Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

may, 2016

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• खरीप हंगामात कोणते वाण वापरावे या संबधीचे नियोजन करून खतांची खरेदी करावी. • उन्हाळी हंगामामधील शेताची नागरणी झाली असल्यास पुन्हा एकदा पाच दाती किंवा नऊ दाती कल्टीवेटरच्या सहाय्याने दुसरी नागरणी करून घ्यावी. • घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास त्याला एक उन द्यावे व त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी जेणेकरून आपल्याला उगवण क्षमता कमी असल्यास बाजारातून नवीन प्रमाणित बियाणे विकत घेता येतील. • तूर हे आंतरपीक म्हणून घ्यावे. • पूर्व मान्सून कपाशीची पेरणी २० मे पर्यंत करावी. • सोयाबिनसाठी जे. एस. ३३५ व फुले अग्रणी हे वाण निवडावे. • सोयाबीनचे कमी कालावधीचे जे. एस. ९५६० व जे. एस. ९३०५ हे वाण निवडावे. • शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत मिसळावे • ज्या भागात सोयाबीनचे कमी उत्पन्न मिळते त्या भागात मुग - उडीद यासारखी पिके घ्यावीत.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• शक्यतो जास्तीत जास्त ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, पिकांना पाणी देताना मुळ्यांच्या जारवाच्या क्षेत्रात दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. उन्हाळी पिके व फळबागांना शक्यरतो सायंकाळी पाणी द्यावे. • कांदा पिक सध्या काढणी अवस्थेत असेल तर पिकाची काढणी सुरु करावी. कांदा काढणी झाल्यावर दुसऱ्या ओळीतील काढणी केलेल्या कांदा पातीने पहिल्या ओळीतील काढलेला कांदा झाकावा. • नवीन लागवड केलेल्या फळपिकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांचा मोहर, डाळिंबाची फुले तसेच इतर फळ पिकांची फुले काढून टाकावीत, बागेची स्वच्छता करावी व बाग तणमुक्त ठेवावी. • हळद नवीन लागवडीसाठी गट्टू बेणे ५० ते ६० ग्राम व त्यावरील वजनाचे निवडून हवेशीर साठवून ठेवावे. • साठवलेल्या शेततळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी बाष्परोधकांचा वापर करावा. शेतातील उभ्या पिकातसुद्धा गरजेनुसार बाष्परोधकाची फवारणी करावी. पिकांमधून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी फळबागांमध्ये ८ टक्के केओलिन (१० लिटर पाण्यामध्ये ८०० ग्रॅम केओलिन) फवारणी करावी. • पिकांना जास्त पाणी देण्याऐवजी पिकांच्या संवेदनशील अवस्थांना पाणी द्यावे. फळपिकांमध्ये जास्तीत जास्त आच्छादन तंत्राचा वापर करावा. प्लॅस्टिक आच्छादन शक्य नसल्यास वाळलेला काडीकचरा, गवत, तण, उसाचे पाचट, धान्य मळणी केल्यानंतर उरलेला भुसा, झाडांचा पालापाचोळा इ. वापर करावा • केळी बागेत केळी पाने व अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीन भुसा इ.चा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे. बागेत चारही बाजूंनी सजीव कुंपण करावे. • नविन फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदावे. खड्डे उन्हात चांगले तापू द्यावे. • कागदी लिंबूमध्ये हस्त बहराच्या फळांची तोडणी करावी. फळांची प्रतवारी करून विक्री करावी. • निशिगंधाची लागवड करावी. लागवडीपूर्वी कंद जि.ए.-३ या संजीवकाच्या १२५ पीपीएम तीव्रतेच्या द्रावणामध्ये २४ तास बुडवून लावावे. लागवड २० बाय २० सेमी अंतरावर करावी.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• साठवण्यापुर्वी धान्य स्वच्छ करावे व उन्हात चांगले वाळवून घ्यावे. धान्य साठवणुकीची खोली, कोठ्या, पोते, डबे, सूप इत्यादी स्वच्छ करावे. • धान्य साठवणुकीपूर्वी कोठीला कडूनिंबाच्या पानांचा अर्क लावावा तसेच धान्यामध्ये कडूनिंबाच्या पानांचा थर द्यावा. • वेखंडाच्या भुकटीची पुरचुंडी बांधून कोठीतील धान्याच्या मध्यभागी ठेवावी • अन्नधाण्यामध्ये तसेच कडधान्यामध्ये पाऱ्याच्या २ – ३ गोळ्या टाकल्यास कीड लागण्यास प्रतिबंध होतो. • सेल्फोसची १ पुडी १ क्विंटल धान्यामध्ये ठेऊन कोठीचे झाकण घट्ट लावावे. • संत्रावर्गीय फळझाडावरील आंबिया बहाराच्या नावतीवरकाळ्या/पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळल्यास असिफेत १२.५ ग्राम किंवा इमीडाकलोप्रीड ५ मिली किंवा डायमेथोएट२० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी पानांच्या खालच्या बाजूस व झाड चिंब भिजेल इतपत करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
उन्हाळ्यात जनावरांना पाण्याची गरज आणि व्यवस्थापन – • जनावरांना दिवसभरात १०० लिटर पाण्याची आवश्यकता असते कारण पाण्यामुळे जनावरांच्या शरीराची लवचिकता राहते. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्यांचे संपूर्ण शरीरात विलयन होते व शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात. • शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यतकता असते. जनावरांमध्ये पाणी कमी पडले तर बरेचसे आजार होऊ शकतात. डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते. • पचनावर, मूत्राद्वारे व घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास परिणाम होतो, शरीराचे तापमान वाढते, मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो, दूध देण्याचे प्रमाण दहा ते 20 टक्यांनी घटते. • पिण्याच्या पाण्याची गरज जनावराच्या शरीराचे आकारमान, खाद्याचा प्रकार, दुग्धउत्पादनातील विविध अवस्था आणि ऋतुमान यावर अवलंबून असते. उन्हाळ्यात जनावरांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. • सर्वसाधारणपणे मोठ्या (गाय/म्हैस) जनावरांना प्रतिदिवस त्यांच्या स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी (चयापचय, मूत्रविसर्जन, शेण टाकणे, दूधनिर्मिती करणे, चालणे, फिरणे व इतर शारीरिक गरजा) साधारणपणे ८० ते ११० लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात ही गरज वाढून १०० ते १३० लिटर पाणी आवश्यीक असते. दुभत्या जनावरांसाठी पाण्याची गरज अधिक असते. • प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची गरज असते. जनावरांना देण्यात येणाऱ्या पाण्यातून जनावरे सर्वप्रथम स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात. त्यानंतर अतिरिक्त पाणी दूधनिर्मितीसाठी वापरले जाते. हे लक्षात घेता, उन्हाळ्यात गोठ्यामध्ये स्वच्छ, ताजे, थंड, निर्जंतुक व वासहीन पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे; जेणेकरून जनावरांना आवश्य क तेव्हा गरजेप्रमाणे इच्छेनुसार पाणी पिता येईल. • जनावरांना देण्यात येणारा चारा हिरवा असल्यास त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जनावरे पाणी कमी पितात, तर शुष्क चारा किंवा वाळलेला चारा असेल तर अशा जनावरांना पाण्याची गरज अधिक असते. त्यामुळे उन वाढले की जनावरांना जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे. • उन्हाळ्यात शरिरातील घाम व लाळेद्वारा पाणी बाहेर पडल्यामुळे या कालावधीत अतिरिक्त पाण्याची गरज असते. यासाठी उन्हाळ्यात कायमस्वरूपी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यात जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध केल्यास जनावरांवर पाण्याचा ताण कमी होतो, जनावरांचे दुग्धउत्पादन वाढते, तसेच दुधातील फॅटचे प्रमाणही वाढते. • उन्हाळ्यात थंड पाणी पुरवूनही जनावरे कमी पीत असतील तर जनावरांच्या खुराकात रोज २० ते ३० ग्रॅम खाण्याचा सोडा (सोडियम बायकार्बोनेट) मिसळावा. तसेच पाण्यात ५० ते १०० ग्रॅम गूळ मिसळून दिल्याने जनावरे अधिक पाणी पितात. किवा जनावरांच्या खाद्यात साधे मीठ २० ग्रा. रोज दिल्यास सुद्धा जनावरे अधिक पाणी पितात. • काही पशुपालक उन्हाळ्यात जनावरांना सकाळी चरण्यासाठी सोडतात आणि सायंकाळी गोठ्यात परतल्यानंतर पाणी पाजतात. अशा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा ताण पडतो. यामुळे जनावरांचे दूधउत्पादन घटते. अश्या वेळी जनावरांना मध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे. किवा चारावयास सोडण्याच्या वेळा बदलावाव्यात. • जनावरांनी अधिक पाणी प्यायल्यामुळे शेण घट्ट पडते. परिणामी गोठा स्वच्छ राहतो.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुईमुग पिकांच्या (वाढलेल्या उष्णतामानामुळे) परिपक्व होण्याच्या वेळेवर फरक पडू शकतो, त्यामुळे या पिकांच्या परीपक्वतेवर लक्ष ठेवावे. पूर्णपणे परिपक्व झालेला भुईमुग काढून त्याला चांगले ऊन दयावे. • आपल्या पिकांच्या नियोजनानुसार बाजारात हवे असलेले खते व बियाणे उपलब्ध असल्यास खरेदी करून ठेवावे. • उन्हाळी हंगामामधील शेताची नागरणी झाली असल्यास पुन्हा एकदा पाच दाती किंवा नऊ दाती कल्टीवेटरच्या सहाय्याने दुसरी नागरणी करून घ्यावी व वाढत्या उन्हाचा फायदा करून घ्यावा. • घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास त्याला एक उन द्यावे व त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, कारण उगवण क्षमता कमी असल्यास बाजारातून नवीन प्रमाणित बियाणे विकत घेता येतील. • बियाण्यांची उगवण शक्ती पेपर पद्धतीने तपासायची असल्यास उगवण क्षमता तपासणारा पेपर ओला करून त्यामध्ये १०० बियाणे ठेऊन तो प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळून ठेवावा व ४ ते ५ दिवस त्यावर थोडे पाणी टाकून तो ओला राहील याचीकाळजी घ्यावी. • रेती पद्धतीमध्ये एका प्लास्टिक ट्रे मध्ये रेती घेऊन त्यामध्ये १०० बिया टाकाव्यात व त्याला पाणी द्यावे. त्या ट्रेला खालून निचरा होण्यासाठी एक छिद्र करावे ४ ते ५ दिवसानंतर चांगली उगवण झालेल्या रोपांची संख्या मोजावी. • १०० बियांपैकी चांगले जोमदार उगवलेले बियाचे रोपटे मोजून घ्यावेत जर ७० रोपटे उगवले असतील तर त्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आहे असे समजावे. • बियाणे व खते खरेदी करत असतांना पक्के बिल घ्यावे त्यावर वाण, कंपनीचे नाव, लॉट नंबरहे सर्व नोंदवावे व बँगवर उगवण शक्तीचे प्रमाण व तारीख तपासून घावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• संत्रा पिकामध्ये सध्या आंबिया बहाराची फळे असतील. ती टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. मे महिन्यामध्ये तापमान वाढू शकते. पाण्याच्या बचतीसाठी शक्य तिथे ठिबक सिंचनाचा वापर करावा. • झाडाभोवती काळ्या पॉलिथीनचे (100 मायक्रॉन जाडी) आच्छादन पसरावे किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरून घ्यावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल. • नवीन बाग लागवडीकरिता 75 x 75 x 75 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावे. नागपुरी संत्राकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्याच्या उष्णतेकरिता उघडे ठेवावे. • मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील साल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सि्क्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • झाडाच्या बुंध्यावर 60 सें.मी. पर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता 1 किलो मोरचूद व 1 किलो चुना 5 लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजत घालावा. तो दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून बोर्डो पेस्ट बनवावी. ही पेस्ट 12 तासांच्या आत वापरावी. • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्या्चा स्राव सुरू असल्यास, तीक्ष्ण चाकूने तो खरडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झीतल अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट लावावी. • संत्रा मध्ये फळगळ कमी करण्याकरिता 2, 4 - डी हे 1.5 ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल 1.5 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 100 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • नवीन मृगबाग केळी लागवडीकरिता पूर्व नियोजन व तयारी करावी. • कांदेबाग केळीस लागवडीनंतर २१० दिवसांनी द्यावयाची नत्रयुक्त खताची मात्रा प्रती झाड ३६ ग्राम युरिया मधून द्यावी. • फेब्रूवारी मधील पपया लागवडीच्या पपया बागेस १५० ग्राम १०:२६:२६ खत द्यावे. बागेस पाणी कमी पडू देऊ नये. नियमित ओलीत करावे. शेंडा वाढीसाठी बोरान १० ग्राम १० लिटर पाण्यामधून फवारणी करावी. • नवीन फळबाग लागवडीसाठी शेतात शिफारशीत अंतरावर आखणी करून खड्डे खोदावे व खड्डे उन्हात तापू द्यावे. • खरीप मधील लागवडीसाठी मिरची, वांगे, टमाटे यांचे गादीवाफ्यावर बियाणे पेरावे. • संत्रा पिकाच्या मृग बहारासाठी हलक्या जमिनीत ताण द्यावा. • गिल्लार्दिया फुलझाडांचे रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. निशिगंधाचे २० ते ३० ग्राम वजनाचे कंद २० बाय २० सेमी अंतरावर सपाट वाफ्यात संत्रा पिकामध्ये सध्या आंबिया बहाराची फळे असतील. ती टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. मे महिन्यामध्ये तापमान वाढू शकते. पाण्याच्या बचतीसाठी शक्यं तिथे ठिबक सिंचनाचा वापर करावा. • झाडाभोवती काळ्या पॉलिथीनचे (100 मायक्रॉन जाडी) आच्छादन पसरावे किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरून घ्यावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल. • नवीन बाग लागवडीकरिता 75 x 75 x 75 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावे. नागपुरी संत्राकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्याच्या उष्णतेकरिता उघडे ठेवावे. • मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सि्क्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • झाडाच्या बुंध्यावर 60 सें.मी. पर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता 1 किलो मोरचूद व 1 किलो चुना 5 लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजत घालावा. तो दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून बोर्डो पेस्ट बनवावी. ही पेस्ट 12 तासांच्या आत वापरावी. • संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्यापचा स्राव सुरू असल्यास, तीक्ष्ण चाकूने तो खरडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झी ल अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट लावावी. • संत्रा मध्ये फळगळ कमी करण्याकरिता 2, 4 - डी हे 1.5 ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल 1.5 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 100 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • नवीन मृगबाग केळी लागवडीकरिता पूर्व नियोजन व तयारी करावी. • कांदेबाग केळीस लागवडीनंतर २१० दिवसांनी द्यावयाची नत्रयुक्त खताची मात्रा प्रती झाड ३६ ग्राम युरिया मधून द्यावी. • फेब्रूवारी मधील पपया लागवडीच्या पपया बागेस १५० ग्राम १०:२६:२६ खत द्यावे. बागेस पाणी कमी पडू देऊ नये. नियमित ओलीत करावे. शेंडा वाढीसाठी बोरान १० ग्राम १० लिटर पाण्यामधून फवारणी करावी. • नवीन फळबाग लागवडीसाठी शेतात शिफारशीत अंतरावर आखणी करून खड्डे खोदावे व खड्डे उन्हात तापू द्यावे. • खरीप मधील लागवडीसाठी मिरची, वांगे, टमाटे यांचे गादीवाफ्यावर बियाणे पेरावे. • संत्रा पिकाच्या मृग बहारासाठी हलक्या जमिनीत ताण द्यावा. • गिल्लार्दिया फुलझाडांचे रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. निशिगंधाचे २० ते ३० ग्राम वजनाचे कंद २० बाय २० सेमी अंतरावर सपाट वाफ्यात लावावेत. • साठवणुकीतील कांद्यांवर नियमितपणे देखरेख ठेवून, सड झालेले किंवा कोंब आलेले कांदे काढून टाकावेत. चाळीत हवा खेळती राहील याची योग्य व्यवस्था करावी. • लसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावे.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• टोमॅटोवरील फळ पोखरणारया अळीच्या व्यवस्थापनाकरीता इंडोक्झाकार्ब 14.5 एस.सी. 10 मिली किंवा क्लोरअॅंट्रानिलीप्रोल (रॅनाक्झिपायर) 18.5 एस.सी. 3 मिली किंवा नोव्हॅल्यूरॉन 10 ईसी 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणी दरम्यान निंबोळी अर्काची गरजेनुसार व तज्ञांच्या सल्ल्याने अधूनमधून फवारणी करावी. • भेंडी पिकावर रस शोषण करणारया किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड 4 मिली किंवा थायामेथोक्झाम 4 ग्रॅम किंवा डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • कारली पिकावर फळमाषीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनाकरीता मॅलेथिऑन 20 मिली अधिक गुळ 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • अंबीया बहार संत्रा-मोसंबीवर काळया किंवा पांढरया माषीचा प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता अॅसीफेट 12.5 ग्राम किंवा डायमेथोएट 20 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी पानांच्या खालच्या बाजूने व झाड चिंब भिजेल इतपत करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
कोंबड्यांना होणारा मानमोडी रोग (राणीखेत) • कोंबड्यांना होणारा हा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या रोगामध्ये मोठ्या संख्येने कोंबड्या मरू शकतात. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे लवकर पसरतो. हा आजार बहुतेक करून एप्रिल व ऑक्टो्बरच्या सुमारास होतो. या आजारात कोंबड्या मरतुकीचे प्रमाण 50 ते 90 टक्के आहे. हा रोग पॅरामिक्झो नावाच्या विषाणूंमुळे होतो. या रोगाच्या विषाणूंचा प्रसार दूषित हवा, खाद्य, प्रत्यक्ष संसर्ग इत्यादीमुळे होतो. लक्षणे – • सुरवातीला पक्ष्यांची तहान वाढते व भूक मंदावते • रोगाच्या प्रादुर्भावामुळे पक्षी मरगळलेला दिसतो, • तोंड उघडे ठेवून श्वा सोच्छ्वास करतो, • चेहरा सुजतो, तुरा फुगलेला किंवा ताणलेला दिसतो. तुऱ्यास व डोक्यााला सूज येते. • रोगी पक्ष्यांना हिरव्या रंगाची विष्ठा होते. • रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे डोके व मान एका बाजूला मुरडलेली असते. • रोगी पक्ष्याची मान वाकडी होते, यामुळेच या रोगास मानमोडी असे म्हणतात. • हिरव्या रंगाचा वास येणारा पाण्यासारखा जुलाब होतो. • नाकातून पाणी येते. खोकला व शिंका येतात. • पायातील ताण कमी झाल्याने पक्ष्यांची चाल बदलते. • अंड्यावरील पक्षी अंडी घालणे बंद करतात • अंड्यावरील कवच पातळ होते अथवा नसतेच. • पंख खाली पडतात. पक्षी झटके, लकवा मारतात, पटापट मरतात. प्रतिबंधक उपाय व उपचार – • एकदा रोग झाल्यानंतर कोंबड्यांना वाचवणे खूप अवघड असते. यासाठी प्रतिबंधात्मक लस टोचून याला प्रतिबंध करता येऊ शकतो. रोगी पक्ष्यांस वेगळे करून ताबडतोब पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. • कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात म्हणून रोगांच्या निदानासाठी शवविच्छेदन करावे.या रोगासाठी कुठलेही औषधे उपलब्ध नाहीत परंतु खालील बाबींकडे लक्ष दिल्यास या रोगापासून धोका टाळू शकतो • आजारी कोंबड्यांना इतरांपासून वेगळे ठेवावे. • मेलेल्या कोंबड्या उघड्यावर फेकू नये. त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. • कोंबड्यांना नियमितपणे लसीकरण करावे. मानमोडी व देवी आजारावरील प्रतिबंधक लस वेळेवर द्यावी • पोटॅशिअम परमॅंगनेट एक ग्लास पाण्यामध्ये विरघळून ते पाणी कोंबड्यांना पिण्यास द्यावे. • होमिओप्यथिक औषधेद्वारे बऱ्यापैकी रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो त्यासाठी कार्बो वेज ३० वेरेट्रम अल्बम ३० बेलाडोना ३० व कालीफॉस ३० प्रत्त्येकी ५ मिली ८ लिटर पाण्यात १०० पक्षांना देता येईल.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• सोयाबीनचे जे. एस. – ३३५ व फुले अग्रणी यापैकी एक वाण निवडावे. कमी कालावधीचे जे. एस. – ९५६० किंवा जे. एस. – ९३०५ यापैकी एक वाण निवडावे. • पूर्व मान्सून कपाशीची पेरणी २० मे च्या आसपास करावी, उपलब्ध पाण्यानुसारच क्षेत्र ठरवावे. पेरणीचे अंतर ५ बाय १.५ फुट ठेवावे. • पूर्व मान्सून कपाशीच्या लागवडीच्या वेळेस प्रति एकरी ५० किलो १०:२६:२६ हे खत द्यावे. • तुरीचे पी.के.व्ही. तारा, बि.एस.एम.आर. – ७३६ यापैकी एक वाण निवडावे. कमी कालावधीसाठी तुरीच्या ए.के.टी.- ८८११ हे वाण घ्यावे. • घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास त्याला एक उन द्यावे व त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, कारण उगवण क्षमता कमी असल्यास बाजारातून नवीन प्रमाणित बियाणे विकत घेता येतील. • बियाण्यांची उगवण शक्ती पेपर पद्धतीने तपासायची असल्यास उगवण क्षमता तपासणारा पेपर ओला करून त्यामध्ये १०० बियाणे ठेऊन तो प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळून ठेवावा व ४ ते ५ दिवस त्यावर थोडे पाणी टाकून तो ओला राहील याचीकाळजी घ्यावी. • बियाणे व खते खरेदी करत असतांना पक्के बिल घ्यावे त्यावर वाण, कंपनीचे नाव, लॉट नंबरहे सर्व नोंदवावे व बँगवर उगवण शक्तीचे प्रमाण व तारीख तपासून घावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
हळद व आद्रक :- • हळद व आद्रक पिकाच्या लागवडीसाठी रुंद वरंबे तयार करावे. त्या पूर्वी जमिनीमधील लव्हाळा, हराळी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत, तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात. त्यानंतर कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळीअगोदर एकरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सध्याच्या काळात शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा • जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. • बेणे जातिवंत असावे. हळदीसाठी पिडीकेव्ही वायगाव, सेलम, फुले स्वरूपा, आणी आद्रकासाठी माहीम जातींची निवड करावी. • बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. दीड ते दोन महिने बेण्याची काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. • लागवडीसाठी मातृकंद किवा जेठेगड्डे चा वापर करावा. मातृकंद किंवा जेठा गड्डे बेणे - या प्रकारचे बेणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० ते ११ क्विंटल बेणे लागते. मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते. • हळद लागवडीच्या पूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावर पाणी मारावे, जेणेकरून ढिगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून बियाणे लागवडीस तयार करावे. फळझाडे:- • संत्रा पिकामध्ये सध्या आंबिया बहाराची फळे असतील. ती टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. मे महिन्यामध्ये तापमान वाढू शकते. पाण्याच्या बचतीसाठी शक्य4 तिथे ठिबक सिंचनाचा वापर करावा. • झाडाभोवती काळ्या पॉलिथीनचे (100 मायक्रॉन जाडी) आच्छादन पसरावे किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरून घ्यावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल. • नवीन बाग लागवडीकरिता 75 x 75 x 75 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावे. नागपुरी संत्राकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्याच्या उष्णतेकरिता उघडे ठेवावे. • मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिxक्लोटराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • संत्रा पिकाच्या मृग बहारासाठी हलक्या जमिनीत ताण द्यावा. ताणाच्या कालावधीत पाऊस झाल्यास सायकोसील १००० पीपीएम तीव्रतेचा फवारा घ्यावा. • संत्रा मध्ये फळगळ कमी करण्याकरिता 2, 4 - डी हे 1.5 ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल 1.5 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 100 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • नवीन मृगबाग केळी लागवडीकरिता पूर्व नियोजन व तयारी करावी. • नवीन फळबाग लागवडीसाठी शेतात शिफारशीत अंतरावर आखणी करून खड्डे खोदावे व खड्डे उन्हात तापू द्यावे. भाजीपाला आणी फुलपिके:- • गादीवाफ्यावरील मिरची, वांगे आणी टोमाटो रोपांची काळजी घ्यावी. रोपांचे रस शोसनाऱ्या किडींपासून व्यवस्थापन करावे. • उन्हाळी कांदा काढणीनंतर कांदा चाळीमध्ये व्यवस्थित साठवावा. साठव्नुकीपुर्वी कांदा चाळ निर्जंतुक करून घ्यावी त्या करिता कॅर्बेन्दाझीम १ ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी • गिल्लार्दिया फुलझाडांचे रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. निशिगंधाचे २० ते ३० ग्राम वजनाचे कंद २० बाय २० सेमी अंतरावर सपाट वाफ्यात लावावेत.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांना आहार देण्याचे प्रमाण - • प्रत्येक जनावराला त्याच्या शरीराच्या वजनाच्या 2.5-3 टक्के कोरडे घटक आवश्यक आहे. • कडबा, सरमाड, गव्हाचे काड, भाताचे तूस यात 85 टक्के, पेंडी, चुणी यात 90 टक्के व कडवळ मका, घास, बरसीम, गिनी गवत यात 15 ते 20 टक्के कोरडे घटक असतात. • प्रत्येक जनावराला रोज वाळलेली वैरण, हिरवी वैरण (एकदल अथवा द्विदल) पशुखाद्य व क्षारमिश्रण दिले पाहिजे. वैरण नेहमी कुट्टी करून द्यावी. • 400 किलो वजनाच्या रोज 10 लिटर दूध देणाऱ्या गायीचा आहार -  वाळलेली वैरण - 5 किलो  हिरवा चारा - एकदल 20 किलो, द्विदल 10 किलो  पशुखाद्य - शरीर पोषणासाठी 1.5 - 2 किलो आणि प्रतिलिटर दूध उत्पादनाला 400 ग्रॅम प्रमाणात पशुखाद्य द्यावे.  रोज ६० ते ६० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.  वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करून द्यावा, चारा वाया जात नाही.  भरपूर व स्वच्छ पाणी पाहिजे तेव्हा द्यावे.  रोज १० ते २० ग्रॅम मीठ द्यावे. • गाभण गाय, म्हशीचा आहार -  गाभण गाय, म्हशींना रोज दोन किलो पशुखाद्य द्यावे.  सातव्या महिन्यापासून हे प्रमाण दर आठवड्याला पाव किलोने वाढवीत जावे. • वासरे / पारड्यांचा आहार -  १ ते २ महिन्याच्या वासरांना १०० - २५० ग्रॅम काफ स्टार्टर द्यावे.  २ ते ३ महिन्याच्या वासरांना २५० – ५०० ग्रॅम काफ स्टार्टर द्यावे.  ३ ते ५ महिन्याच्या वासरांना ०.५ -१ किलो ग्रॅम काफ स्टार्टर द्यावे.  पहिल्या दोन महिन्यांपर्यंत वासरांना रोज दूध पाजावे. वासरू जन्मल्याबरोबर वासरास अर्धा ते दोन तासांच्या आत चीक पाजावा. चीक देण्याचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 10 टक्के असावे. • बैलांचा आहार  काम करणाऱ्या बैलांना रोज दोन ते अडीच किलो खुराक देणे आवश्यक आहे. यासोबत खुराकात रोज 30 ते 50 ग्रॅम क्षार मिश्रणे मिसळावीत. त्यातून बैलांना कॅल्शिअम, फॉस्फरस इ. क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल.  उन्हाळ्यात फक्त वाळलेला चारा उपलब्ध असतो. या वेळी खुराक नेहमीपेक्षा अर्धा किलोने वाढवावा. खुराकाचा खर्च वाचवण्यासाठी मका, सोयाबीन, संकरित ज्वारी, हरभरा / तूर चुरी यांचे योग्य मिश्रण करून, त्याचा भरडा करून दिला तरी चालतो.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• बियाणे व खते खरेदी करत असतांना पक्के बिल घ्यावे त्यावर वाण, कंपनीचे नाव, लॉट नंबरहे सर्व नोंदवावे व बँगवर उगवण शक्तीचे प्रमाण व तारीख तपासून घावी. • तुरीचे पी.के.व्ही. तारा, बि.एस.एम.आर. – ७३६ यापैकी एक वाण निवडावे. कमी कालावधीसाठी तुरीच्या ए.के.टी.- ८८११ हे वाण घ्यावे. • सोयाबीनचे जे. एस. – ३३५ व फुले अग्रणी यापैकी एक वाण निवडावे. कमी कालावधीचे जे. एस. – ९५६० किंवा जे. एस. – ९३०५ यापैकी एक वाण निवडावे. • पूर्व मान्सून कपाशीची पेरणी २० मे च्या आसपास करावी, उपलब्ध पाण्यानुसारच क्षेत्र ठरवावे. पेरणीचे अंतर ५ बाय १.५ फुट ठेवावे. • पूर्व मान्सून कपाशीच्या लागवडीच्या वेळेस प्रति एकरी ५० किलो १०:२६:२६ हे खत द्यावे. • घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास त्याला एक उन द्यावे व त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, कारण उगवण क्षमता कमी असल्यास बाजारातून नवीन प्रमाणित बियाणे विकत घेता येतील. • मुगाचे बि एम. २००३ -२, पि.के. व्ही. ग्रीन गोल्ड व उत्कर्षा यापैकी एक वाण निवडावे. • उडीदाचे पि.के.व्ही. उडीद – १५ हे वाण वापरावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• हळद व आद्रक :- • हळद व आद्रक पिकाच्या लागवडीसाठी रुंद वरंबे तयार करावे. त्या पूर्वी जमिनीमधील लव्हाळा, हराळी यासारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत, तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात. त्यानंतर कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळीअगोदर एकरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सध्याच्या काळात शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा • जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. • बेणे जातिवंत असावे. हळदीसाठी पिडीकेव्ही वायगाव, सेलम, फुले स्वरूपा, आणी आद्रकासाठी माहीम जातींची निवड करावी. • बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. दीड ते दोन महिने बेण्याची काढणीनंतर सावलीत साठवणूक केलेले असावे. • लागवडीसाठी मातृकंद किवा जेठेगड्डे चा वापर करावा. मातृकंद किंवा जेठा गड्डे बेणे - या प्रकारचे बेणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास मातृकंद म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० ते ११ क्विंटल बेणे लागते. मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते. • हळद लागवडीच्या पूर्वी १५ दिवस बियाणे साठवलेल्या ढिगावर पाणी मारावे, जेणेकरून ढिगामधील आर्द्रता वाढून बियाण्याची सुप्तावस्था संपून अंकुरण सुरू होते. पाणी मारल्यानंतर एक आठवड्याने बियाण्याच्या मुळ्या साफ करून बियाणे लागवडीस तयार करावे. • फळझाडे:- • संत्रा पिकामध्ये सध्या आंबिया बहाराची फळे असतील. ती टिकून राहण्यासाठी बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या सुरू ठेवाव्यात. मे महिन्यामध्ये तापमान वाढू शकते. पाण्याच्या बचतीसाठी शक्य4 तिथे ठिबक सिंचनाचा वापर करावा. • झाडाभोवती काळ्या पॉलिथीनचे (100 मायक्रॉन जाडी) आच्छादन पसरावे किंवा गवत, गव्हांडा याचा थर झाडाच्या सभोवताली पसरून घ्यावा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल. • नवीन बाग लागवडीकरिता 75 x 75 x 75 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावे. नागपुरी संत्राकरिता 6 x 6 मीटर अंतर ठेवावे. खोदलेले खड्डे सूर्याच्या उष्णतेकरिता उघडे ठेवावे. या ह्प्त्यात खड्डे भरणे सुरु करावे, खड्डे भरतांना तळाशी वाळलेला पालापाचोळा टाकावा त्यानंतर शेणखत, माती व १ ते १.५ किलो सुपर फोस्फेट प्रती खड्डा या प्रमाणे खड्डा भरावा. • फळबाग लागवडीसाठी लागणाऱ्या कलमांचे व विशिष्ट वाणांची उपलब्धता कुठे होईल याचे नियोजन करून घ्यावे. कलमा किंवा रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय रोप वाटिका तसेच कृषी विज्ञान केंद्र येथून खरेदी करावे. • मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • संत्रा पिकाला सद्या मृग बहारासाठी ताण दिलेला असेल व ताणाच्या कालावधीत पाऊस आला असेल तर लीवोसीनची फवारणी घ्यावी. • संत्रा मध्ये फळगळ कमी करण्याकरिता 2, 4 - डी हे 1.5 ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल 1.5 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 100 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • नवीन मृगबाग केळी लागवडीकरिता पूर्व नियोजन व तयारी करावी. • भाजीपाला आणी फुलपिके:- • गादीवाफ्यावरील मिरची, वांगे आणी टोमाटो रोपांची काळजी घ्यावी. रोपांचे रस शोसनाऱ्या किडींपासून व्यवस्थापन करावे. • कांदा चाळीमध्ये कांदा साठवला असेल तर त्या कांद्याला अधून मधून खाली वर करावे. • निशिगंधाचे २० ते ३० ग्राम वजनाचे कंद २० बाय २० सेमी अंतरावर सपाट वाफ्यात लावावेत.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• तुरीवरील मर आणि वांझ रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता मर आणि वांझ रोग प्रतिकारक आषा, बी.एस.एम.आर. 736 किंवा विपुला जातींची पेरणी करावी • घरचे बियाणे पेरणीकरीता वापरतांना पिकाचे रोग व किडींपासून रक्षण करण्याकरीता कीड आणि बुरषीनाषकांची बीजप्रक्रीया करावी. • लिंबूवर्गीय फळझाडांचे डिंक्या रोगापासून संरक्षण करण्याकरीता झाडाच्या खोडाला पावसाळयापूर्वी बोर्डोमलम लावावा. • पिकावरील कीडींचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा षिफारसीप्रमाणेच वापर करावा. त्या करीता त्वरित माती परिक्षण करुन घ्यावे.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• जनावरांना दिवसभरात १०० लिटर पाण्याची आवश्यकता असते कारण पाण्यामुळे जनावरांच्या शरीराची लवचिकता राहते. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्यांचे संपूर्ण शरीरात विलयन होते व शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्ये पुरवली जातात. • शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यतकता असते. जनावरांमध्ये पाणी कमी पडले तर बरेचसे आजार होऊ शकतात. डोळे कोरडे होतात, कातडी अंगाला चिकटते, जनावरांच्या वजनात घट होते. • पचनावर, मूत्राद्वारे व घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास परिणाम होतो, शरीराचे तापमान वाढते, मूत्रपिंड व मूत्राशयावर परिणाम होतो, दूध देण्याचे प्रमाण दहा ते 20 टक्यांनी घटते. • पिण्याच्या पाण्याची गरज जनावराच्या शरीराचे आकारमान, खाद्याचा प्रकार, दुग्धउत्पादनातील विविध अवस्था आणि ऋतुमान यावर अवलंबून असते. उन्हाळ्यात जनावरांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. • सर्वसाधारणपणे मोठ्या (गाय/म्हैस) जनावरांना प्रतिदिवस त्यांच्या स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी (चयापचय, मूत्रविसर्जन, शेण टाकणे, दूधनिर्मिती करणे, चालणे, फिरणे व इतर शारीरिक गरजा) साधारणपणे ८० ते ११० लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात ही गरज वाढून १०० ते १३० लिटर पाणी आवश्यीक असते. दुभत्या जनावरांसाठी पाण्याची गरज अधिक असते. • प्रतिलिटर दूध उत्पादनासाठी ४ ते ५ लिटर पाण्याची गरज असते. जनावरांना देण्यात येणाऱ्या पाण्यातून जनावरे सर्वप्रथम स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करतात. त्यानंतर अतिरिक्त पाणी दूधनिर्मितीसाठी वापरले जाते. हे लक्षात घेता, उन्हाळ्यात गोठ्यामध्ये स्वच्छ, ताजे, थंड, निर्जंतुक व वासहीन पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे; जेणेकरून जनावरांना आवश्य क तेव्हा गरजेप्रमाणे इच्छेनुसार पाणी पिता येईल. • जनावरांना देण्यात येणारा चारा हिरवा असल्यास त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जनावरे पाणी कमी पितात, तर शुष्क चारा किंवा वाळलेला चारा असेल तर अशा जनावरांना पाण्याची गरज अधिक असते. त्यामुळे उन वाढले की जनावरांना जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे. • उन्हाळ्यात शरिरातील घाम व लाळेद्वारा पाणी बाहेर पडल्यामुळे या कालावधीत अतिरिक्त पाण्याची गरज असते. यासाठी उन्हाळ्यात कायमस्वरूपी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यात जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध केल्यास जनावरांवर पाण्याचा ताण कमी होतो, जनावरांचे दुग्धउत्पादन वाढते, तसेच दुधातील फॅटचे प्रमाणही वाढते. • उन्हाळ्यात थंड पाणी पुरवूनही जनावरे कमी पीत असतील तर जनावरांच्या खुराकात रोज २० ते ३० ग्रॅम खाण्याचा सोडा (सोडियम बायकार्बोनेट) मिसळावा. तसेच पाण्यात ५० ते १०० ग्रॅम गूळ मिसळून दिल्याने जनावरे अधिक पाणी पितात. किवा जनावरांच्या खाद्यात साधे मीठ २० ग्रा. रोज दिल्यास सुद्धा जनावरे अधिक पाणी पितात. • काही पशुपालक उन्हाळ्यात जनावरांना सकाळी चरण्यासाठी सोडतात आणि सायंकाळी गोठ्यात परतल्यानंतर पाणी पाजतात. अशा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा ताण पडतो. यामुळे जनावरांचे दूधउत्पादन घटते. अश्या वेळी जनावरांना मध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे. किवा चारावयास सोडण्याच्या वेळा बदलावाव्यात. • जनावरांनी अधिक पाणी प्यायल्यामुळे शेण घट्ट पडते. परिणामी गोठा स्वच्छ राहतो.