प्रमाणात द्यावा. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये. • जनावरांच्या दैनंदिन आहारात 25 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा. क्षार चाटण विटा गोठ्यात बांधाव्यात. तसेच, आहारात जीवनसत्त्वांचा देखील वापर करावा. • दूध दोहनातील अंतर समान असावे (जर सकाळी सहा वाजता दूध काढले, तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे). अंतर वाढले तर दूध वाढते, पण फॅट कमी होतात. • दूध काढताना कास चांगली घुसळून धुवावी, म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणात देखील वाढ होईल. • गाईचे दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे. गोठा आणि जनावरे स्वच्छ ठेवावीत, जेणेकरून कासदाहसारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाहीत. तसेच, कासदाह झाल्यास त्वरित उपचार करावेत. • दुधाळ जनावरांना शक्य् असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. • जास्त वयस्क गाई, म्हणजेच सातव्या विताच्या पुढे गोठ्यात ठेवू नयेत. गर्भावस्थेत कशी घ्याल जनावरांची काळजी: • गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढले असले पाहीजे. • गाईंना शरीरवाढीसाठी व गर्भवृद्धीसाठी जास्तीचचे रोजचे दोन किलोग्रॅम आंबोण द्यावे व क्षार कमतरता दूर करण्यासाठी रोजचे ५० ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे. • सात महिने पूर्ण झाल्यावर गाय आटवावी व कासेत स्तनदाहविरोधी प्रतिजैविक औषध सोडावे, म्हणजे कास निरोगी राहील. सातव्या व आठव्या महिन्यांत गाभण गाईला गोलकृमीनाशक औषध पाजावे. • सहा महिन्यांनंतर गाभण गाईस चरण्याची वेळ कमी करावी. शेवटच्याृ १.५ महिन्या्त ३-४ किलोने चारा कमी करावा.दिवसातून २ ते ४ तास मोकळे चरण्यास/फिरण्या स एकट्याच गाईस सोडावे. • कालवडींना गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यात कासेला मालिश करावे, म्हणजे विण्यानंतर दूध काढायच्या क्रियेचा त्यांना सराव होईल. • कालवडींना दुभत्या गाईंच्या गोठ्यात ठेवावे, म्हणजे दोहनकाळच्या वेळेत होणाऱ्या हालचालींचीही त्यांना सवय होते.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• भुईमुगाचा ताण तोडत असतांना प्रती एकरी २०० किलो जिप्सम द्यावे • रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर, माती परीक्षण करून घ्यावे व नंतर चांगली नांगरणी करावी. • हरभरा पिकाची काढणी केल्यानंतर तो साठवून ठेवायचा असल्यास त्याला चांगले ऊन द्यावे. • तापमानामध्ये सरासरी पेक्षा वाढ दिसत असल्यामुळे उन्हाळी भुईमुग तसेच उन्हाळी मुग पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग बहारातील संत्रा फळे मोठी होण्यासाठी पोट्याशिंअम नायट्रेट दीड किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मृग संत्र्याची तोडणी सुरु करावी. तोडणी करून प्रतवारी करावी. • हस्त बहराच्या लिंबू फळांची तोडणी सुरु करावी. फळांची प्रतवारी करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावी. • गारपिटीमुळे येणाऱ्या डिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी संत्रा, मोसंबी, लिंबू फळझाडांच्या बुंध्याला १ मिटर उंचीपर्यंत बोर्डो पेष्ट लावावी. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पिकांना पाणी शक्यतो सायंकाळी द्यावे. • लसूण पिकास ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लसणाचे पिक १३० ते १५० दिवसात काढणीस येते. गड्डाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे वाळतात, मानेत लहानशी गाठ तयार होते त्यास लसणी फुटणे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी.लसूण लहान खुरप्याने अथवा कुदळीने खोडून काढावा. काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. • बटाटा पिक काढणीपुर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी. काढणी कुदळ, नांगर किवा पोटाटो डिगरने करावी. काढणी करताना बटाट्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. • हळद पिकाची पाने वाळली असतील तर विळ्याने वाळलेली पाने कापून काढावी. हळद काढणीची तयारी सुरु करावी. • आंबा मोहोराचे मावा कीड व भुरी रोगापासून संरक्षण करावे. • कांदा बिजोत्पादन प्लॉट मध्ये पर परागीभवनासाठी मधमाशी पेटी लावावी. एक पेटी लावायची असेल तर प्लॉट च्या मध्यभागी लावावी. कांदा बियाणे प्लॉटला नियमित पाणी द्यावे. • टरबूज परिपक्व होत असताना पाणी देणे कमी करावे म्हणजे फळांना तडा जाने बंद होईल. बोरॉन च्या कमतरतेमुळे सुद्धा फळांना तडे जातात. यासाठी बोरॉनची १० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मृग बहाराच्या संत्र्याची गळ होत असल्यास जि ए १ ग्राम + युरिया १ किलो प्रती १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
तापमानातील वाढ व जनावरांची काळजी • जनावरे रात्रीच्या थंड वेळी मुक्त संचार पद्धतीत सांभाळा. जनावरांना सगळा आहार दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत पुरवावा. • गोठ्याच्या छतावरून सूर्यकिरण परावर्तित होण्यासाठी तसेच गोठ्याच्या भिंतींना पांढरा रंग द्या. गोठ्यात उन्हाच्या झळा कमी करण्यास हवेच्या दिशेस थंड पाण्याचे पडदे बांधावेत. जनावरांना मुक्तपणे, गरजेनुसार थंड स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे. • पशुखाद्यात प्रति जनावरास शरीरवजनानुसार 20 ते 25 ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा. शक्य तो ताक, गूळ, मीठ, क्षार मिश्रणे दररोज द्यावे. • सोयाबीन काड, गव्हाचा कोंडा, शेंगदाणा टरफले, भाताचा पेंढा, भुस्सा कुटार, सरमाड या चाऱ्यावर शिफारशीत मात्रेत युरिया, मळी, क्षार प्रक्रिया नेहमी फायद्याची ठरते. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. • युरिया प्रक्रिया केलेला चारा सहा महिन्यांखालील वासरांना देऊ नये; तर मोठ्या जनावरांत युरिया प्रमाण तीन ते चार टक्यांपेक्षा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. • उपलब्ध सर्व चारा, चारा पर्याय साधने कुट्टी करूनच जनावरांना पुरवावीत व कुट्टी पसरून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. • जनावरांच्या आहारातील कोणताही बदल हळूहळू सवयीने अवलंबावा. • घामावाटे शरीरातील सोडिअम व क्लोपराईड क्षार कमी होत असतात. हे लक्षात घेऊन प्रति जनावर दररोज शरीर वजनानुसार 25 ते 50 ग्रॅम आयोडीन युक्त मीठ द्यावे. • उन्हाळ्यात शरीरताण कमी करणाऱ्या वनस्पतिजन्य औषधी तसेच अश्व गंधा, शतावरी यासह इतर औषधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घ्याव्यात. • सध्याच्या काळात उष्माघाताचा धोका वाढतो. शरीर तापमान वाढल्याने गर्भपाताचा धोका निर्माण होतो. • उष्णता वाढल्याने जनावरांकडून जास्त ऊर्जा वापरली जाते. श्वनसनदर वाढतो. भूक कमी होते, तहान वाढते, रवंथ कमी होते, लाळ सुरू होते. तोंडाने श्वास सुरू होतो. कोठीपोटाचा सामू वाढतो, कोठीपोटात आम्लता वाढते, लघवीचा घट्टपणा वाढतो. दुधात घट होते. शेण घट्ट होते. • उन्हाळ्यात जनावरे माज चक्र बंद करतात, मुका माज दाखवितात. माजातील अंडे विकृत असते. अंडे सुटण्यात अडथळे येतात, गर्भाशयाची उष्णता वाढल्याने गर्भमृत्यू होतो. गर्भधारणा प्रमाण घटते. थंड ठिकाणी जनावरांना बांधावे. • पशुविज्ञान शाखेतर्फे कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे दि. १८ /०३ /२०१६ रोजी कुक्कुटपालन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी इच्छुक शेळी पालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी डॉ. गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) मो. ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर, माती परीक्षण करून घ्यावे व नंतर चांगली नांगरणी करावी. • हरभरा पिकाची काढणी केल्यानंतर तो साठवून ठेवायचा असल्यास त्याला चांगले ऊन द्यावे. • तापमानामध्ये सरासरी पेक्षा वाढ दिसत असल्यामुळे उन्हाळी भुईमुग तसेच उन्हाळी मुग पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. • भुईमुगाचा ताण तोडत असतांना प्रती एकरी २०० किलो जिप्सम द्यावे
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग संत्र्याची तोडणी सुरु करावी. तोडणी करून प्रतवारी करावी. • हस्त बहराच्या लिंबू फळांची तोडणी सुरु करावी. फळांची प्रतवारी करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावी. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पिकांना पाणी शक्यतो सायंकाळी द्यावे. • लसूण पिकास ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लसणाचे पिक १३० ते १५० दिवसात काढणीस येते. गड्डाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे वाळतात, मानेत लहानशी गाठ तयार होते त्यास लसणी फुटणे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी.लसूण लहान खुरप्याने अथवा कुदळीने खोडून काढावा. काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. • बटाटा पिक काढणीपुर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी. काढणी कुदळ, नांगर किवा पोटाटो डिगरने करावी. काढणी करताना बटाट्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. • हळद पिकाची पाने वाळली असतील तर विळ्याने वाळलेली पाने कापून काढावी. हळद काढणीची तयारी सुरु करावी. • आंबा मोहोराचे मावा कीड व भुरी रोगापासून संरक्षण करावे. • कांदा बिजोत्पादन प्लॉट मध्ये पर परागीभवनासाठी मधमाशी पेटी लावावी. एक पेटी लावायची असेल तर प्लॉट च्या मध्यभागी लावावी. कांदा बियाणे प्लॉटला नियमित पाणी द्यावे. • टरबूज परिपक्व होत असताना पाणी देणे कमी करावे म्हणजे फळांना तडा जाने बंद होईल. बोरॉन च्या कमतरतेमुळे सुद्धा फळांना तडे जातात. यासाठी बोरॉनची १० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मृग बहाराच्या संत्र्याची गळ होत असल्यास जि ए १ ग्राम + युरिया १ किलो प्रती १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. • गारपिटीमुळे येणाऱ्या डिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी संत्रा, मोसंबी, लिंबू फळझाडांच्या बुंध्याला १ मिटर उंचीपर्यंत बोर्डो पेष्ट लावावी. • मृग बहारातील संत्रा फळे मोठी होण्यासाठी पोट्याशिंअम नायट्रेट दीड किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
कोंबड्यांची निवड व व्यवस्थापण अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांची निवड व व्यवस्थापण:- • अधिक अंडी उत्पादन - जास्त अंडी मिळविण्यासाठी लवकर अंड्यावर येणाऱ्या कोंबड्यांची पैदासिकरिता निवड होते. कमीत कमी दिवस खुडूक बसून रोज एक अंडे द्यावे हि अपेक्षा असते. • शारीरिक आरोग्य - शक्यतो रोगाला लवकर बळी न पडणाऱ्या निरोगी कोंबड्यांची निवड झाल्यास जास्त अंडी मिळू शकतात. • अंड्याचे वजन - आकाराने मोठे अंडे मिळाल्यास त्यांना जास्त भाव मिळू शकतो, परंतु अंडी उत्पादन क्षमता व त्यांचा मोठा आकार हे परस्पर विरोधी गुण असल्याने त्या प्रकारच्या कोंबड्या निवडाव्यात. • पक्ष्याचे आकार व वजन - पक्षी आकाराने व वजनाने मोठा असल्यास जास्त खाद्य लागते, कमी खाद्य खाऊन जास्त अंडी देणारी कोंबडी किफायतशीर असल्याने असेच गुण असलेल्या पक्ष्यांची निवड करावी. • कवचाचा टणकपणा - अनुवांशिक गुण असल्याने अंड्यातील तूट फुट टाळण्यासाठी कठीण कवच असलेल्या अंडी देणाऱ्या कोंबड्यांची निवड करावी. • अंड्यांसाठी कोंबड्या पाळावयाच्या असल्यास अंड्यांसाठी लागणारे खाद्य घालून ७२ - ७३ आठवडे पाळाव्यात नंतर त्या कापण्यासाठी काढाव्यात. • अंड्याची क्रिया :- कोंबडी वयात आल्यावर म्हणजे सरासरी ५ महिन्यांनंतर अंडी घालण्यास सुरुवात करते, तिला अंडी देण्यासाठी नराची गरज भासत नाही. पण त्या अंड्यांपासून पिले निघत नाहीत. परंतु ती जर नराच्या संपर्कात आली व त्यांचे शारीरिक मिलन झाल्यावर त्यांच्या मिलनापासून कोंबडीने दिलेल्या अंड्यांपासून पिले जन्माला येवू शकतात, परंतु नर व मादीच्या (कोंबडी व कोंबड्याच्या) प्रत्येक शारीरिक मिलनातून कोंबडीने दिलेल्या अंड्यांमधून पिले जन्माला येतीलच असे नाही. त्यांच्या मिलनातून जी सफल ( Fertile ) अंडी मिळतील त्यातूनच पिले जन्माला येतात मांसल कोंबड्यांची निवड व व्यवस्थापण (ब्रॉयलर) • ब्रॉयलर कोंबड्यांची निवड करताना खालील गोष्टींचा विचार करावा. • जलद वाढ - कमीत कमी काळात जास्तीत जास्त जलद वाढ होण्याची अनुवांशिक क्षमता असलेले पक्षी निवडावे. • कमी खाद्य - कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त वजन मिळाले तर त्यापासून मिळणाऱ्या फायद्याचे प्रमाण वाढते. • खाद्याचे मांसात रुपांतर करणारे पक्षी निवडावे - फीड कन्वर्षन (FCR – Feed Conversion Ratio) इतर खालील बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे • तापमान - कडक थंडीत उबदार व उन्हाळ्यात घर थंड कसे राहील याचा विचार आपण प्रथम करावयास हवा. कोंबड्यांना घामाच्या नसतात. त्यांना आपल्या अंगातील उष्णता कमी करणे फार कठीण जाते उन्हाळ्यात 38 डिग्री से. तापमान गेल्यास कोंबड्या अस्वस्थ होऊन धापा टाकतात. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खाणे बंद करून जास्त पाणी पितात, त्यामुळे अशावेळी घरात जास्तीत जास्त हवा खेळती असावी म्हणूनच घराचे छप्पर उंच, दोन्ही बाजूला जाळ्या असाव्यात, छपरास वरील बाजूने पांढरा चुना लावल्यास सूर्य प्रकाश प्रवर्तित होऊन आतील तापमान वाढत नाही. • वायुजीवन - घरला दोन्ही बाजूने किमान ६ ते १० फुट जाळी असल्यास योग्य वायुवीजन होण्यास मदत होते. दुपाखी छप्परास मध्य भागी सांध्याला फट ठेवलेली असल्यास उष्ण झालेली हवा व वायू हलके असल्यामुळे छप्परातून निघून जातात, योग्य वायुवीजनमुळे घरात नेहमी शुद्ध व ताजी हवा राहते. कोंबडीच्या घरात लिटर व विष्ठेतून अमोनिया वायू सारखा बाहेर पडतो. • तसेच कोंबड्यांच्या उच्छ वासातून कार्बनडायऑक्साइड वायू सतत बाहेर टाकला जातो. हे वायू घरातील वातावरणात घुटमळत राहिल्यास त्याचा पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. • आर्द्रता - कोंबडीच्या विष्ठेतून व घरात सांडलेल्या पाण्यातून बाष्पीभवनातून वाफ निर्माण होते. पाणी साचल्यामुळे खालील लिटरमध्ये अनेक जंतू निर्माण होतात. घरात कोंबड्यांना हिंडून फिरून मोकळेपणाने राहण्यासाठी, खाण्यासाठी, दिसण्यासाठी उजेडाचे योग्य प्रमाणात नियोजन असावे, त्यामुळे अंडी उत्पादनास व वजन वाढीस चालना मिळते. • पशुविज्ञान शाखेतर्फे कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे दि. १८ /०३ /२०१६ रोजी कुक्कुटपालन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी इच्छुक शेळी पालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी डॉ. गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) मो. ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• तापमानामध्ये सरासरी पेक्षा वाढ दिसत असल्यामुळे उन्हाळी भुईमुग तसेच उन्हाळी मुग पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. • भुईमुगाचा ताण तोडत असतांना प्रती एकरी २०० किलो जिप्सम द्यावे • हरभरा पिकाची काढणी केल्यानंतर तो साठवून ठेवायचा असल्यास त्याला चांगले ऊन द्यावे. • रबी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर, माती परीक्षण करून घ्यावे व नंतर चांगली नांगरणी करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• मृग बहराची संत्र्याची फळे तोडणीपूर्वी १० ते १५ दिवस आधी पाणी देणे बंद करावे. नंतर पक्वतेनुसार तोडणी करून व प्रतवारी करून विक्री करावी. • कांदा लागवड करून दीड महिना पूर्ण झाला असेल तर युरिया ४२ किलो प्रती एकरी द्यावे. पिकास ५ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. वाढीच्या अवस्थेत कॅल्शियम नायट्रेट ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जस्त, लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरजेनुसार फवारणी करावी. • हस्त बहराच्या लिंबू फळांची तोडणी सुरु करावी. फळांची प्रतवारी करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावी. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. पिकांना पाणी शक्यतो सायंकाळी द्यावे. • लसूण पिकास ७ ते ८ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. लसणाचे पिक १३० ते १५० दिवसात काढणीस येते. गड्डाची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे वाळतात, मानेत लहानशी गाठ तयार होते त्यास लसणी फुटणे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी काढणी करावी.लसूण लहान खुरप्याने अथवा कुदळीने खोडून काढावा. काढलेला लसूण दोन दिवस तसाच शेतात ठेवावा. ठेवताना गड्ड्याचा भाग पानांनी झाकला जाईल याची काळजी घ्यावी. • बटाटा पिक काढणीपुर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. जमीन पूर्णपणे सुकू द्यावी. काढणी कुदळ, नांगर किवा पोटाटो डिगरने करावी. काढणी करताना बटाट्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. • हळद पिकाची पाने वाळली असतील तर विळ्याने वाळलेली पाने कापून काढावी. हळद काढणीची तयारी सुरु करावी. • आंबा मोहोराचे मावा कीड व भुरी रोगापासून संरक्षण करावे. • कांदा बिजोत्पादन प्लॉट मध्ये पर परागीभवनासाठी मधमाशी पेटी लावावी. एक पेटी लावायची असेल तर प्लॉट च्या मध्यभागी लावावी. कांदा बियाणे प्लॉट ला नियमित पाणी द्यावे. • टरबूज परिपक्व होत असताना पाणी देणे कमी करावे म्हणजे फळांना तडा जाने बंद होईल. बोरॉन च्या कमतरतेमुळे सुद्धा फळांना तडे जातात. या साठी बोरॉनची १० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • पपया पिकाची लागवड करावी. लागवडीसाठी रेड लेडी ७८६ वाणाची निवड करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांच्या चांगल्या आरोग्याची लक्षणे:- • गायी, म्हशी, कालवडी, वगारी, वासरे ‘सावध’ असली पाहिजेत. ‘हुशार’ असली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही केलेल्या कृतीस ती साथ देतात. उदा. जनावरांना नाव घेऊन बोलविले असता आपल्याकडे पाहणे, वैरण टाकत असताना वैरण खाण्यासाठी धडपड करणे ही सावध असण्याची लक्षणे आहेत. • पशुपालकांनी सकाळी तसेच संध्याकाळी दोन तास गोठ्यातील जनावरांचे निरीक्षण करावे. नियमित निरीक्षणातून आपल्या गोठ्यातील गायी, म्हशी, वगारी, कालवडी, वासरे आरोग्यसंपन्न आहेत का हे ओळखता येईल. प्रत्येक गोठ्याची स्वच्छता असावी. गोठ्यात थर्मामीटर पाहिजे, थर्मामीटरच्या साह्याने जनावरांच्या शरीराचे तापमान मोजता आले पाहिजे, नाडी परीक्षा करता आली पाहिजे. • चांगले आरोग्य असणा-या जनावराची नाकपुडी ओलसर असते. जिभेने नाक साफ करण्याची प्रक्रिया चालू असते. रवंथ करताना तोंडात घास असतो. रवंथ करताना पांढरा फेस येतो. चांगले आरोग्य असणारी जनावरे किमान आठ तास रवंथ करतात. शेण, मूत्र टाकताना मोकळेपणा असतो, अवघडलेपणा नसतो. • जनावर उभे राहताना, उठताना, बसताना मोकळेपणा असतो. उभे असताना चारी पायांवर सारखे वजन देतात. शेणाला घास वास नसतो, शेणाची बांधणी घट्ट खीर, लापशीसारखी असते. शेण खाली पडल्यावर उडते हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. • चांगले आरोग्य असणा-या जनावराचे मूत्र स्वच्छ, पारदर्शक असते. मूत्राला अमोनियासारखा वास असतो. चांगले आरोग्य असणा-या जनावराचे शरीराचे तापमान ९८.५ फॅ. ते १०२ फॅ. असते, तर संकरित जनावरांचे तापमान ९९.५ फॅ. ते १०२ फॅ. असते. • चांगल्या प्रकृतीच्या जनावरांची नाडी प्रतिमिनिट ४० ते ४५ असते. या सर्व बाबींचे निरीक्षण बारकाईने केले, तरच आजारी असलेली जनावरे ओळखता येतात. • पशुविज्ञान शाखेतर्फे कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे दि. २६/०२/२०१६ रोजी शेळी पालन या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी इच्छुक शेळी पालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी डॉ. गोपाल मंजुळकर विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) मो. ९८२२२३१९२३ यांचेशी संपर्क साधावा.