Weekly Advice

Here are the Weekly Advice published in Weekly Krishak Jagar by Deshonnati Newspaper

January, 2016

कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुइमुगात ३ पाणी झाल्यानंतर त्याला फुल येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. • उन्हाळी तीळ पेरणी करत असताना प्रती एकरी ५० किलो १५:१५:१५ हे खत द्यावे. • उन्हाळी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारीच्या आसपास करावी. पेरणी करिता पुसा वैशाखी हे वाण वापरावे. • हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर १५ दिवसाने माती परीक्षणाचा नमुना घ्यावा.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• पाण्याची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. • मृग बहराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. • शिफारशीनुसार भेंडी, चवळी, गवार, काकडी, दुधी भोपळा, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर यांची उन्हाळी लागवड करावी. • गिल्लार्दिया फुल्पिकाचे एक महिना वयाचे रोपांची लागवड करावी. • संत्र्याचा आंबिया बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार सुरु असलेला ताण तोडावा. नंतर झाडाच्या वयानुसार खते द्यावीत. १० वर्ष व पुढील वयाचे झाडास कम्पोस्त खत ५० किलो + नत्र ६०० ग्राम + स्फुरद ४०० ग्राम + पालाश ४०० ग्राम + निंबोळी ढेप ७ किलो प्रती झाड द्यावा. • गादीवाफ्यावरील मिरची, वांगी आणि टमाटे रोपांची कीड व रोगांपासून संरक्षण करावे.. • कांदा रोपांची पुनर्लागवड करावी. लागवड करतांना रोपांना कॅर्बेन्दाझीम व कार्बोसल्फानची प्रक्रिया करावी. रोपे लागवड करतांना १५ बाय १० सेमी अंतरावर लागवड करावी.लागवडीसोबत खताची मात्रा देताना त्या सोबत सल्फर ८ किलो टाकावे. • ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या पपया झाडांना ३०० ग्राम १०:२६:२६ खताची मात्रा द्यावी. झाडांना नियमित ओलीत करावे. • केळी बागेमध्ये अति थंडी पासून संरक्षणासाठी शेकोट्या पेटवावी. घडांना स्कार्तिंग ब्याग लावाव्या.रात्री बागेस पाणी द्यावे. • कांदा बिजोत्पादन पिकास भर द्यावी. पर-परागीभवन वाढण्यासाठी मधमाशी पेट्या लावाव्या. पेटी बागेच्या मध्यभागी लावावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• शेतक-यासाठी परसातील कुक्कुट पालन हा एक उत्तम जोडधंदा आहे. यामुळे देशी कोंबड्यांचे संगोपनदेखील होते व परसदारातच देशी कोंबडीपालनाचा प्रकल्प सुरू केल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागतो. देशी कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी आहे. त्यासाठी शेतक-यांना देशी कोंबड्यांच्या व्यवसायात कोंबड्यांच्या जाती माहिती असणे आवश्यक आहे. करिता थोडक्यात कोंबड्यांच्या बद्दल माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुईमुगाची लागवड १५ जानेवारी पर्यंत करावी त्या करिता टी.ए.जी. – २४ हे वाण वापरावे. प्रती एकरी ५० किलो अमोनिअम सल्फेट व १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे खत द्यावे. • उन्हाळी तिळाची पेरणी १५ – २० जानेवारीच्या आसपास करावी व त्या करिता ए.के.टी. – १०१ हे वाण वापरावे. • हरभरा पिकात ताण अवस्थेत १ टक्का पोटयाशीअम नायट्रेट (१०० ग्राम १३:००:४५, १० लिटर पाण्यात मिसळून) फवारावे. • हरभरा पिकाची काढणी करत असताना हलक्या हाताने करावी जेणेकरून गाठे पडणार नाहीत. • गहू पिकास फुलोरा अवस्थेत व चिकाच्या अवस्थेत बोरॉन व झिंकची आवशकता असते त्या करिता प्रती एकरी ४०० मिली मायक्रोला १५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• संत्र्याचा आंबिया बहार धरण्यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार सुरु असलेला ताण तोडावा. नंतर झाडाच्या वयानुसार खते द्यावीत. १० वर्ष व पुढील वयाचे झाडास कंपोस्ट खत ५० किलो + नत्र ६०० ग्राम + स्फुरद ४०० ग्राम + पालाश ४०० ग्राम + निंबोळी ढेप ७ किलो प्रती झाड द्यावा. • सिंचनाची बचत करण्यासाठी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे २ ते ३ इंच जाड आच्छादन करावे. • मृग बहराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. • शिफारशीनुसार भेंडी, चवळी, गवार, काकडी, दुधी भोपळा, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर यांची उन्हाळी लागवड करावी. • गेलार्डीया फुलपिकांच्या एक महिना वयाच्या रोपांची लागवड करावी. • उन्हाळी मिरची, वांगी व टोमाटो करिता रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाण्याची पेरणी करावी. • कांदा रोपांची पुनर्लागवड करावी. लागवड करतांना रोपांना कार्बेन्डाझीम व कार्बोसल्फानची प्रक्रिया करावी. • ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या पपया झाडांना २०० ग्राम १०:२६:२६ खताची मात्रा द्यावी. झाडांना नियमित ओलीत करावे. • केळी बागेमध्ये अति थंडी पासून संरक्षणासाठी शेकोट्या पेटवाव्यात. घडांना स्कार्तिंग ब्याग लावाव्या.
पीक संरक्षण (डॉ. चारुदत्त ठीपसे 8275412062)
• कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ३० ग्रॅम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम आणि डायमेथोएट १५ मिली किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणी करतांना चिकट द्रव्याचा (स्टीकर) वापर जरूर करावा. • सध्या ढगाळ व थंड हवामानामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. टोमॅटो, मिरची यासारख्या फळभाजी पिकांवरिल भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात मिसळणारे ८० टक्के सल्फर (गंधक) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १२-१५ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी. • काकडी पिकावरिल भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप ५ मिली किंवा डायफेनोकोनॉझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • आंबा मोहोराचे तुडतुडे आणि भुरी रोगांपासून संरक्षण करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, ३ मिली व हेक्झाकोनॅझोन २० इसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
• प्रत्येक जनावरांची खाद्यातील शुष्क पदार्थ खाण्याची ठरावीक गरज असते. साधारणपणे वजनाच्या २ ते २.५ टक्के शुष्क पदार्थ जनावराला त्याच्या आहारातून पुरविले पाहिजेत. यासाठी त्याच्या आहारात वाळलेला चारा असणे आवश्यक ठरतो. • मोठ्या जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा अंतर्भाव करणे फायदेशीर आहे. त्यातून जनावराला ‘अ’ जीवनसत्त्वाचा पूरवठा होवून त्याचे डोळे, कातडी त्वचा सतेज होते शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढून उत्पादनाची पातळी टिकविण्यास मदत होते. • हिरव्या चारयातून जनावरास पोषक द्रव्ये अगदी ताज्या स्वरूपात मिळतात. यामुळे आरोग्य चांगले टिकून रहाते. चाऱ्यातून जनावराला चांगल्या प्रमाणात प्रथीने व इतर पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी हिरवा चारा देताना, त्यात द्विदल चारा जसे लुसर्न, बर्सिम किंवा मूग, भुईमूग, उडीद यासोबत कडधान्य चारा मका, ज्वारी इत्यादिचे १:३ प्रमाणात मिश्रण करावे. • केवळ द्विदल चारा पोटभर खाऊ घातल्याने सुद्धा अपचनाचा व पोटफुगीचा त्रास जनावरास होवू शकतो. चारा तसाच जनावरासमोर न टाकता तो कुटी करून दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते शिवाय अशा कुटी केलेल्या चाऱ्याची पाचकता जास्त असते. • खनिज व क्षाराच्या आहारातील अभावामुळे जनावरास बरेच आजार होवू शकतात ज्यामुळे दूध उत्पादन कमी होते. वंध्यत्व येते, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी जनावराच्या १ किलो खाद्यात अंदाजे खनिज व क्षार मिश्रण पावडर (मिनरल मिक्स्चर) टाकणे आवश्यक आहे. • शेतकरी व इतरांना बटेर पालन करावयाचे असल्यास कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे बटेर उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता (डॉ. गोपाल मंजूळकर, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान - 9822231923) संपर्क साधावा.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
बटेर पालन उत्कृष्ट जोडधंदा – • एका वर्षात बटेरचे 8 ते 12 खोप होतात. वर्षाला 250 ते 300 अंडी देतात. अंडी उत्पादन 9 ते 10 आठवड्यात 80 टक्क्यापर्यंत पोहोचते. • एका दिवसाचे पक्ष्याचे वजन 7 ते 8 ग्राम एवढे असते. पाच आठवड्यात पक्षाचे वजन 180 ते 200 ग्रँम होते. पुर्ण वाढ झालेल्या पक्षाचे वजन 200 ते 250 ग्रम पर्यंत असते. • मादी पक्षाचे वजन नरापेक्षा जास्त असते. 16 ते 18 दिवसात अंडी उबवणी केली जाऊ शकते. बाजारात विकण्याचे वय 4 ते 5 आठवडे असून एका पक्षाचे वजन 150 ते 160 ग्रम असते. • एका कोंबडीला लागणा-या जागेत 8 ते 10 पक्षी ठेवले जाऊ शकतात. एक किलो मांस उत्पादनाकरीता 2 ते 2.50 किलो खाद्य लागते. सहा आठवड्यात एक पक्षी 500 ते 550 ग्रँम खाद्य खातो. पूर्ण विकसीत पक्षी 10 ते 12 ग्रँम दिवसाला खाद्य खातो. अंडी देणा-या पक्षाला 20 ते 22 ग्रँम खाद्य लागते. • मृत्युचे प्रमाण फार कमी असते. कारण ह्या पक्षात इतर पक्ष्यांच्या मानाने रोगप्रतीकारक्षमता जास्त असते. त्यामुळे या पक्षांना लसीकरणाची आवश्यकता नसते. • मादी पक्षी वयाच्या 6 व्या आठवड्यापासून अंडी देण्यास सुरवात करते व ही क्षमता 8 आठवड्यात 50 टक्क्यापर्यंत पोहोचते. पुढे 10 आठवड्यात अंडी देण्याची क्षमता 80 टक्के होते. • एक मादी वर्षाला सुमारे 200 अडी देते व एका अंड्याचे वजन साधारण 12 ग्रँम पर्यंत असते. अंडी रंगाने पांढरट पिंगट काळ्या ठिपक्याची असतात व आता फक्त पांढ-या रंगाच्या अडे देणा-या बटेर पक्षाचा जाती विकसीत करण्यात आल्या आहेत. व ह्या पक्षांच्या जाती अंडी उत्पादनासाठी प्रसीध्द असल्यामुळे पक्षी हा कधीच खुडूक होत नाही.ही अंडी मशीन द्वारे अथवा पक्षाद्वारे उबवून यातून पिल्ले काढण्यात येतात. • शेतकरी व इतरांना बटेर पालन करावयाचे असल्यास कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे बटेर उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता (डॉ. गोपाल मंजूळकर, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान - 9822231923) संपर्क साधावा.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• उन्हाळी भुईमुगाची लागवड १५ जानेवारी पर्यंत करावी त्या करिता टी.ए.जी. – २४ हे वाण वापरावे. • उन्हाळी तिळाची पेरणी १५ जानेवारीच्या आसपास करावी व त्या करिता ए.के.टी. – १०१ हे वाण वापरावे. • हरभ-याला पाणी देत असताना त्याच्या कळी अवस्थेत द्यावे, ५० टक्के फुलोरा अवस्थेत हरभरा पिकाला पाणी देऊ नये. • वातावरणात धुवारी पडल्यानंतर हरभ-यावर 1 टक्का 19:19:19 फवारावे. • हरभरा पिकात ताण अवस्थेत १ टक्का पोटयाशीअम नायट्रेट (१०० ग्राम १३:००:४५, १० लिटर पाण्यात मिसळून) फवारावे.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• हळद पिकास व आले पिकास नियमित ओलीत करावे. हळदीची पाने करपा रोगापासून वाचवावीत. करपा रोगापासून संरक्षण करावे. • मृग बहराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. • बटाटा पिकास भर द्यावी. बटाटा पिकाचे करपा रोग व रस शोषणाऱ्या किडीपासून संरक्षण करावे. • कांदा रोपे लागवड करताना ४२ किलो युरिया + १२५ किलो सुपर फोस्फेट + ३५ किलो म्युरेट ऑफ पोट्याश + ८ किलो गंधक प्रती एकरी खते द्यावीत. • थंडी वाढल्यास रात्री केळी बागेस पाणी द्यावे. बागेभोवती शेकोटी पेटवावी. झाडांना निंबोळी पेंडचा वापर करावा. • कागदी लिंबू पिकास नियमित ओलीत करावे. हस्त बहराच्या फळे असलेल्या झाडांवर झिंक सल्फेट ५० ग्राम + फेरस सल्फेट ५० ग्राम + कळीचा चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • संत्रा आंबिया बहार घेण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४० ते ५० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. ताण कालावधीत क्लोरमक्वाट क्लोराईड १ ग्राम /लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • सद्याचे तापमान १५ अंश से. पेक्षा कमी असल्याने केळी पिकांच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते त्यामुळे पाने पिवळी पडतात यासाठी १९:१९:१९, २० ग्राम /लिटर पाणी घेऊन या विद्राव्य खताची फवारणी करावी. • केळी बागेस निंबोळी ढेप प्रती झाड २०० ग्राम (नवीन कांदे बाग) तर मृग बागेस प्रती झाड ५०० ग्राम द्यावी. • बटाटे पिकामध्ये बटाटे मातीने झाकावे. त्यांना सूर्यप्रकाशात उघडे पडू देऊ नये. या पिकाची पाण्याची गरज मोठी असल्याने पाण्याचा ताण पडू देऊ नये या करिता नियमित ओलीत करावे. • कांदा लागवड करतांना १० बाय १० से. मी. अथवा १५ बाय १० से. मी. अंतरावर करावी. लागवडीचे वेळी रोपे लावतांना अंगठ्याने दाबू नये. यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझीम १ ग्राम किंवा क्लोरोथ्यालोनील २ ग्राम प्रती लिटर पाण्यात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवडी साठी वापरावीत. • मेथी, पालक भाज्यांची टप्प्या-टप्प्याने लागवड करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
विविध संस्थांनी विकसित केलेल्या परसातील कुक्कुटपालनाच्या जाती: गिरिराज:- ही जात पशुवैद्यकीय महाविद्यालय, बंगलोर यांनी विकसित केली आहे. अंडी व मांस या करिता फायदेशीर आहे. वैशिष्ट्ये:- 1) अंडी व मांस उत्पादन 2) 22-23 आठवड्यांनी अंडी देण्यास सुरवात होते. 3) नर पक्ष्याचे वजन चार किलो, तर मादी पक्ष्याचे वजन तीन किलो असते. 4) वार्षिक अंडी उत्पादन क्षमता 180-190 कॅरी निर्भिक:- ही जात राष्ट्रीय पशुसंधान केंद्र, इज्जतनगर यांनी विकसित केली आहे ही जात अंडी उत्पादनाकरीता फायदेशीर आहे. वैशिष्ट्ये:- 1) नर पक्ष्याचे वजन तीन ते चार किलो आणि मादी पक्ष्याचे वजन दोन ते तीन किलो असते. 2) 196 दिवसांनंतर अंडी देण्यास सुरवात करतात. 3) वार्षिक अंडी उत्पादन क्षमता 92 4) 40 आठवड्यांत अंड्याचे वजन 50 ग्रॅम कॅरी श्याामा:- ही जात कडकनाथ x कॅरी रेड यांचे संकरण करून केंद्रीय कुक्कुटपालन संशोधन संस्था (ICAR), इज्जतनगर येथे विकसित केली आहे. वैशिष्ट्ये:- 1) या कोंबडीच्या मांस व अंड्यामध्ये लोहयुक्त पदार्थाचे प्रमाण जास्त असते. तसेच मांसात 25 टक्के प्रथिने असतात. 2) 20 आठवड्यांत पक्ष्याचे वजन दोन कि.ग्रॅ. भरते. 3) 180 दिवसांनंतर अंडी देण्यास सुरवात करतात. 4) वार्षिक अंडी उत्पादन क्षमता 105 5) या जातीचे मांस काळे असते व दिसायला अयोग्य वाटते. परंतु ते चविष्ट असून, औषधी मानले जाते सुवर्णधारा:- ही जात पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, बंगलोर यांच्याद्वारे विकसित केली गेली आहे. वैशिष्ट्ये:- 1) या जातीची कोंबडी 190-200 अंडी देते. 2) परसबागेतील संगोपनासाठी योग्य. 3) पक्षी लहान व हलक्याा वजनाचा असतो, त्यामुळे त्याचे शत्रूपासून (उदा. जंगली मांजर, कोल्हा) संरक्षण होण्यास मदत होते. 4) पक्षी अंडी व मांसासाठी वाढविले जातात. वयाच्या 22-23 आठवड्यांत अंडी देण्यास सुरवात करतात. 5) कोंबडीचे वजन सरासरी तीन किलो तर कोंबड्याचे वजन चार किलो असते. कडकनाथ:- मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आढळणाऱ्या कडकनाथ जातीच्या कोंबड्या परसपालनाकरिता उत्तम आहेत. या कोंबड्यांचे मांस काळ्या रंगाचे असून, त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मानवी आरोग्याच्यादृष्टीने या कोंबड्यांच्या मांसाला चांगली मागणी आहे. या कोंबड्या वर्षाला साधारणतः 105 अंडी उत्पादित करतात. त्यांची पिल्ले 10 महिन्यांमध्ये एक किलो वजनाची होतात.
कृषि विद्या (डॉ. जीवन कतोरे 8275412012)
• हरभ-याला पाणी देत असताना त्याच्या कळी अवस्थेत द्यावे, ५० टक्के फुलोरा अवस्थेत हरभरा पिकाला पाणी देऊ नये. • वातावरणात धुवारी पडल्यानंतर हरभ-यावर 1 टक्का 19:19:19 फवारावे. • हरभरा पिकात ताण अवस्थेत १ टक्का पोटयाशीअम नायट्रेट (१०० ग्राम १३:००:४५, १० लिटर पाण्यात मिसळून) फवारावे. • गहू पिक काही ठिकाणी पिवळे पडत असल्यास त्या ठिकाणी युरिया देऊन पाणी द्यावे. • गहू पिकात पेरणीपासून ३० ते ४० दिवसानंतर मेट सल्फुराँन मिथाईल किंवा २, ४ – डी या पैकी एका तणनाशकाची फवारणी घ्यावी.
उद्यानविद्या (श्री. गजानन तुपकर 8275412064)
• हळद पिकास व आले पिकास नियमित ओलीत करावे. हळदीची पाने करपा रोगापासून वाचवावीत. करपा रोगापासून संरक्षण करावे. • कागदी लिंबू पिकास नियमित ओलीत करावे. हस्त बहराच्या फळे असलेल्या झाडांवर झिंक सल्फेट ५० ग्राम + फेरस सल्फेट ५० ग्राम + कळीचा चुना ४० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • बटाटा पिकास भर द्यावी. बटाटा पिकाचे करपा रोग व रस शोषणाऱ्या किडीपासून संरक्षण करावे. • मृग बहराच्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे. • नर्सरी मधील कांदा रोपावर कीटकनाशक + बुरशीनाशक ची फवारणी घ्यावी. लागवडीसाठी मुख्य शेताची तयारी करावी. रोपांच्या वाढीसाठी युरिया द्यावा. • मेथी, पालक भाज्यांची टप्प्या-टप्प्याने लागवड करावी.
पशुविज्ञान (डॉ. गोपाल मंजूळकर 9822231923)
जनावरांसाठी पौष्टिक हायड्रोपोनिक्सप चारा तयार करण्याची पद्धत :- • या तंत्रज्ञानाने मका, गहू, बार्ली, ओट इ. तृणधान्याची वाढ करून चारानिर्मिती करता येते. • चारा निर्माण करण्यासाठी मका बियाणे चांगले असावे. त्याची उगवण ८० टक्केपेक्षा कमी नसावी. ३ x२ फूट आकाराच्या ट्रेसाठी दोन किलो मका लागतो. • सुरुवातीला मका स्वच्छ धुऊन घ्यावा. धुतलेला मका १२ ते २४ तास पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर पाणी काढून टाकावे. • बियाणास मोड येण्यासाठी गोणीत/ पोत्यात २४ ते ३० तास ठेवावे. • पोत्यामध्ये/ गोणीमध्ये २४ ते ३० तासांनंतर मक्याला मोड येतात. मोड आलेला मका ट्रेमध्ये समान पसरवून तो ट्रे रॅकच्या मांडणीवर ठेवावा. • ट्रेवरील मक्यावर ठराविक अंतराने झाऱ्याने, नॅपसॅक पंपाने अथवा स्वयंचलित पद्धतीने मायक्रोस्प्रिंकलर्सचा वापर करून पाणी द्यावे. पाणी देण्याचा वेळ व कालावधी वातावरणावर अवलंबून असेल. (साधारणतः सध्याच्या वातावरणानुसार २ ते ३ तासांच्या फरकाने 1 ते 2 मिनिटे पाणी द्यावे. उष्ण वातावरणात १ ते २ तासांच्या फरकाने १ ते २ मिनिटे पाणी द्यावे.) • वरील पद्धतीने ७ ते ९ दिवसांत २० ते ३० सें. मी. उंचीचा हिरवा मका चारा तयार होईल. • हा चारा अतिशय लुसलुशीत, पौष्टिक, चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. • हा चारा मोठ्या जनावरांना 10 ते 20 किलो प्रती जनावर याप्रमाणे खाद्य आणि सुक्या चाऱ्यासोबत दिला जातो. • एक किलो चारा उत्पादनासाठी साधारणतः तीन रुपये खर्च येतो. • या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असून, धान्य किंवा इतर चाऱ्यापेक्षा जास्त पचनीय (90 ते 95 टक्के) असतो. तसेच धान्यापेक्षा दीड पटीने जास्त प्रथिने वाढतात. • धान्याची उगवण होताना एन्झाईम सक्रिय होऊन धान्यातील पिष्ठमय पदार्थ, प्रथिने आणि स्निग्ध घटकांचे जनावरांना लवकर उपलब्ध होतील अश्या सोप्या स्थितीमध्ये रूपांतरीत करतात. • त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता व उत्पादकतेत सुधारणा करते.